Join us  

चंदन पावडर आणि मध, दोनच गोष्टींचा घरगुती फेसपॅक! चेहरा उजळेल- त्वचा नितळ आणि साईड इफेक्ट शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2023 11:52 AM

Sandalwood powder and honey, a homemade face pack, will give a perfect glow चंदन फेसपॅक या पारंपारिक आणि घरगुती उपायामुळे चेहऱ्याला नवी चमक मिळेल.

धावपळीचे आयुष्य, अपुरी झोप, ताणतणाव यासह इतर गोष्टींमुळे त्वचेच्या निगडीत समस्या वाढतात. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी चंदन फेसपॅक उपयुक्त ठरेल. नैसर्गिक तेज आणण्यासाठी चंदन मदतगार ठरेल. त्वचेसाठी चंदनाचा वापर फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. ब्युटी केअर रुटीनमध्ये महिलावर्ग याचा वापर आवश्यक करतात. यातील आयुर्वेदिक घटक त्वचेवरील डाग, मुरुम आणि रुक्षपणा कमी करतात. त्यामुळे चंदनाला आयुर्वेदात अधिक महत्त्व आहे.

यासह त्यातील जळजळविरोधी ते अँटीऑक्सिडंटपर्यंतचे अनेक गुणधर्म, त्वचेच्या संबंधित समस्या दूर करतात. आता लवकरच उन्हाळा सुरु होईल. कडक उन्हामुळे त्वचेचे भरपूर नुकसान होते. यासाठी चंदनापासून तयार फेसपॅकचा नियमित वापर करा. पारंपारिक पद्धतीने जर याचा वापर केल्यास चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळेल.

चंदनापासून तयार करा पारंपारिक फेसपॅक

या फेसपॅकसाठी लागणारं साहित्य

चंदन

मध

असा बनवा पारंपारिक फेसपॅक

चंदनाच्या पाटावर चंदन घासून चंदन पेस्ट तयार करा. अथवा चंदन पावडर घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका वाटीत घ्या. त्यात २ टेबलस्पून मध मिसळा. चंदन पेस्ट आणि मध एकत्र चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर हे मिश्रण २० मिनिटे ठेवा. मिश्रण सुकल्यानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे चेहरा नितळ व स्वच्छ दिसेल. आपण या फेसपॅकचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

चंदनामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते. तर कच्चे मध हे नैसर्गिक एक्सफॉलिएटर म्हणून काम करते. या दोन्ही साहित्यांच्या मिश्रणामुळे त्वचेवरील कोरडी आणि मृत त्वचा निघते. यासह त्वचेला नवी चमक मिळते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी