“ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए... गाना आये या ना आए गाना चाहिए" या हिंदी गाण्याच्या ओळी अतिशय लोकप्रिय आहेतच. उन्हाळ्यात बहुतेकवेळा आपण वाढत्या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करणे पसंत करतो. परंतु पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वातावरणातील गारठ्यामुळे आपण शक्यतो गरम पाण्याने आंघोळ करतो. गरम पाण्याने आंघोळ करण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने देखील आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळतात.
सध्याच्या काळात सिलेब्रिटी हे आपल्या त्वचेची व आरोग्याची खूपच काळजी घेताना दिसून येतात. यासाठी हे सिलेब्रिटी महागड्या ट्रिटमेंट्स किंवा इतर काही थेरपीचा वापर करताना दिसून येतात. या थेरपी किंवा ट्रिटमेंट्स त्वचा, केस किंवा फिटनेस यांसारख्या अनेक कारणांसाठी केल्या जातात. सध्या सगळीकडे अशाच एका थेरपीची चर्चा होताना दिसत आहे. समंथा प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. समंथाने इंडोनेशियामध्ये तिची ट्रिप एन्जॉय करीत असताना ती प्रवास, फिटनेस आणि निरोगीपणाची इतरांना प्रेरणा देत होतीच. खरे तर, समांथा मागील एक वर्षाहून अधिक काळ ‘ऑटोइम्युन कंडिशन मायोसिटिस’ नावाच्या आजाराचा सामना करत आहे. अशातच ती आता इंडोनेशियातील बालीच्या हिरव्यागार बेटावर अधिक वेळ घालवताना दिसत आहे. समंथा इंडोनेशियातील ट्रिपमधील अनेक फोटो व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड करीत आहे. यावेळी तिने इंडोनेशियामध्ये ४ अंश तापमान असताना सहा मिनिटे बर्फात अंघोळ केल्याची स्टोरी टाकली होती. तिच्या या कोल्ड वॉटर थेरपीची (Cold Water Therapy) सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे(Samantha Ruth Prabhu takes ice bath at 4 degrees for six minutes; how does it help?).
कोल्ड वॉटर थेरपी (Cold Water Therapy) म्हणजे नेमके काय ?
जेव्हा तुम्ही १५ डिग्री किंवा त्याहून कमी, थंडगार पाण्याने १० ते १५ मिनिटे आंघोळ करता तेव्हा त्याला कोल्ड वॉटर थेरपी (Cold Water Therapy) किंवा हायड्रोथेरपी असे म्हणतात. ही थेरपी सध्या खूप जास्त लोकप्रिय आहे. ही एक अशी थेरपी आहे ज्याद्वारे शरीराला आराम मिळतो.अनेक अभ्यासातून हे देखील समोर आले आहे की या थेरपीमुळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची पातळी वाढते.
महागडे प्रयोग कशाला, ५ सोपे उपाय-केस गळणं बंद ! जावेद हबीब सांगतात सोपे स्मार्ट उपाय...
कोल्ड वॉटर थेरपी (Cold Water Therapy)चे फायदे :-
१. कोल्ड वॉटर थेरपी (Cold Water Therapy) स्नायूंना आराम देण्यास मदत करते, तसेच याच्यामुळे व्यायामानंतर तुम्हाला ताजेतवाने वाटते, महत्वाचे म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय क्रिया सुधारते आणि तुमचा मूड देखील सुधारतो. संशोधनात असे दिसून आले आहे की कोल्ड वॉटर थेरपी घेतल्याने डोपामाइनचे प्रमाण सुमारे २५० टक्क्यांनी वाढते.
२. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की कोल्ड वॉटर थेरपी (Cold Water Therapy) मुळे मन शांत होते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्यासारख्या लक्षणांपासून आराम मिळतो. बर्याच संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरात संसर्गाशी लढणारी रसायने बाहेर पडतात, जी शरीराची प्रतिकारशक्ती व चयापचय क्रियेचा वेग देखील वाढवतात.
पस्तावाल, पश्चाताप होईल, रडाल ! प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांना काजोलचा सावधगिरीचा सल्ला...
३. शरीर जास्त गरम असताना थंड पाण्यात बुडवून बसल्यास, अतिउष्णतेपासून त्वरित आराम मिळतो. तसेच मनालाही शांती मिळते.
४. सहसा सेलिब्रिटी किंवा खेळाडू थंड पाण्याने आंघोळ करतात. याचे कारण असे की थंड पाणी रक्तवाहिन्या आकुंचन पावते, ज्यामुळे वेदनादायक भागात रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे सूज किंवा वेदना कमी होते. यामुळेच दुखापत झाल्यास किंवा स्नायूंना ताण आल्यास बर्फाने फोमेंटेशन करण्याची शिफारस केली जाते.
क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?
५. डच अभ्यासातून असे काही पुरावे आहेत की कोल्ड वॉटर थेरपी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित करू शकते. हे रोगाशी लढण्याची तुमची क्षमता सुधारू शकते.त्यामुळे पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते ज्यामुळे शरीराला रोगांपासून संरक्षण मिळते.
६. कोल्ड वॉटर थेरपी घेतल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. वास्तविक कोल्ड वॉटर थेरपी आपल्या शरीरातील ब्राऊन फॅट्सना ऍक्टिव्ह करते ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, याशिवाय जास्त प्रमाणात कॅलरीज देखील बर्न होतात.