Join us  

चेहऱ्यावर तेज आणायचंय? १ वाटी तांदळाच्या पाण्याचा जादूई उपाय, टॅनिंग निघेल-ग्लो येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 2:07 PM

Right Way To Apply Rice Water On Face : तांदूळाचे पाणी एंटी एजिंग गुणांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे त्वचेत बदल दिसतो.

कोरियाला ब्युटी हब असे म्हटले जाते. (Skin Care Tips) कोरियाई प्रोडक्ट्स बाजारात भरपूर उपलब्ध आहेत तुम्हीसुद्धा कोरियन स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करत असाल तर त्यात सगळ्यात महत्वाचा इंग्रेडिएंट असतो तो म्हणजे तांदूळाचा वापर. (Right Way To Apply Rice Water On Face) चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ लावले जातात. हा एक प्रकारचा सोपा आणि इफेक्टिव्ह उपाय आहे. तांदळाच्या पाण्याचा अनेक स्किन केअर उत्पादनांमध्ये वापर केला जातो. (How To Apply Rice Water On Face For Glowing Skin)

तांदूळाचे पाणी एंटी एजिंग गुणांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे त्वचेत बदल दिसतो. स्किन चमकदार दिसते ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात. सुरकुत्याही कमी होतात. एक्स्ट्रा ऑईल निघून जाते याशिवाय सनबर्नची समस्या टाळता येते. तांदूळाचे पाणी चेहऱ्याला लावल्याने बरेच फायदे होतात. 

महिन्याभरात ५ किलो वजन कमी कसं करायचं? AI नं दिलं गमतीदार उत्तर, वेट लॉसचा सोपा फंडा

तांदळाचे पाणी चेहऱ्याला लावण्याची पद्धत म्हणजे तांदूळ काहीवेळ पाण्यात भिजवून ठेवू शकता. यासाठी २ ते ३ कप पाणी एक कप तांदूळात घालून अर्धा तास भिजवून ठेवा. नंतर तांदूळाचे पाणी काढून वेगळे करा. हे पाणी चेहऱ्याला लावू शकता.  तांदूळ उकळवून याचे पाणी तुम्ही तयार करू शकता.  यासाठी १ कप तांदूळात २ कप पाणी घालून शिजवून घ्या. तांदूळ जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत त्याचं एक्स्ट्रा पाणी वेगळं करून घ्या.

तिसरी पद्धत अशी की तांदूळ फर्मेंट करण्यासाठी याचे पाणी तयार करा. यासाठी ३ कप पाण्यात  १०० ग्राम तांदूळ घ्या आणि १ ते २ दिवसांसाठी  तांदूळ कोणत्याही टाइट कंटेनरमध्ये भिजवायला ठेवा. २ दिवसांनी हे पाणी तांदूळ गाळून वेगळे करा. चेहऱ्यावर हे पाणी तुम्ही कापसाच्या मदतीने लावू शकता. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. याव्यतिरिक्त तुम्ही तांदूळाच्या पाण्याचे टोनर बनवून चेहऱ्याला लावू शकता. 

तांदूळाच्या पाण्याचे टोनर कसे तयार करावे?

टोनर तयार करण्यासाठी १ बाटतील तांदूळाचे पाणी घेऊन त्यात १ चमचा लिंबाचा रस मिसळा.  हे टोनर चेहऱ्याला लावा त्यानंतर काही दिवसांनी क्रिम्स आणि प्रोडक्टसचा वापर करा. तुम्ही हे टोनर चेहऱ्याला लावून १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स