हिवाळ्यात त्वचेची (Skin Care Tips) विशेष काळजी घ्यावी लागते. त्वचेची निगा राखताना सौंदर्य उत्पादनांची योग्य निवड करणं देखील तितकेच गरजेचं आहे. काही ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने त्वचेच्या निगडीत समस्या वाढत जातात. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक उत्पादनांचा वापर करणे योग्य ठरते. सध्या थंडीमुळे स्किन ड्राय तर होतेच, शिवाय काळपटही पडते. यासह मुरुमांच्या डागांमुळे तर स्किन आणखी खराब दिसते.
जर आपण देखील ड्राय, टॅन झालेल्या स्किनमुळे त्रस्त असाल, शिवाय मुरुमांचे डाग कमी करायचे असतील तर, एकदा हळदीचा वापर करून पाहा (Turmeric for Skin). हळदीच्या वापरामुळे स्किन तर उजळतेच, यासह त्वचेच्या अनेक समस्या देखील सुटतात. पण चेहऱ्यासाठी हळदीचा वापर नेमका कसा करावा? हळदीमुळे स्किनला खरंच फायदा होतो का? पाहा(Roasted turmeric face pack/best tan removal).
त्वचेला उजळ करण्यासाठी हळदीचा वापर
मानेचा काळपटपणा होईल अर्ध्या टोमॅटोने दूर, पाहा इन्स्टंट उपाय; डाग होतील गायब-मान चमकेल
हळदीचा वापर फक्त स्वयंपाकात करण्यात येत नसून, चेहरा डागरहित करण्यासही मदत करते. पण हळदीमुळे स्किन उजळेल कशी? याचा वापर कशा पद्धतीने करावा? हे बहुतांश लोकांना ठाऊक नाही. हळदीचा वापर थेट करण्यापेक्षा आपण हळद भाजून घेऊ शकता. यासाठी तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यात २ चमचे हळद घालून भाजून घ्या. हळदीचा रंग ब्राऊन झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.
कच्च्या बटाट्यात दडलंय उजळ त्वचेचं सिक्रेट, बटाट्याच्या रसात मिसळा एक गोल्डन गोष्ट; चेहरा उजळेल..
नंतर त्यात एक चमचा कॉफी, अर्धा चमचा मध, एक चमचा बेसन, आणि अर्धा कप दूध घालून मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहऱ्यावर तयार पेस्ट हाताने किंवा ब्रशने लावा. आपण ही पेस्ट मानेवर देखील लावू शकता. पेस्ट सुकल्यानंतर किंवा १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील डाग, टॅन दूर होईल.