काही अपवाद सोडले तर एरवी वर्षभर आपल्याला तिळाची आठवण येत नाही. पण संक्रांतीचा सण जवळ आला की मग मात्र घरोघरी तीळ खरेदी केले जातात. तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, चिक्की अशा माध्यमातून तीळ आपल्या पोटात जातातच. ते आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी चांगलेच आहे. पण त्वचा आणि केस यांच्यासाठीही तिळाचे काही खास उपयोग आहेत (use of til or sesame for skin). सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे थंडीचा परिणाम त्वचेवर होतो (Sesame facepack for dry skin). त्वचा काळवंडल्यासारखी दिसते. कोरडी पडलेली असते (How to get rid of tanning and dull skin). त्वचेचा कोरडेपणा आणि काळवंडलेपणा कमी करायचा असेल तर तिळाचा वापर कसा करायचा ते आता पाहूया...(Home remedies for glowing skin)
त्वचेसाठी तिळाचा वापर
तीळ आणि कोरफड
त्वचा खूप कोरडी झाली असेल तर हा एक उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काळे किंवा पांढरे कोणतेही तीळ घेतले तरी चालतील.
काळ्या किंवा पांढऱ्या तिळाची पावडर करा. ही पावडर आणि कोरफडीचा गर एकत्र करा. त्यात २ ते ३ थेंब बदाम तेल टाका. हा लेप चेहऱ्यावर लावा. ८ ते १० मिनिटांनी लेप सुकला की चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्वचा छान हायड्रेटेड होऊन कोरडेपणा कमी होईल.
तीळ आणि दूध
त्वचा काळवंडली असेल किंवा त्वचेवरची डेड स्किन काढून टाकायची असेल तर हा उपाय अतिशय चांगला आहे.
संक्रांतीसाठी पतंगाच्या कानातल्यांचे भन्नाट डिझाईन्स, उडणारा पतंग आणि मांज्याने सजवा तुमचा कान
हा उपाय करण्यासाठी तिळाची पावडर करून घ्या. त्यामध्ये कच्चं दूध आणि चिमूटभर हळद टाकून कालवून घ्या. आता हा लेप चेहऱ्याला लावा. ७ ते ८ मिनिटांनी जेव्हा लेप अर्धवट सुकेल तेव्हा हाताने हळूवारपणे चोळून तो काढून टाका. आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेचं काळवंडलेपण दूर होईल आणि त्वचा छान चमकेल.