Lokmat Sakhi >Beauty > शाहरूखनं सांगितलं बाऊंसी-दाट केसांचं सिक्रेट; काळ्या केसांसाठी वापरतो किचनमधले हे ३ पदार्थ

शाहरूखनं सांगितलं बाऊंसी-दाट केसांचं सिक्रेट; काळ्या केसांसाठी वापरतो किचनमधले हे ३ पदार्थ

Shah Rukh Khan Hair Secret : ''आपके बिखरे-बिखरे बालों का राज क्या है?'' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शाहरूख खानने काय उत्तर दिलं हे खरंच ऐकण्यासारखं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 08:34 PM2023-11-26T20:34:25+5:302023-11-26T20:41:39+5:30

Shah Rukh Khan Hair Secret : ''आपके बिखरे-बिखरे बालों का राज क्या है?'' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शाहरूख खानने काय उत्तर दिलं हे खरंच ऐकण्यासारखं होतं.

Shah Rukh Khan Hair Secret : Shah Rukh Khan Reveled Secret Behind His Messy, Thick Hairs | शाहरूखनं सांगितलं बाऊंसी-दाट केसांचं सिक्रेट; काळ्या केसांसाठी वापरतो किचनमधले हे ३ पदार्थ

शाहरूखनं सांगितलं बाऊंसी-दाट केसांचं सिक्रेट; काळ्या केसांसाठी वापरतो किचनमधले हे ३ पदार्थ

पठाण आणि जवान या चित्रपत्रांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर किंग खान (king khan) आता डँकी या चित्रपटात दिसणार आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट चित्रपटगृहात दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता शाहरूख खानने  २ दिवसांपूर्वी मायक्रोब्लॉगिंग साईट X वर १५ मिनिटांसाठी #AskSRK हे सेशन सुरू केले  होते. (Shah Rukh Khan Hair Secret)

या सेशनमध्ये शाहरुख खानला लोकांनी काही प्रश्न विचारले. आपल्या इच्छेनुसार शाहरूख सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होता. यात काही आगळेवेगळे प्रश्नही होते.  एका युजरनं शाहरूख खानला त्याच्या सुंदर केसांचे सिक्रेट विचारले. ''आपके बिखरे-बिखरे बालों का राज क्या है?'' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शाहरूख खानने काय  उत्तर दिलं हे खरंच ऐकण्यासारखं होतं. शाहरूख म्हणाला, मी केसांना आवळा, भृंगराज आणि मेथी  लावतो.  (Shah Rukh Khan Reveled Secret Behind His Messy, Thick Hairs)

शाहरूख खान चे केस फक्त फॅशन स्टेटमेंट नाही तर चाहत्यांना फार आवडतात. एका इंटरव्हू दरम्यान शाहरूखला त्याच्या सुंदर दाट केसांच्या सिक्रेट बद्दल विचारण्यात आलं होतं. शाहरूख केसांना असं काय लावतो ज्यामुळे त्यांचे केस खूपच दाट आणि मजबूत आहेत असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

दिवसरात्र गळून केस विरळ झाले? जास्वंदाच्या फुलाचा जादूई उपाय, विंचरायचा कंटाळा येईल इतके वाढतील केस

या प्रश्नावर शाहरूखने जे उत्तर दिलं ते  आश्चर्यचकीत करणारं होतं. शाहरूख खानने सांगितले की, माझे केस माझी स्ट्रेथं आहेत. शाहरुखच्या या उत्तरावर सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. १४ हजारांपेक्षा जास्त लोकांना  X वर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

मी आपल्या केसांवर आर्टिफिशियल असे काही वापरत नाही. मी माझ्या केसांवर कोणताही शॅम्पू किंवा तेल, हार्ड जेल वापरत नाही. केस धुण्यासााठी साध्या पाण्याचा वापर करतो. माझे केस माझ्या सौंदर्यातही भर घालतात. आपल्या फॅन्सचा सल्ला देताना शाहरूखने सांगितले की हेअरस्टाईल्सच्या नादात केसांसोबत खेळू नका.

आवळा, मेथी आणि भृंगराज लावल्याने केसांना काय फायदे होतात?

१) आवळ्यात व्हिटामीन ई-व्हिटामीन सी असते. यातील पोषक तत्वांमुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. तुम्ही घरच्याघरी आवळ्याचा पॅक बनवूनही केसांना लावू शकता.

२) मेथीच्या दाण्यांमध्ये असे काही गुणधर्म असतात ते हेअर फॉलिकल्सना मजबूत बनवतात आणि केस गळणं थांबवतात. केसांची वाढ होण्यासाठी मेथीच्या पाण्याने केस धुवा किंवा नियमित मेथीचा हेअर पॅक दह्यात मिसळून केसांना लावा. यामुळे केस दाट होण्यास मदत होईल.

समोरचे केस जास्त पांढरे झाले? ना डाय, ना मेहेंदी-करा ५ उपाय; नव्याने येतानाच काळे येतील केस

३) भृंगराज या औषधी पदार्थांचा वापर बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक केस वाढवण्याच्या तेलांमध्ये केला जातो. भृंगराजचे तेल किंवा शॅम्पू केसांना लावल्याने केस आतून मजबूत होतात आणि केसांना काळा रंगही टिकून राहतो.

Web Title: Shah Rukh Khan Hair Secret : Shah Rukh Khan Reveled Secret Behind His Messy, Thick Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.