Join us  

हे बघा साउथ इंडियन महिलांच्या घनदाट केसांचं सिक्रेट, नेहमीच्या तेलात फक्त ५ पदार्थ घाला- केस होतील सुंदर लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2023 12:42 PM

Hair Care Tips From South Indian Women: साउथ इंडियन लोकांचे केस कसे घनदाट आणि काळेशार असतात... त्याचंच सिक्रेट आता आपण पाहूया...

ठळक मुद्देरात्री या तेलाने डोक्याला मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी केस धुऊन टाका. एका महिन्यातच खूप चांगला परिणाम दिसून येईल.

केस गळत आहेत (hair fall), केस वाढतच नाहीत, केसांत खूपच जास्त कोंडा होतोय (dandruff).... अशा समस्या अनेक लोकांना छळतात. काही जणांचे केस गळून गळून तर इतके पातळ होतात की थोड्याच दिवसात टक्कल पडेल की काय असे वाटते. त्या मानाने मात्र दक्षिण भारतीय लोकांचे केस खूपच काळेभोर, चमकदार आणि लांबसडक असतात. ते केसांची कशी काळजी घेतात, हा आपल्या कुतूहलाचा विषय असतो. म्हणूनच आता त्यांच्या घनदाट, लांबसडक आणि काळ्याभोर केसांचं सिक्रेट आपण जाणून घेऊया (Secret of south Indian women's long and strong shiny hair). यासाठी आपल्याला खूप काही वेगळे करण्याची गरज नाही. आपलं नेहमीचं खोबरेल तेल आणि त्यात फक्त ५ पदार्थ असं केलं की केसांच्या सगळ्या समस्या दूर होतील.(Natural remedies for hair loss)

 

साऊथ इंडियन महिलांच्या लांब केसांचं सिक्रेट

हा उपाय इंस्टाग्रामच्या glow.up.with.archna या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून मेथीदाणे, १ टेबलस्पून जवस, २ ते ३ जास्वंदाची फुलं, ५ ते ६ जास्वंदाची पानं, १० ते १२ कढीपत्त्याची पानं आणि १०० मिली खोबरेल तेल एवढे साहित्य लागणार आहे.

परीक्षेच्या आधी मुलांना खाऊ घाला ५ पदार्थ, एकाग्रता वाढेल आणि पाठ केलेलं आठवेल भरभर

सगळ्यात आधी मेथी दाणे, जवस, जास्वंदाची फुलं, पानं आणि कढीपत्ता हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून त्याची जाडी- भरडी पावडर करून घ्या.

 

आता एका काचेच्या बाटलीत तेल घ्या. त्या तेलात ही पावडर टाका आणि व्यवस्थित मिक्स करा.

यानंतर डबल बॉयलर पद्धतीने हे तेल पंधरा मिनिटे गरम होऊ द्या.

बटाट्याचे चिप्स, फ्रेंचफ्राईज खायला तुम्हालाही खूप आवडतं? डॉक्टर काय सांगतात, खाण्यापूर्वी एकदा वाचाच..

डबल बॉयलर पद्धत म्हणजे एका पातेल्यात पाणी घ्या आणि ते गॅसवर उकळायला ठेवा. त्या पाण्यात तेलाची बाटली ठेवा. थेट तेल न उकळता आपण ते गरम उकळत्या पाण्यात ठेवून तापवणार आहोत.

१५ मिनिटांनी गॅस बंद करा. तेल थंड होऊ द्या. हे तेल गाळून नाही घेतलं तरी चालेल. रात्री या तेलाने डोक्याला मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी केस धुऊन टाका. एका महिन्यातच खूप चांगला परिणाम दिसून येईल.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी