उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता वाढल्यानं पिंपल्स येतात अनेकदा यामागची कारणंही लोकांना माहीत नसतात त्यामुळे समस्या वाढत जाते. पिंपल्सपासून बचाव करण्याचे वेगवेगळे उपाय आहेत. जसं की धुळीचे कण, जास्तवेळ उन्हात राहिल्यानं घाम जमा होणं, केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. (These mistakes pimples start coming out in the summer season this is how to avoid)
जेव्हा आपण उन्हाळ्याच्या दिवसात घरातून बाहेर निघतो तेव्हा धूळीचे कण चेहऱ्यावर चिकटतात. यामुळे पोर्स ब्लॉक होतात. त्वचेच्या आत जास्त तेल जमा होतं यामुळेच एक्ने येतात. पिंपल्सची समस्या अशा लोकांमध्ये जाणवते ज्यांची स्किन जास्त ऑयली असते.उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा खूप घाम येतो तेव्हा लोक सतत फेस वॉश वापरतात.
असं केल्यानं त्वचेवर एक्नेची समस्या उद्भवते. चेहरा धुताना बराच कोरडेपणा येतो यामुळे स्किन इरिटेशन होते आणि त्वचेवर पिंपल्स येतात. दीर्घकाळ उन्हात राहिल्यानं पिंपल्सची समस्या उद्भवते. जेव्हा जास्त घाम येतो तेव्हा घामाबरोबर घाणही चेहऱ्यावर चिटकते. यामुळे त्वचेचे विकार होतात.
उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची?
चेहऱ्याला डिप क्लिन करा. त्यासाठी कायम स्क्रब करत राहा. तुम्ही घरगुती पदार्थांचा स्क्रब म्हणून वापर करू शकता. सतत फेस वॉशनं चेहरा धुत असाल तर चेहरा रफ होऊ शकतो. यामुळे स्किन इरिटेशन होण्याची शक्यता असते. म्हणूनच मुल्तानी मातीचा वापर करून त्वचा स्वच्छ करत राहा.
कमी वयात केस फारच पिकलेत? नारळाच्या तेलात 'हे' पदार्थ मिसळून लावा, काळेभोर होतील केस
उन्हाळ्यात घाम पुसत राहण्यासाठी तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करू शकता. यामुळे त्वचेतील तेल आणि घाम दोन्ही शोषलं जाईल. भरपूर प्रमाणात पाणी प्या. सतत चेहरा धुण्यापेक्षा जेव्हा तुम्ही बाहेरून घरी येता स्किनचा संपर्क धूळ, मातीशी येतो, तेव्हाच चेहरा स्वच्छ पाण्यानं व्यवस्थित धुवा.
चेहरा धुण्याची योग्य पद्धत कोणती? (Right way to wash your face know step by step process)
१) जेव्हा कधीही तुम्ही चेहरा धुता तेव्हा थंड किंवा गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाण्यानं चेहरा धुतल्यास त्वचेचा कोरडेपणा वाढतो.
2) जर चेहऱ्याला मेकअप केला असेल तर थेट चेहरा धुण्याची चूक करू नका. आधी तेल किंवा मेकअप रिमुव्हर लावून चेहरा स्वच्छ करा त्यानंतर चेहरा धुवा.
3) चेहरा धुतल्यानंतर रगडून चेहरा पुसू नका. सौम्य टॉवेलनं हळूवारपणे चेहरा पुसा.