Join us  

रव्याचा उपमा करतात पण फेस स्क्रब? १ चमचा रव्याचा स्क्रब- त्वचा होईल क्लिन, चेहऱ्यावर येईल चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2023 5:46 PM

Semolina Face Scrub to Remove Dark Spots आपण विकतचे स्क्रब आणतो पण १ चमचा रव्याचे ३ स्क्रब चेहऱ्याला देतात सुंदर ग्लो

नाश्ता म्हटलं की आपल्याला पोहे किंवा उपमा आठवतो. उपमा करण्यासाठी रव्याचा वापर होतो. रव्याशिवाय उपमा, गोड शिरा, इन्सटंट डोसा, इडली तयार होत नाही. पण आपण कधी रव्याचा वापर त्वचेसाठी केला आहे का? ऐकून आश्चर्य वाटलं ना? आता तुम्ही म्हणाल रव्याचा वापर स्किनसाठी कसा केला जाऊ शकतो.

रव्यामुळे स्किनला फायदा होतो का? तर हो, स्किन स्क्रबसाठी आपण रव्याचा वापर करू शकता. स्किन पोर्समध्ये अनेकदा घाण साचते, ही घाण काढण्यासाठी आपण रव्याचा वापर करू शकता. यासह ब्लॅकहेड्स, टॅनिंग, मुरुम, पिग्मेंटेशन, यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी आपण रव्यापासून तयार स्क्रबचा वापर करू शकता(Semolina Face Scrub to Remove Dark Spots).

रव्याचा स्क्रब कसा करावा?

रव्याचा स्क्रब करण्यासाठी एका वाटीत रवा घ्या, त्यात एक चमचा हळद, लिंबाचा रस, एलोवेरा जेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळानंतर चेहरा हाताने स्क्रब करा. ज्यामुळे पोर्समधील साचलेली घाण निघून जाईल. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.

दोन गोष्टी शाम्पूत मिसळा आणि करा घरच्याघरी हेअरस्पा, केस चमकतील-पार्लरचा खर्चही वाचेल

तेलकट त्वचेसाठी रवा स्क्रबचे फायदे

तेलकट त्वचेमध्ये तेल आणि घाण जास्त साचते. डेड स्किन काढण्यासाठी यासह त्वचेचे छिद्र आतून स्वच्छ करण्यासाठी रवा स्क्रब फायदेशीर ठरू शकते. रवा व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी उपयुक्त आहे, तर गुलाबपाणी त्वचेला आतून हायड्रेट ठेवते. व एलोवेरा जेल लावल्याने त्वचेला संरक्षणात्मक थर मिळण्यास मदत होते.

खोबरेल तेल रात्री लावा, सकाळी पहा जादू, पिवळे दात ते तुटकी नखे - समस्या गायब

ड्राय स्किनसाठी रवा स्क्रबचे फायदे

ड्राय स्किनसाठी रव्याचा स्क्रब खूप फायदेशीर ठरतो. ड्राय स्किनसाठी आपण दुधात रवा मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. व काही वेळ हाताने स्क्रब करून स्किनवर स्क्रब करू शकता. दूध त्वचेला आतून स्वच्छ करते, त्याचे पीएच संतुलित करते. त्यामुळे हा स्क्रब ड्राय स्किनसाठी उपयुक्त ठरतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी