Lokmat Sakhi >Beauty > छान चापूनचोपून साडी नेसायची तर या घ्या ५ स्मार्ट ट्रिक्स! नेसा परफेक्ट साडी झटपट

छान चापूनचोपून साडी नेसायची तर या घ्या ५ स्मार्ट ट्रिक्स! नेसा परफेक्ट साडी झटपट

How to Drape Saree Quickly: साडी नेसणं आता अगदी सोप्पं, परफेक्ट पद्धतीने साडी नेसा (saree draping) आणि ती ही अगदी फटाफट. बघा या काही ट्रिक्स आणि साडी नेसताना आठवणीने फॉलो करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 06:19 PM2022-07-07T18:19:46+5:302022-07-07T19:00:18+5:30

How to Drape Saree Quickly: साडी नेसणं आता अगदी सोप्पं, परफेक्ट पद्धतीने साडी नेसा (saree draping) आणि ती ही अगदी फटाफट. बघा या काही ट्रिक्स आणि साडी नेसताना आठवणीने फॉलो करा.

Saree Draping in 5 Minutes: 5 Simple saree hacks, How to wear saree perfectly, 5 Tips for saree draping, Smart look in saree | छान चापूनचोपून साडी नेसायची तर या घ्या ५ स्मार्ट ट्रिक्स! नेसा परफेक्ट साडी झटपट

छान चापूनचोपून साडी नेसायची तर या घ्या ५ स्मार्ट ट्रिक्स! नेसा परफेक्ट साडी झटपट

Highlightsसाडी नेसताना काही जणी पेटीकोट खूप वर घालतात, तर काही जणी खूपच खाली घालतात. या दोन्ही गोष्टींमध्ये पोट पुढे आल्यासारखे दिसू शकते आणि तुमचा संपूर्ण लूकच खराब होऊ शकतो.credit : Jonali Tamuly

साडी नेसायला अनेक जणींना आवडतं. पण नेमका घोळ असा होतो की साडी नेसायला खूप वेळ लागतो. आणि एवढा वेळ देऊनही कुठून तरी पदराची एखादी प्लेट तरी निसटते, निऱ्या तरी खाली- वर होतात किंवा मग साडी (How to wear saree perfectly) अशा पद्धतीने नेसली जाते की खूपच अवघडून गेल्यासारखं होतं. अनेक जणींच्या या तक्रारीवर हे बघा एक परफेक्ट सोल्युशन (5 Tips for saree draping). साडी नेसण्याच्या या काही छोट्या छोट्या ट्रिक्स इन्स्टाग्रामच्या sundarii_handmade या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आल्या आहेत. या ट्रिक्स प्रत्येकीसाठीच अगदी नक्की उपयोगाला येतील अशाच आहेत..(Easy way of saree draping)

 

साडी नेसताना लक्षात ठेवा या टिप्स आणि ट्रिक्स
१. साडी नेसताना काही जणी पेटीकोट खूप वर घालतात, तर काही जणी खूपच खाली घालतात. या दोन्ही गोष्टींमध्ये पोट पुढे आल्यासारखे दिसू शकते आणि तुमचा संपूर्ण लूकच खराब होऊ शकतो. त्यामुळे नाभीच्या बरोबर खाली येईल, अशा पद्धतीने पेटीकोट घाला. यामुळे पोटही दिसत नाही आणि साडी खूप वर गेल्यासारखी किंवा खूपच खाली आल्यासारखीही वाटत नाही.

 

२. दुसरी गोष्ट म्हणजे साडीच्या निऱ्या पुरेशा येणं खूप गरजेचं असतं. खूप कमी निऱ्या आल्या तरी साडीचा लूक बिघडतो किंवा मग खूप जास्त निऱ्या असल्या तरी समोरच्या बाजूने पाेटाजवळ फुगल्यासारखे वाटते. बऱ्याचदा साडीतून ब्लाऊज पीस काढले की निऱ्या कमी येतात. काही जणी साडी अगदी पोटाच्या उजव्या बाजूने नेसायला सुरुवात करतात. त्यामुळेही निऱ्या कमी येतात. म्हणून कधीही साडीची सुरुवात करताना ती बरोबर मधोमध किंवा नाभीच्या किंचित डाव्या बाजूने करावी. यामुळे निऱ्या व्यवस्थित येतात.

 

३. काही जणींना निऱ्या कुठे खोचाव्यात हे समजत नाही. कधी निऱ्या खूपच उजवीकडे जातात तर कधी खूपच डावीकडे. त्यामुळे निऱ्या खोचताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा. नाभीच्या बरोबर सरळ लाईनमध्ये निऱ्या खोचल्या गेल्या पाहिजेत. यामुळे साडीचा लूक अतिशय परफेक्ट येतो.
४. निऱ्या घालून झाल्या आता पदराकडेही लक्ष द्यायला पाहिजे. साडीचा पदर खूप मोठा किंवा खूपच लहान झाला तरीही ते अगदी विचित्र दिसते. त्यामुळे पदर घेताना तो गुडघ्याच्या खाली आणि पोटऱ्यांच्या वर राहील अशा पद्धतीने घ्या. 

 

पदराच्या प्लेट्स घालण्याची योग्य पद्धत
पदर घेताना अनेक जणींची तारांबळ उडते. पदर हातावर फ्लोटिंग घ्यायचा असेल तर ते एकवेळ चटकन जमून जाते. पण पदराच्या प्लेट्स घालणं म्हणजे मोठीच कसरत. पदराच्या प्लेट परफेक्ट याव्या, यासाठी पदर जिथे आपल्या खांद्यावर येतो, तिथून तो दुमडून घ्या. दुमडलेल्या पदराच्या प्लेट घाला. सगळ्या प्लेट एकदा सारख्या करून घ्या. त्यानंतर अर्धा पदर खांद्यावर टाका. अगदी झटपट पदर व्यवस्थित पिनअप होऊन जाईल. 

 

Web Title: Saree Draping in 5 Minutes: 5 Simple saree hacks, How to wear saree perfectly, 5 Tips for saree draping, Smart look in saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.