Lokmat Sakhi >Beauty > Saree tips : प्लेन साडी नेसताना करा फक्त 5 गोष्टी; प्लेन साडी देते स्मार्ट-सुंदर लूक

Saree tips : प्लेन साडी नेसताना करा फक्त 5 गोष्टी; प्लेन साडी देते स्मार्ट-सुंदर लूक

Saree tips : प्लेन साडीची फॅशन सध्या इन आहे. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बाजारात प्लेन साड्या मिळत असल्या तरी त्या नेसताना कोणती काळजी घ्यायची याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 04:54 PM2022-02-17T16:54:31+5:302022-02-17T16:57:34+5:30

Saree tips : प्लेन साडीची फॅशन सध्या इन आहे. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बाजारात प्लेन साड्या मिळत असल्या तरी त्या नेसताना कोणती काळजी घ्यायची याविषयी...

Saree tips: Just 5 things to do while wearing plain saree; Plain saree gives smart-beautiful look | Saree tips : प्लेन साडी नेसताना करा फक्त 5 गोष्टी; प्लेन साडी देते स्मार्ट-सुंदर लूक

Saree tips : प्लेन साडी नेसताना करा फक्त 5 गोष्टी; प्लेन साडी देते स्मार्ट-सुंदर लूक

Highlightsकोणत्याही साडीच्या प्रकारावर मेकअप कोणता करावा, हेअरस्टाईल कशी असावी असे प्रश्न आपल्याला साहजिकच पडतात. अशाच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न...प्लेन साडीत आपण साधे दिसू असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय, प्लेन साडीतही तुम्ही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करु शकता

कोणत्याही फंक्शनला जाताना साडी नेसायची असेल की पूर्वी काठापदराची, अगदीच नाही तर एखादी डिझायनर साडी नेसली जायची. कार्यक्रम, सणवार यांसाठी थोड्या झगमगीत आणि उठून दिसतील अशा साड्या नेसण्याची पद्धत होती. पण ही पद्धत आता काहीशी मागे पडली असून कॉटनच्या किंवा वेगवेगळ्या मटेरीयलमध्ये येणाऱ्या प्लेन साड्या (Plain Saree) आता आवर्जून नेसल्या जातात. एखादे लहानसे फंक्शन असो किंवा एखादा सण, प्लेन साड्यांना तरुणी सध्या पसंती देताना दिसतात (Saree tips). आता प्लेन साडीमध्ये आपण उठून कसे दिसणार किंवा आपला लूक (look in plain saree) प्लेन साडीत कसा खुलणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स देणार आहोत. पाहूयात प्लेन साडीमध्येही स्मार्ट आणि सुंदर (How to look smart and beautiful in plain saree) दिसण्यासाठी नेमके काय करायला हवे...

१. ट्रान्स्परन्सी तपासा

प्लेन साडी मग ती कॉटनची असो, सिफॉनची किंवा सिल्कची त्याची ट्रान्स्परन्सी तपासणे गरजेचे असते. अनेकदा सेल्फ डिझाईन असलेल्या साड्यांमवरच्या डिझाईनमुळे साडीचा पोत पातळ असेल तरी त्याची ट्रान्स्परन्सी लक्षात येत नाही. पण प्लेन साड्यांच्या बाबतीत या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. कारण साडी प्लेन असल्याने त्यातून पटकन आतले दिसू शकते. त्यामुळे तुम्हाला नेसताना ही गोष्ट लक्षात आली नाही आणि नंतर कार्यक्रमात लक्षात आली तर तुमचा पूर्ण मूड ऑफ होण्याची शक्यता असते.

(Image : Google)
(Image : Google)

२. ब्लाऊज  कसे निवडाल?

प्लेन साडीवर तुम्ही ब्लाऊजच्या बाबतीत बरेच प्रयोग करु शकता. यामध्ये हेवी डिझायनर ब्लाऊजपासून ते अगदी स्ट्रीपचे ब्लाऊजही मस्त दिसतात. लूक खुलवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ब्लाऊजची फॅशन ट्राय करु शकता. साडीच्या रंगाला कॉन्ट्रास्ट असणाऱ्या एखाद्या रंगाचे ब्लाऊज घातले तर तुमचा लूक खुलून यायला मदत होते. हे ब्लाऊज भरजरी असेल तरी तुम्ही उठून दिसू शकता. तुम्हाला लगेच ब्लाऊज घेणे शक्य नसेल आणि तुमच्याकडे आधीपासून एखादे मल्टीकलर ब्लाऊज असेल तर असे ब्लाऊजही साडीवर मस्त उठून दिसते. इतकेच नाही तर मोठ्या गळ्याचे स्लिव्हलेस किंवा अगदी स्ट्रीप असलेले ब्लाऊजही तुम्ही आवर्जून ट्राय करु शकता. 

३. दागिने कोणते घालाल?

ब्लेन साडीवर तुम्हाला दागिन्यांच्या बाबतीतही प्रयोग करायला चांगलाच वाव असतो. काठाच्या किंवा डिझायनर साड्यांवर गोल्डन, सिल्व्हर किंवा ऑक्सिडाईज अशी कोणती ज्वेलरी सूट होईल याचा आपल्याला विचार करावा लागतो. मात्र प्लेन साड्यांच्या बाबतीत तसे नसते. साडी पूर्णपणे प्लेन असल्याने त्यासोबत तुम्ही कोणत्याही प्रकारचे दागिने कॅरी करु शकता. मात्र प्लेन साड्यांवर खूप जास्त भरजरी ज्वेलरी चांगली दिसत नाही. तर एखादे चांगले सोबर गळ्यातले आणि कानातले, एखादी बांगडी किंवा कडे असे उठून दिसते. यावर तुम्ही थोडे मोठ्या आकाराचे दागिने घालू शकता आणि ते उठूनही दिसू शकतात. इतकेच नाही तर तुमचे ब्लाऊज हेवी असेल आणि तुम्हाला गळ्यात काही घालायचे नसेल तर मोठ्या आकाराचे कानातले आणि हातात थोडे हेवी ब्रेसलेट घातल्यास तुमचा लूक खुलण्यास मदत होते. 

४. मेकअप कसा कराल?

प्लेन साड्या या थोड्या वेस्टर्न लूक देणाऱ्या असल्याने त्यावर भारंभार मेकअप अजिबात चांगला दिसत नाही. अशावेळी तुम्ही डोळे आणि ओठाला जास्त मेकअप करुन त्यांना हायलाईट केले तर तुम्ही आकर्षक दिसता. प्लेन साडीवर न्यूड मेकअप, स्मार्ट लूक जास्त चांगला दिसू शकतो. म्हणून तुम्ही प्लेन साडी नेसत असाल तर या सगळ्या गोष्टींचा आवर्जून विचार व्हायला हवा.

(Image : Google)
(Image : Google)

५. हेअरस्टाईल कोणती चांगली दिसेल?

एरवीही आपण एखाद्या फंक्शनला कोणती हेअरस्टाईल करावी असा विचार आपण करत असतो. पारंपरिक कपड्यांवर साधारणपणे वर बांधलेले केस जास्त चांगले दिसतात. ज्यामुळे तुमचे कपडे आणि दागिने, मेकअप यांकडे लक्ष जाऊ शकते. पण प्लेन साडी आणि हेवी ब्लाऊज, कानातले असा लूक असेल तर तुम्ही केसांचे काहीही केले तरी ते चांगलेच दिसते. यामध्ये केस मोकळे सोडण्यापासून ते त्याची वेणी, बन, एखादी हटके हेअरस्टाईल असे काहीही केले तरी ते छान दिसते. त्यामुळे प्लेन साडी असताना केसांचे काय करायचे याबाबत फारशी काळजी करण्याचे कारण नाही. 
 

Web Title: Saree tips: Just 5 things to do while wearing plain saree; Plain saree gives smart-beautiful look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.