गुलाब पाणी हे जवळपास सगळ्याच ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये वापरले जाते. आपण जेव्हा घरी फेसमास्क बनवतो तेव्हा त्यात आवर्जून गुलाब पाण्याचा वापर करतो. जेव्हा स्किन किंवा केसांच्या सौंदर्याचा विचार केला जातो तेव्हा गुलाब पाण्याचा अवश्य वापर होतोच. गुलाब पाण्यामुळे निस्तेज - निर्जीव त्वचा, मुरुम, सनबर्न, मुरुमांचे डाग आणि त्वचेवरील तेलकटपणा देखील कमी होतो. टोनरच्या स्वरुपातही आपण गुलाब पाण्याचा वापर करू शकतो. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज देखील येते. गुलाब पाण्यामध्ये अँटी- इन्फ्लेमेटेरी आणि अँटी ऑक्सिडेंटचे गुणधर्म आहेत. गुलाब पाण्याच्या वापरामुळे त्वचा मऊ होते(Rose water for skin: What not to mix with it).
जवळजवळ प्रत्येक मुलीच्या ब्यूटी किटमध्ये गुलाब पाण्याची छोटीशी बॉटल कायम असतेच. गुलाब पाण्याचे काही थेंब क्षणार्धात आपला चेहरा ताजातवाना करण्यास मदत करतात. गुलाबपाणी हायड्रेटिंग असण्याव्यतिरिक्त, त्यात दाहक - विरोधी यांसारखे नैसर्गिक गुणधर्म देखील असतात. नैसर्गिक गुलाबापासून बनवल्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम त्वचेवर होत नाहीत. गुलाबपाणी (How to Use Rose Water for Skin Care?) हे सगळ्या प्रकारच्या त्वचेला सूट होणारे असते. गुलाबपाणी हे बहुउपयोगी असून टोनरपासून फेस पॅकपर्यंत अनेक स्वरूपात वापरले जाऊ शकते. गुलाबपाणी (Rose Water) हे त्वचेवर आहे तसेच किंवा इतर नैसर्गिक घटकांसोबत मिसळून त्याचे अधिक फायदे आपल्या त्वचेला मिळवून देऊ शकता. परंतु असे काही घटक आहेत त्याच्यासोबत आपण गुलाबपाण्याचा वापर करु शकत नाही. या ठराविक पदार्थांसोबत जर आपण गुलाबपाण्याच्या वापर केला तर त्वचेला त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. असे नेमके कोणते पदार्थ आहेत ते पाहूयात(Rose water for skin : What not to mix with this natural ingredient).
गुलाबपाण्यासोबत हे पदार्थ कधीही मिसळू नका....
१. व्हिनेगर :- व्हिनेगर व गुलाब पाणी हे दोन्ही घटक आपल्या त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात. व्हिनेगर चेहऱ्यावरील डागांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. परंतु गुलाब पाण्यात व्हिनेगर मिसळून वापरणे आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. असे केल्याने आपल्या त्वचेचा पीएच बदलतो.
शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...
२. बेकिंग सोडा :- बेकिंग सोडा व गुलाब पाणी या दोन्ही जरी नैसर्गिक गोष्टी असल्या तरी त्यांच्या भिन्न स्वभावामुळे ते आपल्या त्वचेवर एकमेकांशी प्रतिक्रिया करुन काहीतरी समस्या निर्माण करु शकतात. यामुळे आपला चेहरा निस्तेज होऊ शकतो आणि रॅशेस देखील येऊ शकतात. इतकेच नाही तर आपली त्वचा ही संवेदनशील असते त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा एकत्रित वापर केल्याने त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. याचबरोबर त्वचा खराब होण्याची शक्यता असते.
३. इसेन्शियल ऑइल :- वेगवेगळ्या प्रकारची इसेन्शियल ऑइलस आपल्या त्वचेसाठी अतिशय महत्वाची असतात. काहीजण इसेन्शियल ऑइलमध्ये गुलाबपाणी मिसळून त्याने त्वचेला मसाज करतात. परंतु असे केल्याने आपली त्वचा खराब होऊ शकते. जर आपल्याला कोणत्याही प्रकारची अलर्जी किंवा दम्याचा त्रास असल्यास इसेन्शियल ऑइल व गुलाबपाणी एकत्रित मिसळून त्वचेला लावू नये. हे दोन्ही घटक एकत्रित मिसळून त्वचेला लावल्यास त्वचा व आरोग्य या दोन्हींसाठी ते हानिकारक ठरु शकते.
स्किन स्पेशालिस्ट सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत, केसगळती - पांढरे केस समस्याच संपतील...
४. लिंबू :- चेहेऱ्याची त्वचा असो किंवा कपडे, डाग दूर करण्यात लिंबाचा रस हा फायदेशीर असतो. परंतु लिंबाचा रस गुलाबपाण्यात मिसळून चेहेऱ्यावर अजिबात लावू नये. असे केल्याने त्वचा खराब होऊ शकते आणि आपला चेहेराही कोरडा पडू शकतो.
देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...