Join us  

काय आहे क्रिती सेननच्या सौंदर्याचं रहस्य? नितळ त्वचेसाठी ती घेते खास कॉफी, पाहा रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 12:25 PM

Secret of Kriti Sanon Beauty Coffee Recipe : तुम्हालाही नितळ, चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही हा प्रयोग निश्चितच करु शकता.

ठळक मुद्देकोलेजन क्रिमरमुळे शरीरातील कोलेजनची पातळी वाढून त्वचेतील ओलावा, नितळपणा वाढण्यास मदत होते. आपलीही त्वचा होऊ शकते अभिनेत्रींइतकी चमकदार आणि नितळ

कॉफी तर आपण सगळेच अनेकदा पितो. कधी फिल्टर तर कधी इन्स्टंट कडक कॉफी प्यायली की आपल्याला तरतरी येते. कोणाला कडवट कॉफी आवडते तर कोणाला खूप गोड. काही जण कोल्ड कॉफी किंवा कॉफी विथ आईस्क्रीमही अगदी आवडीने घेतात. फ्रेश वाटण्यासाठी घेतली जाणारी ही कॉफी आपल्या सौंदर्यासाठीही अतिशय महत्त्वाची असते. कधी फेसपॅक म्हणून तर कधी स्क्रब म्हणून कॉफीचा वापर करायला हवा असे ब्यूटी एक्सपर्ट सांगतात. पण कॉफी प्यायल्यानेही आपले सौंदर्यही खुलू शकते. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन अशी वेगळ्या पद्धतीची कॉफी नियमित घेत असल्याने तिचे सौंदर्य खुलून येते. क्रिती तिच्या दिवसाची सुरुवात कॉफीने करत असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. कॉफीच्या वासापेक्षा कोणताच दुसरा सुंदर वास नाही असंही तिने त्यावेळी सांगितले होते. तेव्हा तुम्हालाही नितळ, चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही हा प्रयोग निश्चितच करु शकता (Secret of Kriti Senon Beauty Coffee Recipe).

(Image : Google)

क्रितीची त्वचा अतिशय चमकदार आणि नितळ असल्याचे आपण तिच्या फोटोमधून नेहमी पाहतो. क्रिती सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असून ती सतत आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. उत्तम अभिनयासोबतच तिची उंची आणि सौंदर्य यामुळे चाहते तिच्या प्रेमात पडतात. अभिनेत्री नितळ त्वचेसाठी काय करत असतील असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कायम पडतो. तर क्रिती सेनन तिच्या आहारात एक खास पद्धतीची कॉफी घेते. ज्यामुळे तिची त्वचा डाग, पिंपल्स, सुरकुत्या यांपासून दूर राहण्यास मदत होते. आता त्यासाठी कॉफी नेमकी कशी करायची असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर पाहूया या कॉफीची रेसिपी...

साहित्य - 

कॉफी - १ चमचा 

मध - १ चमचा 

कोलेजन क्रिमर पावडर - १ चमचा 

गरम पाणी - १ कप

(Image : Google)

कृती - 

१. कॉफी मगमध्ये १ चमचा कॉफी आणि १ चमचा मध घेऊन ते चांगले एकत्र करा.

२. या मिश्रणात १ चमचा कोलेजन क्रिमर पावडर घाला.

३. यामध्ये गरम पाणी घालून ते सगळे ब्लेंडरने किंवा चमच्याने चांगले ढवळा. 

कोलेजनचा फायदे 

१. कोलेजनमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते.

२. व्यक्तीच्या शरीरात हाडे, स्नायू, त्वचा यांमध्ये कोलेजन असते. 

३. या कोलेजन क्रिमरमुळे शरीरातील कोलेजनची पातळी वाढून त्वचेतील ओलावा, नितळपणा वाढण्यास मदत होते. 

४. हे कोलेजन केस आणि नखांसाठीही अतिशय उपयुक्त असते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सक्रिती सनॉनत्वचेची काळजी