Lokmat Sakhi >Beauty > केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...

केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...

See the correct method of soaking henna for hair : केसांवर मेहेंदीचा गडद रंग येण्यासाठी ती साध्या पाण्यात न भिजवता करा एक सोपे काम, समजून घ्या मेहेंदी भिजवण्याची ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 09:11 AM2024-08-01T09:11:54+5:302024-08-01T09:23:20+5:30

See the correct method of soaking henna for hair : केसांवर मेहेंदीचा गडद रंग येण्यासाठी ती साध्या पाण्यात न भिजवता करा एक सोपे काम, समजून घ्या मेहेंदी भिजवण्याची ट्रिक...

See the correct method of soaking henna for hair How to soak mehandi for hair coloring & conditioning | केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...

केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व पांढरे केस लपवण्यासाठी आपण केसांना मेहेंदी लावतो. केसांच्या अनेक समस्यांवर केसांना मेहेंदी लावणे हा जुना पूर्वीपासूनचा चालत आलेला उपाय आपण करतो. केसांना मेहेंदी लावल्यामुळे केस काळे, चमकदार, मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते. केसांना कलर देण्यासाठी अनेक लोक डायऐवजी मेहेंदी (How to Properly Mix Henna for the Perfect Consistency) लावतात. मेहेंदी नैसर्गिकरीत्या केसांना कंडिशन करण्यास मदत करते. यामुळे केसांना चमक येते. याशिवाय मेंहदी केसांचा नैसर्गिक रंग देण्यासही मदत करते. मेहेंदी हा केसांसाठी नैसर्गिक आणि सुरक्षित असा रंग आहे, जो इतर केमिकल्सपेक्षा जास्त फायदेशीर ठरतो(How to mix henna for hair).

केसांना मेहेंदी लावण्यासाठी आपण आधी ती मेहेंदी भिजवून (How to Make Your Henna Paste at Home) त्याची पेस्ट तयार करुन घेतो. मेहेंदी भिजवताना आपण ती नुसत्याच पाण्यात न भिजवता चहा पावडर किंवा कॉफीच्या पाण्यांत भिजवतो. केसांना मेहंदीचा चांगला रंग यावा म्हणून आपण मेहेंदी भिजवताना त्यात अनेक गोष्टी घालून ती भिजवतो. साध्या पाण्यात मेहेंदी भिजवण्यापेक्षा अशा पाण्यांत मेहेंदी भिजवल्याने केसांवर त्या मेहेंदीचा गडद रंग येण्यास मदत मिळते. यासाठीच मेहेंदी भिजवताना ती नेमकी कशी भिजवावी आणि गडद रंग येण्यासाठी मेहेंदी भिजवण्यासाठीचे पाणी कसे तयार करावे ते पाहूयात(See the correct method of soaking henna for hair).

साहित्य :- 

१. तांदूळ - १ टेबलस्पून 
२. मेथी दाणे - १ टेबलस्पून 
३. लवंग - ८ ते १० लवंग काड्या 
४. चहा पावडर - १ टेबलस्पून 
५. कॉफी - १ टेबलस्पून
६. पाणी - १ ग्लास  
७. दही - २ टेबलस्पून 

अनन्याचा फेसमास्क ते दीपिकाचा ब्यूटी रोलर ! बॉलिवूड अभिनेत्रींचे खास होममेड ब्यूटी सिक्रेट... 


तांदुळ धुवून पाणी फेकून देण्यापेक्षा करा कोरियन आईस क्युब्स, त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी !

कृती :- 

१. एका भांड्यात तांदूळ, मेथी दाणे, लवंग, चहा पावडर, कॉफी घेऊन हे सगळे जिन्नस एकत्र करावेत. 
२. आता यात एक ग्लास पाणी घालून गॅसच्या मंद आचेवर ठेवून ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित उकळवून घ्यावे. त्यानंतर हे पाणी गाळणीने गाळून थोडे थंड होऊ द्यावे. 

३. एका दुसऱ्या भांड्यात कोरडी मेहेंदी पावडर घेऊन हे थंड करुन घेतलेले पाणी हळुहळु ओतून मेहेंदी भिजवून घ्यावी. 
४. या पाण्यांत मेहेंदी भिजवून घेतल्यानंतर २ तासांसाठी मेहेंदी झाकून ठेवून द्यावी. 
५. २ तासांनंतर या मेहेंदीत दही घालून ते मिक्स करुन घ्यावे. 

हेवी ब्रेस्टसाईज म्हणून खूप घट्ट ब्रेसियर घालणं धोक्याचं, तब्येतीवर होतात ४ गंभीर परिणाम...

अशाप्रकारे आपण मेहेंदी भिजवण्यासाठी साध्या पाण्याऐवजी या पाण्याचा उपयोग करु शकता. या पाण्यांत मेहेंदी भिजवल्याने केसांवर त्या मेहेंदीचा गडद रंग येण्यास मदत मिळते.

Web Title: See the correct method of soaking henna for hair How to soak mehandi for hair coloring & conditioning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.