Join us  

Saree Fashion Tips : सिंपल साडी नेसून क्लासी लूक हवाय? मग या घ्या चित्रांगदा सिंहच्या स्टायलिंग टिप्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 7:04 PM

Saree Fashion Tips : बॉलीवुड अभिनेत्री  चित्रांगदा सिंह ही नेहमीच साडीवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा चित्रांगदानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर  ट्रेडिशनल आऊटफिटमधील फोटो शेअर केला आहे. 

ठळक मुद्देया लूकमध्ये, चित्रांगदा  सिंगने लाल रंगाची बनारसी सिल्क साडी नेसली आहे, यात तिचा लूक क्लासी दिसतोय.जर तुम्हाला असे वाटत असेल की पांढऱ्या साडीतील तुमचा लुक बोअरिंग वाटतो, तर  चित्रांगदाच्या या लूक वरून एक चांगली आयडिया मिळेल.

(Image Credit- Instagram/Chitrangda Singh social media)

आपण वेस्टर्न ड्रेस कितीही घातले तरी फॅमिली फंक्शन किंवा  लग्नाला जाताना क्लासी लूकसाठी साडीचीच निवड बायका करतात.  तर कधी पारंपारीक ड्रेसना प्राधान्य दिलं जातं. ट्रेडिशनल लूक करायचाय पण स्टायलिस्ट दिसायचं असं अनेकदा होतं.  बॉलीवुड अभिनेत्री  चित्रांगदा सिंह ही नेहमीच साडीवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा चित्रांगदानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर  ट्रेडिशनल आऊटफिटमधील फोटो शेअर केला आहे. 

या लूकमध्ये, चित्रांगदा  सिंगने लाल रंगाची बनारसी सिल्क साडी नेसली आहे, यात तिचा लूक क्लासी दिसतोय. चित्रांगदा सिंगने या साडीसह बोट-नेक डिझाईन ब्लाऊज घातले आहे. अॅक्सेसरीजमध्ये चित्रांगदानंने हेवी डायमंड नेकलेक घातला आहे. हेअरस्टाईल करताना तिनं फिशटेल वेणी घातली आहे. 

1) ब्लू लेहेंगा

चित्रांगदाने शाही निळ्या रंगाचा लेहेंग्यातील तिचे फोटो शेअर केले आहेत. लेहेंगातील क्लासिक एम्ब्रॉयडरी आणि निखळ दुपट्टामुळे तिचा लुक खूप खास झाला. ज्वेलरीमध्ये तिने पारंपारिक नेकलेस सेटसह तिचा लूक आणखी ग्लॅमरस बनवला आहे. 

2) पिंक, ब्लू स्कर्ट विद ब्लाउज

 

जर तुम्हाला ट्विस्टसह एथनिक लूक करायचा  असेल तर चित्रांगदाचा हा लूक नक्की बघा.  यामध्ये तिने स्कर्ट आणि ब्लाऊजसह खास लूक केला आहे. यामध्ये तिनं जास्त दागिनं घालणं टाळलंय कारण लेहेंग्यावरील वर्कमुळे परफेक्ट लूक मिळाला आहे. 

3) व्हाईट साडी

जर तुम्हाला असे वाटत असेल की पांढऱ्या साडीतील तुमचा लुक बोअरिंग वाटतो, तर  चित्रांगदाच्या या लूक वरून एक चांगली आयडिया मिळेल. या लुकमध्ये चित्रांगदाने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त 'मेखला चादर' घालणे पसंत केले.  या साडीचा  उगम आसाममध्ये झाला.  यामध्ये तिने पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय सिंपल, स्टाइलिश इअररिंग्स वापरून छोटीशी टिकली लावली आहे. 

4) कलर लेहेंगा

जर तुम्हाला लाईट कलरचा लेहेंगा आपल्या स्टाईलचा भाग बनवायचा असेल. चित्रांगदा सिंगचा हा लेहेंगा नक्कीच छान दिसेल. या लेहेंगासह ब्लाउजची निखळलेली नेकलाइन आणि दुपट्टा तिचा लूक आणखी सुंदर बनवत आहे. 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्स