हिवाळा सुरू झाला की संपूर्ण अंग कोरडे पडू लागते. हात- पाय यांची त्वचा अगदीच शुष्क- कोरडी होऊन जाते. एवढंच नाही तर डोक्याची त्वचा म्हणजेच स्काल्प देखील कोरडी होते आणि मग केसांत कोंडा होण्याची समस्या वाढते. थंडीचा परिणाम चेहऱ्यावरही लगेच दिसून येतो. त्वचेचा ग्लो कमी होतो आणि त्वचा काळवंडू लागते. असं होऊ नये म्हणून आता त्वचेला केशर- बदामाचं खास पोषण देऊन पाहा (How to keep skin hydrated and glowing in winter). हा एक उत्तम उपाय असून यामध्ये आपण केशर आणि बदाम वापरून त्वचेला हिवाळ्यातही मऊ आणि चमकदार कसं ठेवायचं ते पाहूया...(Saffron almond nourishment for skin in winter season)
हिवाळ्यात त्वचा मऊ ठेवण्यासाठी उपाय
हा उपाय cook_with_ashura या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास त्वचा मऊ- मुलायम तर राहीलच पण त्वचेवर खूप छान ग्लो येईल. शिवाय डार्क सर्कल्स असतील तर ते ही कमी होतील आणि त्वचेचं टॅनिंग कमी होण्यासही मदत होईल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा, मसाला म्हणूनही भाज्यांमध्ये टाका- जेवणाची वाढेल रंगत
हा उपाय करण्यासाठी आपल्याला ८ ते १० केशराच्या काड्या, १ टीस्पून बदाम तेल, २ टीस्पून ॲलोव्हेरा जेल, १ टीस्पून ग्लिसरिन, २ टीस्पून रोज वॉटर आणि व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल असं साहित्य लागणार आहे.
सगळ्यात आधी तर केशर एका कागदामध्ये गुंडाळा आणि तव्यावर मंद आचेवर २ मिनिटांसाठी भाजून घ्या.
यानंतर ते एका एअरटाईट डबीमध्ये ठेवा आणि त्यात बदाम तेल, ॲलोव्हेरा जेल, ग्लिसरीन, रोज वॉटर आणि व्हिटॅमिन ई टाका..
थंडीत घरात घालण्यासाठी आकर्षक चपला घ्यायच्या? बघा ३ ट्रेण्डी पर्याय- घरातही राहा एकदम स्टाईलमध्ये...
सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून एकजीव करा. आता आपण तयार केलेलं हे क्रिम रोज रात्री झोपण्यापुर्वी त्वचेला लावा. १५ दिवसांतच खूप चांगला परिणाम दिसून येईल.
त्वचा ऑईली असेल तर बदाम तेल टाकू नये.