Join us  

ओ अंटवा फेम समंथा ग्लोइंग स्किनसाठी पिते कोलॅजन ड्रिंक! ते ड्रिंक नेमकं असतं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2022 2:01 PM

तरुण, तेजस्वी आणि चमकदार त्वचेसाठी अभिनेत्री (Samantha's secret of glowing skin) समांथा रोज सकाळी न चुकता कोलॅजन ड्रिंक (collagen drink for glowing skin) घेते. कोलॅजन ड्रिंक हेच समांथाचं ग्लोइंग स्किन सिक्रेट आहे.

ठळक मुद्दे भाज्या फळं यांचा वापर करत  स्मूदी किंवा ज्यूसच्या स्वरुपात हे कोलॅजन ड्रिंक घरीही करता येतं. कोलॅजन ड्रिंकसाठीची पावडर बाहेर विकत देखील मिळते.कोलॅजन ड्रिंकसोबतच खाण्यातही ,कोलॅजन वाढण्यास मदत करतील अशा पदार्थांचा समावेश करायला हवा.

अभिनेत्री समांथा  (Samantha) आपल्या सोशल मीडियावरुन आपल्या फिटनेस, डाएट, वर्कआउटवरच्या पोस्ट कायम शेअर करत असते. समांथाची लोकप्रियता एवढी आहे की तिची प्रत्येक पोस्ट व्हायरल होते. समांथा फिटनेससाठी काय करते याची उत्सुकता जशी वाचकांमध्ये असते तशीच उत्सुकता तिच्या ग्लोइंग स्किनसाठी (Samantha's secret of glowing skin)  देखील आहे. समांथानं आपलं ग्लोइंग स्किन सिक्रेट लपवून ठेवलेलं नाही. तरुण, तेजस्वी आणि चमकदार त्वचेसाठी समांथा रोज सकाळी न चुकता कोलॅजन ड्रिंक (collagen drink)  घेते. कोलॅजन ड्रिंक (collagen drink for glowing skin)  हेच समांथाचं ग्लोइंग स्किन सिक्रेट आहे.

Image: Google

हे कोलॅजन ड्रिंक आहे काय?

त्वचेखाली कोलॅजनची निर्मिती होत असते हे माहिती आहेच. ती वाढवण्यसाठी मदत करणारं पेयं म्हणजे कोलॅजन ड्रिंक. भाज्या फळं यांचा वापर करत हे कोलॅजन ड्रिंक घरीही करता येतं किंवा कोलॅजन ड्रिंकसाठीची पावडर बाहेर विकत देखील मिळते. काॅफीमध्ये घालून किंवा ज्यूसमध्ये घालूनही कोलॅजन ड्रिंक करता येतं. 

कोलॅजन म्हणजे प्रथिनांचा समूह. हा समूह त्वचा, हाडं, हाडांची साखळी, स्नायुंच्या पेशीत आढळतो.  पण जसं वय वाढतं तशी शरीरात कोलॅजनची निर्मिती कमी तर होतेच पण कोलॅजन निर्मितीचा दर्जाही खालावतो. त्याचा परिणाम त्वचेवर, हाडं आणि स्नायुंवर दिसून येतो. चेहरा चांगला दिसावा म्हणून क्रीम्स, लोशन्स वापरल्या जातात. पण त्वचेतली कोलॅजनची ताकद वाढवल्यास विना मेकअप चेहेरा नैसर्गिकरित्या छान दिसतो. कोलॅजनमुळे त्वचेची ताकद वाढते.  कोलॅजनमुळे त्वचेची लवचिकता वाढते. त्वचेतला ओलावा टिकून राहातो. खराब झालेली त्वचा दुरुस्त करण्यास आणि एजिंगची प्रक्रिया मंद करण्यास कोलॅजनचा उपयोग होतो. कोलॅजनमुळे खराब त्वचा निघून जाते, चेहेऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात. कोलॅजनमुळे सांधे आणि स्नायुंच्या वेदनांवर आराम मिळतो. हाडं मजबूत होतात आणि हदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. सौंदर्य आणि फिटनेससाठी कोलॅजन हा घटक महत्वाची भूमिका निभावतो. अशा या कोलॅजनची काळजी घेण्यासाठी कोलॅजन ड्रिंक प्यायचं असतं. 

Image: Google

कोलॅजन ड्रिंक कसं तयार करायचं?

कोलॅजन ड्रिंक तयार करण्यासाठी अर्धी काकडी, 1 इंच आलं, 15-20 पुदिन्याची पानं, अर्ध्या लिंबाचा रस आणि पालकाची पानं  घ्यावी. कोलॅजन ड्रिंक तयार करताना काकडी धुवून बारीक चकत्या करुन चिरुन घ्यावी. आलं धुवून , साल काढून बारीक चिरुन घ्यावं. पुदिन्याची पानं धुवून घ्यावीत. पालकाची पानं धुवून घ्यावीत. हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यात घालावं. त्यात लिंबाचा रस पिळून टाकावा. सर्व जिन्नस मिक्सरमधून बारीक करुन घेतलं की कोलॅजन ड्रिंक तयार होतं. कोलॅजन ड्रिंक नाश्त्याच्या अर्धा तास आधी घ्यावं असा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. 

Image: Google

कोलॅजन ड्रिंकसोबतच खाण्यातही ,कोलॅजन वाढण्यास मदत करतील अशा पदार्थांचा समावेश करायला हवा. कोलॅजन वाढवण्यासाठी क जीवनसत्वं असलेली फळ, भाज्या, प्रोलिन घटक मिळण्यासाठी दुधाचे पदार्थ यांचा समावेश रोजच्या आहारात केल्यास कोलॅजन निर्मितीला चालना मिळते. बाहेर कोलॅजनची पावडर देखील मिळते. तिचाही वापर करुन ज्यूस, काॅफी तयार करता येते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमांथा अक्कीनेनी