गौरी- गणपती हे बहुतांश लोकांचे आवडते सण. एकतर त्या सणांमध्ये गौरी असो किंवा गणपती असो... ते आपल्या घरी आल्याचा एक वेगळाच आनंद असतो. शिवाय या सणांमध्ये मखर, आरास यामुळे सजावटीसाठी, आपल्यातलं कलाकौशल्य दाखविण्यासाठी खूप वाव असतो. त्यामुळे या सणांमध्ये सगळं घरच कसं आनंदून जातं. गौरी गणपतीचं स्वागत करण्यासाठी अनेक जणी साडी नेसायचं ठरवतात आणि नेसतातही. पण नंतर मात्र काही काम सूचतच नाही, कधी एकदा साडी सोडून नेहमीचा ड्रेस अंगावर लटकवते, असं होऊन जातं (How to wear saree comfortably?). म्हणूनच असं होऊ नये, म्हणून साडीची तसेच दागिन्यांची निवड करताना काेणत्या गोष्टी आवर्जून कराव्या, यासाठी काही टिप्स.... (3 Tips for saree draping during Gauri Ganapati festive season)
साडी नेसल्यावर काम सुचत नसेल तर...
१. साडीची निवड
धावपळ, कामांची गडबड असं असताना साडी नेसणार असाल तर ती कॉटन सिल्क, कॉटन, सॉफ्ट सिल्क या प्रकारातली नेसावी. कारण या साड्या अंगावर चापून चोपून बसतात.
गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट
शिवाय त्या खूप जडही नसतात. त्यामुळे या साड्या सांभाळणं सोपं जातं. त्यांच्यावर चुकून डाग वगैरे पडला तरी चालून जातं. शिफॉन किंवा जरी वर्क असणाऱ्या, खूप हेवी वर्क असणाऱ्या काठपदर साड्या नेसणं टाळावं. या साड्या सुळसुळ्या किंवा खूप जड असल्यानं सांभाळणं कठीण जातं.
२. साडी पिनअप करा
एरवी कामं मागे नसताना हातावर मोकळा पर सोडला तरी चालतं. पण कामाच्या धावपळीत मात्र साडी व्यवस्थित पिनअप करूनच घ्या.
एक पिन पदराच्या बारीक प्लेट घेऊन पदराला लावा. तसेच एक पिन समोरून पदर सटकणार नाही, अशा पद्धतीने लावावी. निऱ्या घालून निऱ्यांना एक पिन लावावी. साडी एकदम कम्फर्टेबल वाटेल.
३. दागिने निवड
खूप जड नसणाऱ्या आणि वर्क नसणाऱ्या बांगड्या घाला. वर्क असणाऱ्या बांगड्यांमध्ये बऱ्याचदा साडीचे धागे अडकतात आणि मग काम करताना काही सुचत नाही.
शेवटच्या क्षणी घाईघाईत भारी डेकोरेशन करायचंय? घ्या आयडिया, हवी फक्त १ ओढणी- करा आरास भारी
तसेच कानातले आणि गळ्यातलेही खूप हेवी नको. केस शक्यतो मोकळे साेडू नका. अंबाडा किंवा स्टाईलिश वेणी घालून ते व्यवस्थित सेट करून टाका. म्हणजे मग आणखीनच आरामदायी वाटेल.