Lokmat Sakhi >Beauty > अथिया शेट्टी स्किन टाईटनिंगसाठी वापरते हा राखाडी फेसमास्क! ऐन तारुण्यात त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत...

अथिया शेट्टी स्किन टाईटनिंगसाठी वापरते हा राखाडी फेसमास्क! ऐन तारुण्यात त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत...

Sabja Seeds Face Mask For Skin Tightening : Unbelievable Benefits Of Sabja Seeds For The Skin : Get Glowing Like Athiya Shetty With Her 3-Ingredient Mask : स्किन टाईटनिंगसाठी घरात सहज उपलब्ध असणारे पदार्थ वापरुन तयार करा हा खास फेसमास्क...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2024 01:31 PM2024-10-05T13:31:21+5:302024-10-05T13:50:13+5:30

Sabja Seeds Face Mask For Skin Tightening : Unbelievable Benefits Of Sabja Seeds For The Skin : Get Glowing Like Athiya Shetty With Her 3-Ingredient Mask : स्किन टाईटनिंगसाठी घरात सहज उपलब्ध असणारे पदार्थ वापरुन तयार करा हा खास फेसमास्क...

Sabja Seeds Face Mask For Skin Tightening Unbelievable Benefits Of Sabja Seeds For The Skin Get Glowing Like Athiya Shetty With Her 3-Ingredient Mask | अथिया शेट्टी स्किन टाईटनिंगसाठी वापरते हा राखाडी फेसमास्क! ऐन तारुण्यात त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत...

अथिया शेट्टी स्किन टाईटनिंगसाठी वापरते हा राखाडी फेसमास्क! ऐन तारुण्यात त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत...

आरोग्याची काळजी घेण्याइतकेच त्वचेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. सध्याच्या धावपळीच्या बिझी लाईफस्टाईलमुळे, बरेचजण त्वचेशी संबंधित अनेक समस्यांमुळे हैराण असतात, काहीवेळा चेहऱ्यावरील डागांमुळे तर चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे अनेकांना त्वचा लूज पडल्याची समस्या जाणवते. स्किन टाईटनिंगसाठी आपण वेगवेगळ्या उपायांचा वापर करुन पाहतो पण तरीही याचा परिणाम त्वचेवर दिसत नाही. वयोमानानुसार चेहऱ्याची चमक कमी होऊन त्वचा सैल पडते. असे होऊ नये म्हणून त्वचा कायम टवटवीत राहावी आणि सैल पडू नये असे वाटत असेल तर आपण एक घरगुती फेसमास्क वापरुन लूज पडलेली स्किन टाईट करु शकता( Unbelievable Benefits Of Sabja Seeds For The Skin). 

साधारण वयाच्या तिशीनंतर चेहऱ्यावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात. विशेषतः त्वचा सैल पडण्यास सुरूवात होते. त्वचा सैल पडणे हा प्रत्येकीच्याच चिंतेचा विषय असतो. त्वचा सैलसर (Homemade Face Mask) होणं कोणालाही आवडत नाही, त्यामुळे घरच्याघरी काही सोपे उपाय करता येतात. त्वचा टाईट करण्यासाठी तुम्ही घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा उपयोग करून त्वचेची काळजी घेऊ शकता. स्किन टाईटनिंगसाठी (Navratri 2024 Day 3 : Grey Facemask For Skin Tightening) घरगुती पदार्थांचा वापर करून झटपट तयार होणारा फेसमास्क कसा तयार करायचा ते पाहूयात. हा फेसमास्क वापरुन आपण लूज पडलेली स्किन टाईट करु शकता याचबरोबर स्किन ब्राइटनिंग, ग्लोइंग स्किन असे त्वचेचे अनेक फायदे होतात. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Get Glowing Like Athiya Shetty With Her 3-Ingredient Mask) देखील हा खास राखाडी रंगाचा फेसमास्क तिच्या स्किन केअर रुटीनमध्ये कायम वापरते(Sabja Seeds Face Mask For Skin Tightening). 

साहित्य :- 

१. सब्जा बिया - १ टेबलस्पून (रात्रभर दुधात भिजवलेला)
२. दूध - १ ते २ टेबलस्पून 
३. मध - १ टेबलस्पून 

फेसमास्क कसा तयार करायचा ?  

हा फेसमास्क तयार करण्यासाठी सगळ्यातआधी एका बाऊलमध्ये सब्जाच्या बिया घेऊन त्यात दूध ओतावे. या सब्जाच्या बिया रात्रभर दुधात भिजत ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी, मिक्सरजारमध्ये दुधात भिजवलेला सब्जा, मध आणि गरज लागली तर थोडेसे दूध घालावे. आता मिक्सर फिरवूंन हे सगळे मिश्रण पातळ पेस्ट होईपर्यंत एकत्रित वाटून घ्यावे. आता ही तयार पेस्ट मिक्सरजार मधून काढून एका बाऊलमध्ये ओतून घ्यावी. आपला फेसमास्क चेहऱ्याला लावण्यासाठी तयार आहे.

अनन्या पांडे लावते ‘हा’ पिवळा फेसमास्क, १ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल गोल्डन ग्लो...    


आलिया भट लावते कडुलिंब-तुळशीचा हिरवा फेसमास्क, तिच्यासारखं तेज हवं चेहऱ्यावर तर करा ‘असा’ फेसपॅक...

फेसमास्क कसा वापरावा ? 

हा तयार केलेला राखाडी रंगाचा फेसमास्क आपल्या चेहऱ्यावर बोटांच्या मदतीने लावून घ्यावा. हा फेसमास्क बोटांनी स्किनवर लावताना हलकेच दाब देत बोटांनी मसाज करावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटे हा फेसमास्क वाळण्यासाठी तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर चमच्याच्या मागच्या टोकाच्या मदतीने हा फेसमास्क चेहऱ्यावरुन काढून घ्यावा. आता चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.  

हा फेसमास्क वापरल्याने नेमके कोणते फायदे मिळतात ? 

१. दूध :- दुधामध्ये असणारी कॅल्शिअम, प्रोटीन सारखी पोषक तत्त्व त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. 

२. सब्जाचे बी :- सब्जाच्या बियांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात. यांचा वापर केल्याने त्वचा नितळ, तजेलदार आणि चमकदार होते. 

३. मध :- मध लावल्याने त्वचा हायड्रेटेड राहते यामुळे त्वचेचा कोरडेपणा हळुहळु कमी होतो. मध लावल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण आणि तेल स्वच्छ करण्यास मदत मिळते.

Web Title: Sabja Seeds Face Mask For Skin Tightening Unbelievable Benefits Of Sabja Seeds For The Skin Get Glowing Like Athiya Shetty With Her 3-Ingredient Mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.