उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते (Beauty Tips). या हंगामात त्वचा अधिक चिकट आणि काळी पडू लागते. यामुळे पिंपल्स, मुरुम, टॅनिंग अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मग या समस्या टाळण्यासाठी आपण विविध ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो. ज्यात केमिकल रसायने जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचेची समस्या निराकरण करण्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढते (Turmeric for Skin). जर आपण देखील स्किन टॅनिंगने त्रस्त असाल तर, त्वचेवर हळदीचा वापर करून पाहा.
हळदीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा स्किन तर होतेच, शिवाय मुरूम आणि मुरुमांच्या डागांपासूनही सुटका होते. जर आपण देखील टॅनिंगमुळे त्रस्त असाल तर, त्वचेवर नैसर्गिक हळदीचा वापर करून पाहा. रिझल्ट नक्की दिसेल(Roasted Turmeric Face Pack for Tan Removal and Clear Skin).
हळदीचा टॅन पॅक करण्यासाठी लागणारं साहित्य
हळद
पिंपल्समुळे चेहऱ्याची चमक कमी झाली? चमचाभर 'या' तेलाचा करा वापर, चेहरा चमकेल रोज
मध
टोमॅटोचा रस
गुलाब जल
अशा पद्धतीने तयार करा हळदीचा टॅन पॅक
हळदीचा टॅन पॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यात १ चमचा हळद घालून भाजून घ्या. हळद पूर्णपणे भाजून काळी करा.
भाजलेली हळद पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात अर्धा चमचा मध, टोमॅटोचा रस आणि गुलाबपाणीचे काही थेंब घालून मिक्स करा. अशा प्रकारे हळदीचा टॅन पॅक वापरण्यासाठी रेडी.
त्वचेवर हळदीचा टॅन पॅक लावण्याची योग्य पद्धत
ना पेस्ट - ना खर्च, १ रुपयाच्या शाम्पूने करा पेडीक्युअर, पायाचा काळेपणा होईल दूर; दिसतील स्वच्छ
हळदीचा टॅन पॅक लावण्यासाठी सर्वप्रथम, टॅन झालेली स्किन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर तयार पेस्ट स्किनवर लावा. २० मिनिटांसाठी हळदीचा टॅन पॅक त्वचेवर राहू द्या. २० मिनिटानंतर पाण्याने स्किन धुवून घ्या. सुती कापडाने पाणी पुसून काढा, शेवटी मॉइश्चरायझर लावा. आपण हळदीचा टॅन पॅकचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.