गुलाबाचे फुल कोणाला नाही आवडत. त्यातील मोहक सुगंध, मऊ पाकळ्या प्रत्येकाला आवडते. बाजारात विविध रंगाचे गुलाबाचे फुलं मिळतात. गुलाबाचे अनेक फायदे आहेत. भेटवस्तू म्हणून आपण आपल्या प्रियजनांना देतोच, परंतु, चेहऱ्याची निगा राखण्यासाठी देखील आपण गुलाबांच्या फुलांचे वापर करू शकतो. गुलाबाच्या फुलांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यात अ, क, ड आणि ई जीवनसत्त्वे असतात. गुलाबाच्या पाकळ्यांचाही फेस पॅक म्हणून वापर करू शकता. हिवाळ्यातील त्वचेच्या संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात.
दही आणि गुलाबाचे फेसपॅक
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. जे त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करते. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडे मध घाला. त्यात एक चमचा दही घालून मिसळा. हा फेस पॅक चेहरा आणि मानेला लावा. थोडा वेळ राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. उत्तम रिझल्टसाठी याचा वापर आठवड्यातून २ वेळा केला.
दुध आणि गुलाबाचे फेसपॅक
एका बाऊलमध्ये गुलाबांच्या पाकळ्यांचे पेस्ट बनवून घ्या. त्यात कच्चे दुध आणि दोन चमचे बेसन घ्या. हे मिश्रण चांगले मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर चांगले लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे तसेच लावून ठेवा. २० मिनिटे झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक एक्सफोलिएटरचे काम करते. अशाने चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.
चंदन पावडर आणि गुलाबाचे फेसपॅक
गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा. त्यात कच्चे दूध घाला. यासह चंदन पावडर घाला. मिश्रण चांगले मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा. थोडा वेळ राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता. अशाने चेहरा तजेलदार दिसेल.