संक्रांतीच्या काळात तीळ- गूळ खाण्याचे अतिशय महत्त्व आहे. कारण थंडीच्या या दिवसांमध्ये तीळ- गूळ खाणे आरोग्यासाठी अतिशय पोषक ठरते. तिळामध्ये असणारे गुणकारी घटक शरीरात उब निर्माण करतात, उर्जा देतात. तीळ खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे तर आपण जाणतोच. आता तिळाचा वापर त्वचेसाठी कसा होऊ शकतो (Benefits of sesame face pack for skin), ते पाहूया. संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं लावून आंघोळ करण्याची परंपरा मराठवाड्यात आहे. हे उटणं तयार करणं अतिशय सोपं आहे. शिवाय ते लावल्याने त्वचेला भरपूर फायदेही होतात. (How to make sesame face pack for glowing skin?)
त्वचेसाठी तिळाचे फायदे
१. तिळामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेला मुलायम ठेवतात.
२. तिळामध्ये असणारे व्हिटॅमिन ई केस आणि त्वचा या दोन्हींसाठी अतिशय पोषक ठरते.
तीळ -खव्याची वडी, जुही परमारने शेअर केली संक्रांत स्पेशल रेसिपी, वडीसाठी हव्या फक्त ३ गोष्टी
३. त्वचेला उब देऊन त्वचेतील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम तिळाच्या उटण्यामुळे होते. त्यामुळे तिळाच्या उटण्याने आंघोळ केल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
४. थंडीमुळे किंवा उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर तिळाचं उटणं लावा. टॅनिंग कमी होईल.
कसं तयार करायचं तिळाचं उटणं?
१. तिळाचं उटणं किंवा तिळाचं स्क्रब तयार करण्यासाठी दोन ते तीन टेबलस्पून तीळ तेवढंच दूध घेऊन रात्रभर एका वाटीत भिजत ठेवा. दुधात भिजत टाका.
कोथिंबीर १५ दिवस राहणार एकदम फ्रेश- हिरवीगार, निवडण्याचीही गरज नाही, बघा सोपा उपाय..
२. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याची जाडीभरडी पेस्ट तयार करा.
३. हा लेप एका वाटीमध्ये काढून घ्या. त्यात चिमुटभर हळद, अर्ध्या लिंबाचा रस आणि १ ते २ टी स्पून गुलाब जल टाका. तयार झालेलं हे उटणं आता चेहऱ्याला आणि सगळ्या अंगाला चोळून लावा. १० ते १५ मिनिटांनंतर आंघोळ करून धुवून टाका.