हिवाळ्यात रोज उठून कोरड्या त्वचेचा सामना करावा लागतो. तिथे चमकदार त्वचेचं स्वप्नं बघणं तर दूरचीच गोष्ट. कितीही महागाचे प्रोडक्टस वापरा त्वचा मऊ आणि चमकदार दिसत नसेल तर आपलं काही चुकतं हे नक्की. सर्व काही करत असाल आणि फक्त टोनिंग करत नसाल तर मात्र तुमचे सर्व प्रयत्न वाया गेलेच म्हणून समजा. जर टोनर वापरलं नाही तर त्वचेवरची रंध्रं उघडीच राहातात. त्यामुळे त्या रंध्रांत धूळ, माती जाऊन चेहर्यावर मुरुम , पुटकुळ्या येतात. यामुळे आणखी चेहरा खराब होतो. मेकअप करुन आपली टोनर न वापरण्याची चूक किती झाकणार? त्यापेक्षा टोनरचं महत्त्व जाणून ते आपल्या त्वचेच्या देखभालीच्या सवयीत समाविष्ट करणे हा उत्तम उपाय.
Image: Google
टोनर न वापरल्यास कितीही चांगला मेकअप केला तरी त्वचा मऊ आणि चमकदार दिसत नाही . सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात एकवेळ मेकअप करताना एखादी सामग्री कमी वापरा पण चेहरा धुतल्यानंतर आधी चेहर्याला टोनर लावा. टोनर वापरल्यानं त्वचेचा पोत सुधारतो तसेच टोनरच्या नियमित वापरानं त्वचा चमकदारही दिसायला लागते. टोनरचा चांगला परिणाम त्वचेवर तेव्हाच होतो जेव्हा आपण योग्य टोनर वापरतो. ग्लोइंग त्वचेसोबतच त्वचेच्या इतर समस्या घालवण्यासाठी राइस वॉटर टोनर म्हणजेच तांदळाच्या पाण्याचं टोनर योग्य आहे.
Image: Google
राइस वॉटर टोनर वापरल्याने काय होतं?
1. हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी आवर्जून राइस वॉटर टोनरच वापरायला हवं. राइस वॉटर टोनरमधे ब जीवनसत्त्वं असतं. यामुळे आपल्या त्वचेची झालेली हानी भरुन निघते.
2. तिशी ओलांडल्यानंतर तर राइस वॉटर टोनर वापरण्याचा त्वचेला फायदा होतो. या टोनरमुळे वाढत्या वयाचा प्रभाव त्वचेवर पडत नाही. त्वचा घट्ट ठेवण्यास हे टोनर मदत करतं.
3. प्रखर उन्हाचा परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे त्वचा खराब होते. रोज राइस वॉटर टोनर वापरल्यास टॅनिंगपासून त्वचेचं संरक्षण होतं.
4. त्वचा तेलकट असल्यास राइस वॉटर टोनर वापारल्यानं त्वचेवर निर्माण होणारं जास्तीचं तेल नियंत्रित होतं. शिवाय या टोनरमुळे त्वचेतला ओलावाही टिकून राहातो.
Image: Google
राइस वॉटर टोनर कसं कराल?राइस वॉटर टोनर तयार करण्यासाठी पाव कप तांदळाचं पाणी, 2 छोटे चमचे कोरफड जेल, 10 थेंब लवेण्डर इसेन्शिअल ऑइल, 1 मोठा चमचा जोजोबा ऑइल आणि 1 छोटा चमचा ग्रीन टी घ्यावा.
Image: Google
सर्वात आधी एका भांड्यात तांदळाचं पाणी घ्यावं. तांदळाचं पाणी करताना आधी तांदूळ धुवून ते अर्धा तास पाण्यात भिजवावेत. हे पाणी टोनर करण्यासाठी वापरावं. तांदळाच्या पाण्यात कोरफड जेल, लवेंडर इसेंन्शिअल ऑइलचे थेंब टाकावेत ते चांगलं एकत्र करावं. नंतर एका भांड्यात पाणी घ्यावं. त्यात ग्रीन टी बॅग पाच मिनिटं बुडवून ठेवावी. पाच मिनिटांनी ही टी बॅग काढून ते पाणी टोनरच्या मिश्रणात घालावं. सर्वात शेवटी टोनरमधे जोजोबा ऑइल घालावं. ते परत चांगलं मिसळून घ्यावं. मग हे टोनर एका स्प्रे बॉटलमधे भरुन ठेवावं. दिवसातून दोन वेळा चेहरा धुतल्यानंतर हे टोनर वापरावं.