Join us  

केस दाट करणारं हे पाहा जादुई पाणी; कोंडा-पांढरे केस- केस गळणं सगळंच होईल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 6:56 PM

Rosemary Water and Hair Benefits - make hair tonic for hairs : केसांवर केलेला प्रत्येक उपाय फेल ठरत असेल तर, पाण्यात ३ गोष्टी मिसळून लावा, केस दिसतील सुंदर

केसांची योग्य काळजी नाही घेतल्यास केसांशी संबंधित विविध प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात (Hair care). काहींचे केस सतत गळतात. तर काहींचे केस पांढरे आणि पातळ होतात. घनदाट, काळेभोर केस कोणाला नकोत. पण केसांच्या निगडीत समस्या वाढत असल्यामुळे प्रत्येक जण त्रस्त आहेत (Hair Benefits). कोंडा, केस गळती यामुळे आपणही त्रस्त असाल तर, घरगुती हेअर टॉनिकचा वापर करून पाहा.

ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण घरगुती हेअर टॉनिक तयार करू शकता. हे जादुई हेअर टॉनिक केसांना नवीन जीवन देते. शिवाय केस दाट होतात. केसांच्या वाढीसाठी हेअर टॉनिक कशा पद्धतीने तयार करावे? पाहूयात(Rosemary Water and Hair Benefits - make hair tonic for hairs).

घरगुती हेअर टॉनिक करण्यासाठी लागणारं साहित्य

रोझमेरी

थंड - गरम खाल्ल्यावर दातांना झिणझिण्या येतात? १० रुपयाच्या तुरटीचा करा 'असा' वापर; ठणक कमी

पुदिना

लवंग

पाणी

अशा पद्धतीने तयार करा हेअर टॉनिक

सर्वात आधी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात रोझमेरी, लवंग आणि पुदिन्याची काही पानं घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. पाणी थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवा. एका स्प्रे बॉटलमध्ये चहाची गाळणी ठेवा, त्यात तयार टॉनिक ओतून गाळून घ्या. अशा प्रकारे हेअर टॉनिक वापरण्यासाठी रेडी. या हेअर टॉनिकचा वापराने केसांना नवी चमक मिळते.

हेअर टॉनिकचा वापर करण्यासाठी आधी केस विंचरुन घ्या. तयार टॉनिक स्काल्प आणि केसांवर स्प्रे करा. थोड्या वेळा साठी राहूद्या. नंतर शाम्पूने केस धुवा. या हेअर टॉनिकमुळे स्काल्प क्लिन होईल. शिवाय केसांची वाढ होईल.

पावसाळ्यात सतत आजारी पडता? प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून करा ४ गोष्टी, व्हायरल इन्फेक्शन होतील कमी

केसांसाठी रोझमेरीचे फायदे

रोझमेरी एक औषधी वनस्पती आहे. याच्या गुणधर्मामुळे केसांच्या वाढीस मदत होते. हे तेल केस गळणे किंवा केस तुटणे टाळण्यासाठी वापरले जाते. रोझमेरीचे दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट संयुगे केसांचे स्वरूप आणि आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. कोंडा, केस गळणे, केस निर्जीव यासह इतर समस्या सोडवण्यास रोझमेरी मदत करते. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स