Join us  

Saree Draping Tips: साडी नेसून चालणं अवघड, अडखळून पडायची भीती वाटते? ३ उपाय, साडी नेसून चाल डौलदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 1:15 PM

Simple Tricks To Manage Saree In Event: बऱ्याच तरुणींना हा त्रास अक्षरश: छळतो. साडी नेसल्यावर खूपच अवघडल्यासारखं वाटायला लागतं.. म्हणूनच तर साडी नेसूनही अगदी बिंधास्त डौलदारपणे कसं चालायचं, याच्या या खास टिप्स

ठळक मुद्देसाडी नेसून इकडे- तिकडे वावरायचं असेल, चालायचं असेल तर फारच पंचाईत होते.म्हणूनच तर या बघा काही टिप्स.. साडी नेसूनही चाल असेल डौलदार...

साडी नेसायला तर खूप आवडते.. पण त्यात अजिबातच कम्फर्टेबल वाटत नाही, असा आपलाही अनुभव असतो. त्यात जर साडी नेसून इकडे- तिकडे वावरायचं असेल, चालायचं असेल तर फारच पंचाईत होते. खरी गंमत तर साडी नेसून पायऱ्या चढताना- उतरताना होते.. (how to manage saree properly?) एरवी आपण झपाझप जिन्यावरून चालतो. पण साडी नेसली की एका हाताने पदर सावरा, दुसऱ्या हाताने निऱ्या वर पकडा अणि मग हळूहळू एकेक पाऊल टाकून तिरकं तिरकं चालत पायऱ्या चढा किंवा उतरा, असंही अनेकींचं होतं.. म्हणूनच तर या बघा काही टिप्स.. साडी नेसूनही चाल असेल डौलदार...(comfortable walk in saree)

 

साडी नेसून चालणं सोपं व्हावं यासाठी काही खास टिप्स..१. साडी नेसताना ...ही सगळ्यात पहिली स्टेप. तुम्ही साडी जर योग्य पद्धतीने नेसली तरच तुमचं साडी नेसून चालणं अधिक आरामदायी होऊ शकतं. त्यामुळे साडी नेसण्याचे काही बारकावे लक्षात घ्या. साडी नेसल्यावर हिल्स घालणार असाल तर ते आधी पायात घाला आणि नंतर साडी नेसा. जेणेकरून निऱ्या किती लांब ठेवायच्या याचा अंदाज येतो. साडी नेसल्यावर एका हातावर फ्लोटिंग पल्लू घेणार असाल तर खालच्या पदराचा काठ कंबरेजवळ पिनअप करा. यामुळे काठ सारखा सारखा सावरावा लागणार नाही. तसंच सगळ्या निऱ्या एकत्र करून त्यांनाही एक मोठी पिन लावून टाका. जेणेकरून साडी तुमचं चालणं, हलणं अधिक आरामदायी होऊन जाईल.

 

२. हिल्स घातल्यावर...हिल्स घातल्यानंतर चालणं मुळात थोडं अवघड होतं. त्यात साडी म्हणजे आणखीनच अडचण. यासाठी ज्या हिल्स तुम्ही घालणार आहात, त्या परफेक्ट तुमच्या मापाच्या असाव्या, त्याचे बेल्ट पक्के असावे. हिल्स घालतान जेव्हा तुम्ही चालणार तेव्हा हिल्स आधी जमिनीवर टेकवा आणि नंतर बाकीचा पाय टेकवा. यामुळे चालण्यात वेगळाच डौल येतो. तसंच दोन्ही पाऊलांमधलं अंतर योग्य ठेवा. चालताना उजवा पाय उजवीकडे, डावा पाय डावीकडे असं टाकण्यापेक्षा एका पाऊलाच्या पुढे दुसरं पाऊल टाका.

 

३. पायऱ्या चढताना- उतरताना आणि चालताना....पायऱ्या चढताना किंवा उतरताना पदर किंवा निऱ्या पायाखाली येणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच जणींची यावेळी खूप तारांबळ उडते. मग दोन्ही हातांनी साडी वर उचलून धरली जाते, ते समोरून बघणाऱ्याला खूपच विचित्र दिसतं. असं होऊ नये म्हणून साडीच्या पदराचे टाेक उचलून मागच्या बाजुने पुढे आणा आणि डाव्या हातात अलगद पकडा. पदराचे टोक पकडतानाच अंगठा अलगद निऱ्यांच्या खाली घ्या आणि सगळ्या निऱ्या एकत्रितपणे थोड्याशा उचलून धरा. अशा पद्धतीने केवळ डाव्या हातानेच पदर आणि निऱ्या दोन्हीही सांभाळले जाईल आणि उजवा हात पुर्णपणे मोकळा असेल. शिवाय समोरून बघणाऱ्यालाही ते विचित्र वाटणार नाही. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशन