Lokmat Sakhi >Beauty > हळद-बेसन- गुलाबपाणी, शहनाझ हुसैन सांगतात-ब्यूटी प्रॉब्लेम कोणताही असो, घरात 3 गोष्टी असतील तर..

हळद-बेसन- गुलाबपाणी, शहनाझ हुसैन सांगतात-ब्यूटी प्रॉब्लेम कोणताही असो, घरात 3 गोष्टी असतील तर..

सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर महत्वाचं नसून स्वयंपाकघरच (kitchen for beauty) आपल्या सौंदर्य समस्यांवर उपचार करण्यास पुरेसं असल्याचं सौंदर्य तज्ज्ञ शहनाझ हुसेन (shahnaz Husain) सांगतात. हळद-बेसन-गुलाब पाण्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपाय करुन (natural ingredients for beauty) सौंदर्य समस्या सोडवता येतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 04:21 PM2022-07-28T16:21:49+5:302022-07-28T16:36:09+5:30

सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर महत्वाचं नसून स्वयंपाकघरच (kitchen for beauty) आपल्या सौंदर्य समस्यांवर उपचार करण्यास पुरेसं असल्याचं सौंदर्य तज्ज्ञ शहनाझ हुसेन (shahnaz Husain) सांगतात. हळद-बेसन-गुलाब पाण्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपाय करुन (natural ingredients for beauty) सौंदर्य समस्या सोडवता येतात. 

Shahnaz Husain advices to use natural ingredients for beauty. | हळद-बेसन- गुलाबपाणी, शहनाझ हुसैन सांगतात-ब्यूटी प्रॉब्लेम कोणताही असो, घरात 3 गोष्टी असतील तर..

हळद-बेसन- गुलाबपाणी, शहनाझ हुसैन सांगतात-ब्यूटी प्रॉब्लेम कोणताही असो, घरात 3 गोष्टी असतील तर..

Highlightsहळदीमध्ये ब्लीचिंग घटक असल्यानं हळदीच्या वापरानं त्वचा उजळते.त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी बेसनाचा उपयोग नैसर्गिक स्क्रबसारखा करतात.  त्वचा मऊ मुलायम करण्यासाठी गुलाब पाण्याचा उपयोग होतो.

आपलं स्वयंपाकघर म्हणजे मसाल्यांचा खजिना आहे. या खजिन्यासोबतच असेही काही घटक असतात जे स्वयंपाकासोबतच सौंदर्यासाठी वापरल्यास ब्यूटी ट्रीटमेण्टसाठी (beauty treatment at home)  घराबाहेर पडण्याची गरज पडत नाही. हळद-बेसन आणि गुलाब पाणी या तीन गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे वापरल्यास सर्व सौंदर्य समस्यांवर घरच्याघरी सहज उपचार (natural ingredients for beauty)  करता येतात. सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर महत्वाचं नसून स्वयंपाकघरच आपल्या सौंदर्य समस्यांवर उपचार करण्यास पुरेसं असल्याचं सौंदर्य तज्ज्ञ शहनाझ हुसेन (shahnaz Husain)  सांगतात.  हळद-बेसन-गुलाब पाण्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपाय करुन सौंदर्य समस्या कशा सोडवता येतील याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. 

Image: Google

हळद

हळदीमध्ये असलेल्या ॲण्टिसेप्टिक गुणांमुळे सौंदर्योपचारात हळद महत्वाची असते. हळदीमुळे त्वचेवरील सूज कमी होते, त्वचा मऊ होते. हळदीमध्ये ब्लीचिंग घटक असल्यानं हळदीच्या वापरानं त्वचा उजळते.

1.  उन्हामुळे चेहेऱ्यावर आलेला काळवंडलेपणा घालवण्यासाठी दह्यामध्ये चिमूटभर हळद घालून हा लेप रोज चेहेऱ्यास लावावा. 20 मिनिटानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. या सोप्या उपायानं त्वचा उजळते.

2. बेसनात दही आणि चिमूटभर हळद घालून पेस्ट तयार करावी. आठवड्यातून तीन वेळा ही पेस्ट हाता पायांना लावावी. अर्ध्या तासानंतर हात पाय धुवावेत. हात पाय उजळण्यासाठी हा होममेड बाॅडी पॅक असरदार आहे.

3. चेहेऱ्यावर असलेले अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी दुधात हळद घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहेऱ्यावर गोलाकार मसाज करत लावावी. नियमित हा उपाय केल्यास चेहेऱ्यावरील केस कमी होतात. 

4. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी आधी ऑलिव्ह तेल लावून मसाज करावा. बेसन, दही आणि हळद एकत्र करुन त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट लावून अर्ध्या तासानंतर धुवून टाकावी. 

Image: Google

बेसन

1. त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी बेसनाचा उपयोग नैसर्गिक स्क्रबसारखा करता येतो. बेसनापासूनच उत्तम गुणवत्तेचं चेहेऱ्याचं  सौंदर्य जपणारं उटणं तयार करता येतं.  डाळीच्या पिठाचं उटणं तयार करण्यासाठी एका वाटीत बेसन, तांदळाचं पीठ, वाटलेले बदाम, दही आणि हळद एकत्र करुन पेस्ट तयार करावी. आधी अंगाला तिळाच्या तेलानं मसाज कराव. नंतर बेसन पिठाचं उटणं लावावं. या उटण्यामुळे शरीराच्या त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते. त्वचा चमकदार होते. 

2. उन्हानं काळवंडलेला चेहेरा स्वच्छ करण्यासाठी, त्वचा घट्ट करण्यासाठी बेसन  पिठाचा लेप लावावा. यासाठी एका वाटीत बेसन, दही, लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहेऱ्यास लावावी. अर्ध्या तासानं चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

3. त्वचेचा रंग उजळ्ण्यासाठी वाटलेल्या बदामात बेसन, दूध आणि लिंबाचा रसा घालावा. हे मिश्रण चेहेऱ्यास लावून 20-30 मिनिटं ठेवावं. नंतर चेहेरा स्वच्छ धुवून घ्यावा. या उपायानं उन्हानं काळवंडलेला चेहेरा उजळतो.

4. दूध किंवा दह्यात बेसन घालून लेप तयार करावा. हा लेप चेहेऱ्यास लावून 20 मिनिटं ठेवावा. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. या उपायानं चेहेऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जावून त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. 

5. चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांवर उपाय करण्यासाठी बेसन, चंदन पावडर, हळद आणि दूध एकत्र करुन पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहेऱ्यास लावून 20 मिनिटं ठेवावी. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

गुलाब पाणी

त्वचा मऊ मुलायम करण्यासाठी गुलाब पाण्याचा उपयोग होतो. गुलाब पाण्यात अ, क, डी, ई आणि बी 3 हे पोषक घटक असतात. टोनर म्हणून चेहेऱ्यास गुलाब पाणी लावणं फायदेशीर ठरतं. गुलाब पाणी नैसर्गिक माॅश्चरायझर असल्यानं  कोरडी त्वचा मऊ होते. 

Web Title: Shahnaz Husain advices to use natural ingredients for beauty.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.