Join us  

Saree Wearing Ideas : साडी नेसल्यावर फुगते? सणासुदीला साडीचा परफेक्ट लूक मिळवण्यासाठी 'या' चूका टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 6:59 PM

Saree Wearing Ideas : अनेकदा काठापदराच्या साड्या  नेसल्यावर फुगतात. शरीरयष्टी बारीक असेल तर  फुगलेली साडी फारशी दिसून येत नाही. पण जर तुम्ही तब्येतीनं थोडे जरी हेल्दी असाल तर फुगलेली साडी लगेच दिसून येतो.

सणासुदीला फक्त बायकाच नाही तर मुलींनाही  साडी नेसण्याची इच्छा होते.  नवरात्रीत नेसण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या बायकांनी घेतलेल्या असतात. तर काहीजणी खूप दिवसांनी जुन्या साडीची घडी नवरात्रीच्या दिवसात मोडतात. अनेकदा काठापदराच्या साड्या  नेसल्यावर फुगतात.

शरीरयष्टी बारीक असेल तर  फुगलेली साडी फारशी दिसून येत नाही. पण जर तुम्ही तब्येतीनं थोडे जरी हेल्दी असाल तर फुगलेली साडी लगेच दिसून येतो. त्यामुळे लूक तर बिघडतोच पण मूड पण खराब होतो. अशावेळी  साडी नेसताना काही टिप्स वापरल्या तर तुम्हाला परफेक्ट लूक मिळू शकतो. (How to wear perfect saree)

साडी नेसताना या गोष्टी लक्षात ठेवा

 साडी नेसणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. घरातील आई, बहीणीची मदत घेऊन खूप जणी साडी नेसतात कारण स्वतः व्यवस्थित साडी नेसणं कठीण वाटतं. एखाद्या मैत्रिणीकडून किंवा ज्यांना व्यवस्थित साडी नेसता येत असेल त्यांच्याकडून शिकून घ्या.  यु-ट्युब, फेसबुकवर व्हिडीओ पाहूनही तुम्ही साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकू शकता.

पीना लावताना

साडीच्या निऱ्या, पदर हा भाग व्यवस्थित असणं लूक्सच्या दृष्टीनं महत्वाचं असतं. जर तुम्ही साडी योग्य ठिकाणी पीनअप केली तर फुगलेली दिसणार नाही. साड्यांच्या निऱ्या जर फुगलेल्या सारख्या वाटत असतील तर तुम्ही निऱ्याकडील भागावर स्ट्रेटनर फिरवा. आजकाल ब्युटीशियन्स मॉडेल किंवा ब्राईडला साडी नेसवताना निऱ्या व्यवस्थित दिसाव्यात म्हणून स्ट्रेटनर आठवणीनं फिरवतात.  त्यामुळे साडी चापून चोपून नेसल्यासारखी दिसते. एकदा सेट केल्यानंतर ही साडी पूर्ण दिवस व्यवस्थित दिसते. शक्यतो खालच्या टोकाला गोलाकार पॉईंट असलेल्या पीना निवडा. त्यामुळे पीन कशीही लावली तरी साडी फाटण्याची किंवा धागे निघण्याची भिती नसते.

नवरात्रीच्या उपवासाला काय खायचं अन् काय नाही? जाणून घ्या उपवासाचे नियम

पेटिकोट कसा निवडावा

साडीवर तुम्ही कसा पेटीकोट घालता हेसुद्धा महत्वाचं असतं. जास्त मोठा, सैल पेटीकोट असेल तर साडी व्यवस्थित दिसत नाही. साडीच्याच रंगाचा पेटिकोट निवडावा.  पेटिकोट जास्त सैल होणार नाही अशी काळजी घ्यावी. कॉटन किंवा पॉपलिन पेटिकोट निवडावा.

साडी विकत घेताना या गोष्टी लक्षात  ठेवा

आपली शरीरयष्टी आणि  कलरटोन पाहून साडीची निवड करा. जास्त फुगतील अशा साड्या निवडू नका. काठापदरांच्या साड्यांमध्येही असे अनेक प्रकार आहेत ज्या साड्या नेसल्यावर फुगत नाहीत आणि व्यवस्थित बसतात. त्यातल्या त्यात सॉफ्ट सिल्क आणि कांजीवरम साड्या चांगल्या दिसतात. 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्समहिला