Lokmat Sakhi >Beauty > स्काल्प फेशियल ऐकलंय कधी? केसगळती-कोंडा यामुळे वैतागला असाल तर करुन पाहा हे वेगळंच फेशियल

स्काल्प फेशियल ऐकलंय कधी? केसगळती-कोंडा यामुळे वैतागला असाल तर करुन पाहा हे वेगळंच फेशियल

केस मजबूत आणि सुंदर (healthy and beautiful hair) होण्यासाठी टाळुची त्वचा स्वच्छ असणं याला खूप महत्व आहे. त्यासाठीचं महिन्यातून एकदा स्काल्प फेशियल (scalp facial) करणं आवश्यक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 05:37 PM2022-07-07T17:37:38+5:302022-07-07T17:49:59+5:30

केस मजबूत आणि सुंदर (healthy and beautiful hair) होण्यासाठी टाळुची त्वचा स्वच्छ असणं याला खूप महत्व आहे. त्यासाठीचं महिन्यातून एकदा स्काल्प फेशियल (scalp facial) करणं आवश्यक आहे.

Scalp facial for healthy hair.. How to do scalp facial? | स्काल्प फेशियल ऐकलंय कधी? केसगळती-कोंडा यामुळे वैतागला असाल तर करुन पाहा हे वेगळंच फेशियल

स्काल्प फेशियल ऐकलंय कधी? केसगळती-कोंडा यामुळे वैतागला असाल तर करुन पाहा हे वेगळंच फेशियल

Highlightsस्काल्प फेशियल करताना स्क्रब म्हणून काॅफी पावडरचा वापर उत्तम ठरतो. नैसर्गिक कंडीशनर म्हणून ॲपल सायडर व्हिनेगर, ग्रीन ॲपल एक्सट्रॅक्ट यांचा वापर करता येतो.  

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी , त्वचेचं पोषण होण्यासाठी, त्वचेचं सौंदर्या वाढण्यासाठी जसं वेगवेगळ्या प्रकारचं फेशियल (facial) केलं जातं तसंच केस निरोगी आणि सुंदर दिसण्यासाठी, केसांशी निगडित समस्या दूर करण्यासाठी स्काल्प फेशियल केलं जातं. केस मजबूत होण्यासाठी (for strong hair)  टाळूचं पोषण होणं, टाळूची त्वचा स्वच्छ असणं याला खूप महत्व आहे. टाळूची त्वचा तेलकट असल्यास/ कोरडी असल्यास खाज, कोंडा अशा समस्या निर्माण होवून केस कमजोर होतात, गळतात, तुटतात. केसांची वाढही खुंटते. यासाठीच स्काल्प फेशियल (scalp facial)  करणं आवश्यक आहे. चेहेऱ्याचं करतो ते फेशियल पण केसांसाठी फेशियल कसं? तर यावर उत्तर म्हणजे फेशियलमध्ये ज्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप स्क्रब, मसाज, मास्क अशा क्रिया केल्या जातात तशाच क्रिया स्काल्प फेशियल (how to do scalp facial) करतानादेखील केल्या जातात म्हणून याला स्काल्प फेशियल असं म्हणतात.

Image: Google

स्काल्प फेशियल कसं करावं?

1. स्काल्प फेशियल करण्याची पहिली पायरी म्हणजे मसाज/ स्क्रब करणं. स्क्रब केल्यानं फेशियलसाठी टाळूची त्वचा तयार होते. डोक्यात कोंडा असेल, डोकं सतत खाजत असेल तर आठवड्यातून एकदा स्क्रब अवश्य करावं असं तज्ज्ञ म्हणतात. हेअर स्क्रब करण्यासाठी काॅफीचा उपयोग करता येतो. काॅफीमध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म असल्यानं स्क्रबसाठी काॅफी उत्तम ठरते. काॅफीने स्क्रब केल्यानं टाळूकडील मृत त्वचा निघून जाते. काॅफी पावडरनं केसांच्या मुळांशी मसाज केल्यानंतर केस 15 मिनिटांनी धुवावेत. 

2. स्क्रब केल्यानंतर केसांना मसाज करावा. केसांना मसाज करण्यासाठी बोटं केसांच्या मुळांशी गोलाकार फिरवावी. मसाजमुळे टाळुला चिकटलेली घाण निघायला मदत होते. केसांच्या मुळाकडील रक्तप्रवाह चांगला होतो. स्काल्प फेशियल करताना मसाज करताना तेलाचा वापर करु नये. तेलामुळे टाळूवर घाण चिकटून राहाते. 10 ते 15 मिनिटं केसांना मसाज करावा. 

Image: Google

3. केसांना मसाज केल्यानंतर टाळुला शाम्पू लावणं आवश्यक असतं. यासाठी सौम्य प्रकारचा शाम्पू लावावा. हा शाम्पू सल्फेट आणि पॅराबिन फ्री असावा. टाळुला आणि केसांना सौम्य शाम्पू लावून केस धुवावेत. 

4. शाम्पू झाल्यानंतर स्काल्प फेशियलमध्ये टाळुला कंडिशनर लावावं. एरवी कंडीशनर कधीही टाळुला लावत नाही केसांना लावलं जातं. पण स्काल्प फेशियल करताना टाळुकडील त्वचेचं माॅइश्चर जपण्यासाठी टाळुला कंडिशनर लावलं जातं. कंडिशनर म्हणून नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. जसं ॲपल सायडर व्हिनेगर, ग्रीन ॲपल एक्सट्रॅक्ट यांचा वापर नैसर्गिक कंडिशनर म्हणून करता येतो. 

Image: Google

5. स्काल्प फेशियलच्या शेवटच्या टप्प्यात टाळुला सिरम लावावं. सिरम लावल्यानं केसांच्या मुळांशी अतिरिक्त तेल तयार होत नाही. यामुळे केस तेलकट दिसत नाहीत. केसांची मुळं निरोगी होण्यासाठी महिन्यातून एकदा हे स्काल्प फेशियल अवश्य करावं असं तज्ज्ञ म्हणतात. 
 

Web Title: Scalp facial for healthy hair.. How to do scalp facial?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.