Join us  

अभिनेत्रींच्या नितळ त्वचेचं सिक्रेट; चेहऱ्याला लावतात २ घरगुती गोष्टी, तुम्हीही लावा-चमकेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 3:31 PM

Secret Of Bollywood Celebrity Glowing And Healthy Skin: जर तुमची स्किन ड्राय  झाली असेल तर चेहऱ्यावर नारळाचे तेल अप्लाय करा. 

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि टिव्ही स्टार्सप्रमाणे सुंदर दिसावे अशी इच्छा प्रत्येक मुलीची असते. (Beauty Tips) आपली त्वचा अभिनेत्रींच्या त्वचेप्रमाणे सुंदर असावी, चेहरा ग्लोईंग असावा यासाठी मुली अनेक स्किन केअर रूटीन फॉलो करतात. (Bollywood Actresses Beauty Secrets You Should Follow) बॉलिवूड सेलब्रिटींच्या सुंदरतेचं  सिक्रेट नेमकं काय ते पाहूया. (Bollywood Skin Whitening Secrets) जेणेकरून तुम्ही त्यांच्याप्रमाणे त्वचेची काळजी घेऊन म्हातारपणातही यंग दिसू शकता. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुंदर त्वचेमागे  नियमित स्किन केअर रूटीनचा समावेश असतो.(Secret Of Bollywood Celebrity Glowing And Healthy Skin)

1) शिल्पा शेट्टी

९० च्या दशकातील टॉप अभिनेत्री शिल्पा सेट्टी आजही आपल्या फिटनेससमुळे आणि सुंदर चेहऱ्यामुळे चर्चेत असतेच. तिच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला त्वेचवर ग्लो हवा असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या. ज्यामुळे तुमचे बॉडी डिटॉक्स होईल आणि त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. 

2) पूजा हेगडे

भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल पूजा हेगडे खूप साधेपणाने राहते. झोपण्याच्या आधी ती तिचा चेहरा स्वच्छ धुते. मेकअफ रिमुव्ह केल्याशिवाय झोपत नाही. तिच्या म्हणण्यानुसार जर तुमची स्किन ड्राय  झाली असेल तर चेहऱ्यावर नारळाचे तेल अप्लाय करा. 

केस पिकलेत-डाय, मेहेंदीची सवय नाही? 'या' पानांचा घरगुती डाय लावा, काळभोर होतील केस

3) प्रियांका चोप्रा

प्रियांका त्वचेची  काळजी घेण्यासाठी  गव्हाचे पीठ, हळद, लिंबाचा रस, फूल क्रिम योगर्ट आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक वापरते. तुम्हीसुद्धा हा फेसपॅक काहीवेळ चेहऱ्याला लावून चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचा चमकदार दिसण्यास मदत होईल. 

4) करीना कपूर

करीनाला  प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे सिक्रेट विचारतो. करिना चंदनात व्हिटामीन ई चे २ ड्रॅप आणि थोडी हळद लावून पॅक तयार करते आणि चेहऱ्याला लावते.  हे तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य आहे. 

थंडीत केस कोरडे-पातळ झाले? १० रूपयांत करा ४ उपाय, केस वाढतील लांबच लांब

5) कृती सेनन

कृती सेनन सांगते की बाहेर जाताना ती सनस्क्रीन लावायला विसरत नाही. जास्तवेळासाठी तुम्ही बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन लावायलला विसरू नका. ३ ते ४ तासाने सनस्क्रीन अप्लाय करत राहा. यामुळे स्किन टॅन कमी होईल. मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर बर्फाचा वापर करा. ज्यामुळे मेकअपला नॅच्युरल लूक येतो. त्वचेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेलचा वापर करू शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसेलिब्रिटी