Lokmat Sakhi >Beauty > टॅनिंगमुळे चेहरा खराब दिसतोय? हळद - मध - दुधाचा फेस्मास्क, चेहरा चमकेल

टॅनिंगमुळे चेहरा खराब दिसतोय? हळद - मध - दुधाचा फेस्मास्क, चेहरा चमकेल

Roasted Turmeric Face Pack for Tan Removal त्वचा डी- टॅन करण्यासाठी खास फेसमास्क, चिमुटभर हळदीने होईल काम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 06:07 PM2023-05-05T18:07:26+5:302023-05-05T18:08:47+5:30

Roasted Turmeric Face Pack for Tan Removal त्वचा डी- टॅन करण्यासाठी खास फेसमास्क, चिमुटभर हळदीने होईल काम..

Roasted Turmeric Face Pack for Tan Removal | टॅनिंगमुळे चेहरा खराब दिसतोय? हळद - मध - दुधाचा फेस्मास्क, चेहरा चमकेल

टॅनिंगमुळे चेहरा खराब दिसतोय? हळद - मध - दुधाचा फेस्मास्क, चेहरा चमकेल

बदलत्या ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण बदलत्या ऋतूनुसार त्वचेच्या समस्या देखील बदलतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. तर, उन्हाळ्यात त्वचा काळवंडते. टॅनिंग आणि सनबर्न या समस्यांमुळे त्वचेची शोभा कमी होते. काळवंडलेल्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी, अनेक जण केमिकलयुक्त महागडे प्रॉडक्ट्सचा वापर करतात. या उपायांचा वापर करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आयुर्वेदिक - नैसर्गिक पदार्थांचा वापर करा.

जर टॅनिंगची ही समस्या सोडवायची असेल तर, हळदीचा वापर करून पाहा. या घरगुती उपायामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील. यासह टॅनिंगची समस्या कमी होईल. व चेहऱ्यावर नवा तेज येईल(Roasted Turmeric Face Pack for Tan Removal).

हळदीचा डी - टॅन फेसमास्क करण्यासाठी लागणारं साहित्य

हळद

मध

दूध

पातळ झालेले केस पुन्हा दाट करायचेत? घरात आहेत का हे ४ तेल, सोप्यात सोपे उपाय

असा बनवा फेस्मास्क

सर्वप्रथम, एका भांड्यात हळद घेऊन भाजून घ्या. हळदीचा रंग ब्राऊन होत नाही, तोपर्यंत हळद भाजून घ्या. आता ही भाजलेली हळद एका बाऊलमध्ये काढून घ्या. हळद थंड झाल्यानंतर त्यात, एक टेबलस्पून दूध व एक टेबलस्पून मध घालून मिश्रण चांगलं मिक्स करा.

काखेत प्रचंड घाम आणि त्यामुळे दुर्गंधी? ४ सोपे उपाय, घाम-खाज-दुर्गंधी होईल कमी

मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्वचेवर लावा, १० मिनिटानंतर त्वचा सामान्य पाण्याने धुवा. आपण ही पेस्ट आठवड्यातून २ वेळा वापरू शकता. याने स्किन ग्लो करेल. व इतर समस्याही कमी होईल.

हळदीचे चेहऱ्यासाठी फायदे

हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेची ऍलर्जी, फोड आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतात. हळदीची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर ग्लो येतो. पोर्समधील घाण काढून चेहरा स्वच्छ करतो.

Web Title: Roasted Turmeric Face Pack for Tan Removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.