Join us  

शाहिद कपूरची बायको मीरा राजपूत सांगतेय, सुंदर त्वचा आणि केसांसाठी खास तेल आणि लेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 3:38 PM

त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी बाजारातल्या उत्पादनांवर अवलंबून राहाण्यापेक्षा मीरा राजपूरत दूध, गुलाब, हळद, मध, जवस जास्वंद या घरगुती साधनांचा उपयोग करते.

ठळक मुद्दे चेहेर्‍यावर तेज येण्यासाठी आणि कोरडेपणा जाण्यासाठी मीरा दुधाचा हा उपाय नेहेमी करते.चेहेर्‍यावर मुरुम पुटकुळ्या , ब्लॅक हेडस, व्हाइट हेडस येऊ नये म्हणून हळद आणि मधाचा लेप लावते.मीरा आपले केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा हेअर मास्क आणि जास्वंदीचं तेल घरी तयार करुन वापरते.

मीर राजपूत ही स्वत: अभिनेत्री नसली तरी तिनं या क्षेत्रात स्वत:ची म्हणून एक ओळख निर्माण केली आहे. साधा मेकअप तरी आकर्षक दिसणारी मीरा आपल्या फॉलोअर्ससोबत समाजमाध्यमांद्वारे सतत संवाद साधते. तिच्या पोस्टमधे प्रामुख्याने ती त्वचेची आणि केसांची काळजी कशी घेते याबाबत ती घरच्या घरी करत असलेले प्रयोग सांगत असते.त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी बाजारातल्या उत्पादनांवर अवलंबून राहाण्यापेक्षा मीरा दूध, गुलाब, हळद, मध, जवस जास्वंद या घरगुती साधनांचा उपयोग करते.

त्वचेसाठी दूध-गुलाब- तुळस -हळद

  • कच्चं दूध हे त्वचेच्या अनेक समस्यांवर उत्तम उपाय असल्यानं जर त्वचेच्या समस्या असल्या तर चेहेर्‍याला कच्च दूध रोज लावावं असं मीरा म्हणते. कच्च्या दुधानं त्वचेचा कोरडेपणा, खराब त्वचा, उन्हानं आलेला काळवंडलेपणा, त्वचेच्या रंगात असलेला असमतोल यासारख्या लगेच दिसणार्‍या समस्या दूर होतात. यासाठी एका वाटीत तीन चार चमचे कच्चं दूध घ्यावं आणि कापसाच्या बोळ्यानं ते चेहेर्‍याला लावावं. एकदा लावलेलं दूध सुकलं की मग दुसरा कोट लावायचा. वाटीतलं दूध संपेपर्यंत चेहेर्‍यावर दुधाचे कोट द्यावे. चेहेर्‍यावर तेज येण्यासाठी आणि कोरडेपणा जाण्यासाठी मीरा दुधाचा हा उपाय नेहेमी करते.
  •  मीराच्या घरातल्या बागेत भरपूर गुलाबाची रोपं आहेत. बागेत येणारे गुलाब मीरा वाया जाऊ देत नाही. ती घरच्या घरी त्याचा गुलकंद तयार करते. त्वचा आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ती घरी तयार केलेल गुलकंद खाते. गुलकंद तयार करण्यासाठी पत्री खडी साखर, गुलाबाच्या पाकळ्या, हिरवी वेलची आणि मध यांचा उपयोग करते. या सर्व गोष्टी एकत्र खाल्ल्यानं त्वचेला आतून पोषण मिळतं. त्वचेच्या पेशींची झीज भरुन निघते. त्याचा परिणाम म्हणजे त्वचा तजेलदार आणि उजळ दिसते. मीरा सुंदर दिसण्यासाठी आणि निरोगी राहाण्यासाठी घरी तयार केलेला गुलकंद रोज खाते.
  •  

 

  • चेहेर्‍यावर मुरुम पुटकुळ्या , ब्लॅक हेडस, व्हाइट हेडस येऊ नये म्हणून हळद आणि मधाचा लेप लावते.त्यासाठी अर्धा चमचा मध आणि दोन चिमूट हळद एकत्र करुन चेहेर्‍यावर लेप लावावा. हा लेप पंचवीस मिनिटं चेहेर्‍यावर राहू द्यावा. त्वचा तजेलदार होण्यासाठी मीरा आठवड्यातून तीन वेळेस हा लेप लावते.
  • तुळशीची पानं त्वचेसाठी औषधासारखं काम करतात. त्वचेवर लालसरपणा आल्यास, बारीक फोड आल्यास मीरा तुळशीची पानं चेहेर्‍यावर लावते. यासाठी ती दोन ते तीन तुळशीची पानं आणि दोन थेंब गुलाबपाणी घ्यावं. तुळशीची पानं गुलाब पाण्यासोबत रगडावीत. हा तुळ्स लेप चेहेर्‍यावर जिथे डाग , चट्टे आहेत तिथे लावाव. तुळशीत दाहविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात . ते त्वचेच्या समस्या नैसर्गिकपणे बर्‍या करतात.

केसांसाठी घरगुती तेल आणि जेल

  • मीरा आपले केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी जास्वंदीची फुलं वापरते. जास्वंदीच्या फुलांचा हेअर मास्क आणि जास्वंदीचं तेल घरी तयार करुन वापरते. जास्वंदीचं तेल बनवण्यासाठी सात ते आठ जास्वंदीची पानं, दोन जास्वंदीची फुलं आणि एक कप खोबर्‍याचं तेल , 12 ते 15 कढीपत्त्याची पानं, एक चमचा आवळा पावडर, एक चमचा मेथ्या, थोडी ब्रह्मी आणि अर्धा चमचा कडुलिंबाची पावडर घ्यावी. हे तेल तयार करताना आधी मंद गॅसवर खोबर्‍याचं तेल गरम करावं. तेल चांगलं गरमझ् झालं की सर्व सामगी त्यात घाला. सर्व सामग्री तेलात टाकल्यावर तीन चार मिनिटं तेल उकळू द्यावं. मग गॅस बंद करुन तेल थंड होवू द्यावं. तेल थंड झालं की त्यात ब्राह्मी घालावी. या तेलानं मीरा नियमित आपल्या केसांना मसाज करते.
  •  

 

  •  केस चमकदार होण्यासाठी मीरा जवसाच्या जेलचा उपयोग करते. हा जेल देखील ती घरीच तयार करते. त्यासाठी अर्धा कप जवस एक बाटली पाण्यात उकळावं. पाच ए सात मिनिटं हे पाणी उकळू द्यावं. नंतर ते पाणी गाळून घ्यावं. थंड झाल्यावर पाणी गाळणं अवघड होतं. या जेलचा उपयोग तयार होताना बारीक केस बसवण्यासाठी करते तसेच केस धुतानाही ती या जवसाच्या तेलाचा उपयोग करते. मीरा म्हणते या घरगुती जवसाच्या जेलद्वारे केसांचं चांगलं पोषणही होतं.
टॅग्स :शाहिद कपूर