Join us  

 सारा अली खानचा चमकदार त्वचेसाठी खास फॉर्म्युला, ती म्हणते मॉइश्चरायझर आणि  बॉडी लोशन नकोच!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:52 PM

सारा अली खानची त्वचा एवढी चमकते कशी? या कुतुहलमिश्रित प्रश्नांचं उत्तर सारानंच दिलं आहे. बॉडी ऑइलमुळे माझी त्वचा चमकते. मी सतत तजेलदार दिसते ते बॉडी ऑइलमुळेच. किती सोपं उत्तर आहे हे. अनेक सौंदर्य तज्ज्ञ मॉइश्चरायझर, बॉडी लोशन यापेक्षा बॉडी ऑइलचा उपयोग फायदेशीर असतो असं सांगतात.

ठळक मुद्देत्वचा ओलसर ठेवणं एवढंच बॉडी ऑइल काम करत नाही. त्वचेसंबंधित समस्याही बॉडी ऑइलच्या उपयोगानं जातात.बॉडी ऑइलच्या उपयोगानं आरामदायी वाटतं शिवाय भावनिक दृष्ट्या आनंदी वाटतं.हे बॉडी ऑइल मसाज करत लावल्यास त्वचेला पोषण करणार्‍या घटकांची वाढ होते. तसेच बॉडी ऑइलच्या मसाज केल्यानं स्नायू दुखी, सांधे दुखी कमी होते.छायाचित्रं- गुगल

सौंदर्याच्या बाबतीत मुली , बायका या मालिका, चित्रपटातील अभिनेत्रींच्या सौंदर्य उपचारांना फॉलो करत असल्याचं आढळून आलं आहे. मुळात यात चूक काय आहे? फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत आपण करत असलेल्या गोष्टी मालिका आणि चित्रपटातील अभिनेत्री सोशल मीडियावरुन व्हायरल करत असतात. उपयुक्त माहितीचा प्रसार कुठूनही झाला तरी तो हवाच असतो. आणि जर खुद्द आपल्या आवडत्या अभिनेत्री सौंदर्य जपण्याच्या सहज सोप्या युक्त्या सांगत असतील तर त्या कोणाला नको असतात?

सारा अली खानची त्वचा एवढी चमकते कशी? या कुतुहलमिश्रित प्रश्नाचं उत्तर सारानंच दिलं आहे. बॉडी ऑइलमुळे माझी त्वचा चमकते. मी सतत तजेलदार दिसते ते बॉडी ऑइलमुळेच. किती सोपं उत्तर आहे हे.अनेक सौंदर्य तज्ज्ञ मॉइश्चरायझर, बॉडी लोशन यापेक्षा बॉडी ऑइलचा उपयोग फायदेशीर असतो असं सांगतात. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पातळीवर बॉडी ऑइलचा उपयोग प्रभावी आणि लाभदायक ठरतो म्हणून बॉडी ऑइल अवश्य वापरावं असं सांगतात. तज्ज्ञांनी सांगितलेली ही कारणं वाचून कोणीही बॉडी ऑइलचा विचार करेल हे नक्की.

छायाचित्र- गुगल

बॉडी ऑइल वापरावं कारण...

1 ऋतु कोणताही असो आपल्या त्वचेला मॉश्चरायझर आवश्यक असतं. ते कमी पडलं की त्वचा खराब होतेच. त्वचा मॉश्चराइज करण्यासाठी आपण सहजपणे बॉडी लोशन किंवा मॉश्चरायझरचा वापर करतो. पण ते ( कितीही) अंगाला लावलं की थोड्याच वेळात त्वचा पुन्हा कोरडी पडते. त्वचा दीर्घकाळ ओलसर ठेवण्यासाठी, व्यवस्थित मॉश्चराइज होण्यासाठी बॉडी ऑइलचा उपयोग जास्त प्रभावीपणे होतो.अनेकांना त्वचेसाठी तेल ही संकल्पनाच पटत नाही. तेल लावल्यानं त्वचा तेलकट, मेणचट दिसते असं त्यांचं मत. पण बॉडी ऑइल हे त्वचेत पटकन शोषलं जातं, ते खोलवर जातं , त्वचेवर त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहातो आणि तरीही त्वचा तेलकट दिसत नाही हे विशेष. बॉडी ऑइलच्या उपयोगामुळे त्वचेतला आरोग्यदायी ओलावा टिकून राहातो. त्वचा छान मऊ होते. बॉडी ऑइल लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ केलेली असावी. त्यावर कोणतंही क्रीम वगैरे असू नये. आंघोळ केल्यानंतर बॉडी ऑइल लावणं हे उत्तम. बॉडी ऑइल लावल्यानंतर पाच मिनिटांनी कपडे घालावेत. म्हणजे तेल त्वचेत चांगलं मुरतं.बॉडी ऑइल हे मुलायम, घट्टसर आणि नितळ असतं. चांगले बॉडी ऑइल हे नैसर्गिक असतात, त्यात रासायनिक घटकांचा अंशही नसतो. झाडांची मुळं, फळं, फुलं आणि पानांच्या अर्कापासून ती तयार केली जातात. या बॉडी ऑइल्समुळे त्वचेचा पोत चांगला होतो, त्वचेची गुणवत्ता सुधारते.

2 त्वचा ओलसर ठेवणं एवढंच बॉडी ऑइल काम करत नाही. त्वचेसंबंधित समस्याही बॉडी ऑइलच्या उपयोगानं जातात. त्यासाठी त्या त्या प्रकारचं बॉडी ऑइल निवडावं लाग्तं. टी ट्री बॉडी ऑइल लावल्यास मुरुम पुटकुळ्या , डाग जातात, त्वचेतीला अशुध्दता बाहेर पडते. नवीन चांगली त्वचा येण्यास हे ऑइल मदत करतं तसेच ताण तणावामुळे निर्माण होणार्‍या त्वचेच्या समस्या कमी होतात. त्वचेला छान मऊ आणि थंड वाटावं यासाठी लवेण्डर किवा व्हॅनिला बॉडी ऑइल वापरावं. हे बॉडी ऑइल मसाज करत लावल्यास त्वचेला पोषण करणार्‍या घटकांची वाढ होते. तसेच बॉडी ऑइलच्या मसाज केल्यानं स्नायू दुखी, सांधे दुखी कमी होते. कर्करोग आणि मानसिक विकारातही या बॉडी ऑइलचा उपयोग होतो असं संशोधनातून आढळून आलं आहे.

छायाचित्र- गुगल

3 बॉडी ऑइलमुळे त्वचा ओलसर आणि चमकदार होते. शरीराच्या वेदना कमी होतात तसेच मानसिक आरोग्यावरही बॉडी ऑइलचा सकारात्मक परिणाम होतो. बॉडी ऑइलच्या उपयोगानं आरामदायी वाटतं शिवाय भावनिक दृष्ट्या आनंदी वाटतं. शरीर आणि मनावरचा ताण जातो, मनातली भीती कमी होते. मूड सुधारतो. मनाची ऊर्जा वाढते. बॉडी ऑइल लावताना जी मसाज होते त्यामुळेही त्वचा, शरीर आणि मनाला फायदे होतात.

4 शारीरिक मानसिक पातळीवर लाभदायी असणारे बॉडी ऑइल्स हे आर्थिकदृष्ट्याही खूप परवडणारे असतात. बॉडी ऑइल हे महागडी वाटतात. पण ती वापरताना एकदमच कमी लागतात आणि त्यांचे परिणामही प्रभावी असतात त्यामुळे मॉश्चरायझर आणि बॉडी लोशनच्या मोठमोठ्याल्या बॉटल्सपुढे बॉडी ऑइलची छोटीशी बाटलीही पुरेशी ठरते आणि परवडतेही. मॉश्चरायझर किंवा बॉडी लोशन कितीही लावलं तरी त्वचेची तहान भागत नाही. तीच तहान बॉडी ऑइलच्या काही थेंबानी शमते. बॉडी ऑइल वापरण्यापूर्वी ते छोट्या वाटीत काढून तव्यावर ठेवून हलकंसं गरम करावं. म्हणजे त्यांचा घटटपणा कमी होतो. आणि थोडंसं बॉडी ऑइलही मग पुरतं.

 

छायाचित्र- गुगल

5 बॉडी ऑइलचा वापर करण्याची मसाज ही एक चांगली पध्दत आहे. जर त्वचा खूपच कोरडी असली तर आंघोळीआधी बॉडी ऑइलनं मसाज करावा. पंधरा मिनिटांनी आंघोळ करावी. किंवा त्वचा सामान्य असेल तर आंघोळीनंतर बॉडी ऑइलनं मसाज करावं. शरीर ओलसर असल्यानं तेल त्वचेत पटकन शोषलं जातं. किंवा आंघोळीच्या पाण्यात बॉडी ऑइलचे काही थेंब टाकून आंघोळ केली तरी त्वचेला फायदा होतो. पण सौंदर्यतज्ज्ञ बॉडी ऑइल हे मसाज करत लावल्याने त्याचा त्वचा, शरीर आणि मनाला असलेला फायदा खूप असल्याचं सांगतात.