Join us  

साई पल्लवीच्या लांब-घनदाट केसांचे सिक्रेट; ती केसांना लावते किचनमधला १ पदार्थ, तुम्हीही लावा..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:27 AM

Sai Pallavi Secret Formula For Long Hair : साई पल्लवी केसांची काळजी घेण्यासाठी काय करते तिचे केस लांब राहावेत यासाठी कोणत्या खास उत्पादनांचा वापर करते का असा प्रश्न अनेकांना पडतो.

दक्षिण भारतीय अभिनेत्री आणि त्यांच्या फॅशल स्टाईलचे अनेकजण चाहते आहेत.  साई पल्लवी (Sai Pallavi) मेकअप न करता इतकी सुंदर, आकर्षक दिसते तिचे केसही लांब आहेत. (Hair Care Tips) साई पल्लवी केसांची काळजी घेण्यासाठी काय करते तिचे केस लांब राहावेत यासाठी कोणत्या खास उत्पादनांचा वापर करते का असा प्रश्न अनेकांना पडतो. साई पल्लवीच्या लांब केसांचे रहस्य नेमकं काय ती केसांच्या चांगल्या वाढीसाठी काय लावते ते समजून घेऊया. (Sai Pallavi Inspire With Her Natural Beauty And Skin)

साई पल्लवीला जास्तीत जास्त नॅच्युरल मेकअपमध्ये राहायला आवडतं. जास्तीत जास्त वेळ ती विदाऊट मेकअप असते.  आपली त्वचा आणि केस सुंदर, चांगले दिसावेत यासाठी ती ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर करते. तिचा साधा लूक सुद्धा मनमोहक आहे. तिचे केस लांबूनही आकर्षक दिसतात. (Secret To Sai Pallavi's Long Hairs)

ऐन तारूण्यात कंबरदुखीने हैराण आहात? ५ पदार्थ खा; म्हातारे झालात तरी कंबरदुखी छळणार नाही

एका मुलाखतीत साईने सांगितले होते की, मी माझ्या केसांना चांगले ठेवण्यासाठी चांगल्या पदार्थांचा आहारात समावेश करते आणि प्रत्येकी ३ दिवसांत केस धुते. माझे केस गळू नयेत अशी प्रार्थना करते. (Sai Pallavi Secret Formula For Long Hair) साई आपल्या केसांवर नैसर्गिक एलोवेरा जेलचा वापर करते. साईला तिचे लांब केस फार आवडतात. चित्रपटात मेकअप न करता लोकांसोर येते तेव्हा पुष्कळ मुरूमं दिसून येतात.  तरीही लोकांनी मला स्वीकारले. नंतर मला समजले की आत्मविश्वास हेच खरं सौंदर्य आहे.

एलोवेरा केसांसाठी कसा फायदेशीर ठरतो?

मेडिकल न्युज टु डेच्या रिपोर्टनुसार ताजं एलोवेरा जेल लावल्याने केसांना बरेच फायदे मिळतात. ताज्या एलोवेराची पानं घ्या.   एलोवेरा जेल व्यवस्थित  एका वाटीत ककाढून घ्या नंतर प्लेटमध्ये काढून ठेवा आणि  एलोवेरा जेल केसांच्या मुळांना लावा. यामुळे लांबचलांब होतीत. माईल्ड शॅम्पूने केस धुवा. केसांना कोकोनट ऑईल, जोजोबा ऑईल हे तेल केसांना लावा. आठवड्याभरातच तुम्हाला  चांगला परिणाम दिसून येईल. 

नियमित एलोवेरा जेल केसांना लावल्यास कोणते फायदे मिळतात (Aloe Vera Hair Gel)

जर तुम्ही नियमित एलोवेरा जेल केसांना लावले तर केसांची हरवलेली चमक परत येईल केस मजबूत होतील आणि डोक्यात खाज, जळजळही होणार नाही. याव्यतिरिक्त केस जास्तीत  जास्त हेल्दी राहतील आणि केसांची चांगली वाढ होईल केस कंबरेपर्यंत लांब राहण्यासही मदत होईल. तेलकट केसांची समस्या दूर होते आणि सिबम प्रोडक्शन कंट्रोल होते.  ज्यामुळे हेअर फॉल रोखता येतो. याचा वापर  करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी