हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूपच कठीण असतं. (Winter Care Tips) अशा वातावरणात स्किन ड्राय होते आणि चेहऱ्यावर कोरडेपणाही येतो. त्वचा कोरडी पडल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येत नाही आणि रिंकल्स, पिंपल्स येणं अशा समस्या उद्भवतात. (Skin Dryness) त्वचा क्लिन ठेवण्यासाठी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. (Shahnaz Husain Shares Best Beauty Hacks For All Skin) चेहरा कोरडा पडू नये, त्वचा मऊ राहावी यासाठी ब्युटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. (Skin Cleaning) ज्याचा वापर स्किन केअर रूटीनमध्ये केल्यास तुमच्या त्वचेचं सौंदर्य खुलून येईल आणि त्वचा ग्लोईंग दिसेल. (Shahnaz Husain Beauty Tips)
हिवाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी (How to Take Care Of Skin)
1) सगळ्यात आधी चेहऱ्याचे टोनिंग करण्यासाठी कच्चं दूध, एलोवेरा जेल आणि मधाचा वापर करा. या तिन्ही वस्तूंच्या मदतीने स्किन एक्सफोलिएट होण्याबरोबरच मॉईश्चर येण्यासही मदत होईल.
2) सगळ्यात आधी चेहरा व्यवस्थित साफ करून घ्या. त्यानंतर कच्च दूध चेहऱ्याला लावा. मध आणि एलोवेरा जेल मिसळून याची पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्याला लावा. नंतर १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
3) त्यानंतर मलई, हळद आणि बेसनाची पेस्ट बनवून चेहऱ्याला हा पॅक लावा आणि १५ मिनिटं तसाच राहू द्या. नंतर चेहऱ्याला रोज वॉटर आणि एलोवेरा जेल मिसळून लावा.
बदामापेक्षा दुप्पट प्रोटीन देते 'ही' भाजी; सद्गुरू सांगतात 'ताकदीचा खजिना'- हाडं होतील बळकट
4) आठवड्यातून एकदा बेसन आणि दूधाची पेस्ट चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी हळूहळू स्क्रब करून चेहरा स्वच्छ धुवा. हे रूटीन फॉलो केल्यानं तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यासही मदत होईल. हळूहळू टॅनिंग निघून जाईल.
200 किलो वजनाच्या कोरोओग्राफरनं ९८ किलो घटवलं; डाएटमध्ये 'हे' ५ बदल करून मेंटेन केलंं
5) ग्लोईंग स्किनसाठी शहनाज हुसैन लिंबू आणि मधाचा उपाय करतात. मध आणि लिंबाचा रस योग्य प्रमाणात मिक्स करून याचे मिश्रण चेहऱ्याला लावा. हा पॅक पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करा त्यानंतर थंड पाण्याचे चेहरा धुवून घ्या.
6) पिंपल्स फ्री त्वचेसाठी कडुलिंब आणि चंदनाचा फेस मास्क तुम्ही लावू शकता. यासाठी ताजी कडुलिंबाची पानं वाटून त्याची पेस्ट बनवून घ्या त्यानंतर त्यात २ चमचे चंदनाची पावडर घाला. त्यात पाणी मिसळून ही पेस्ट चेहऱ्याला लावा त्यानंतर सुकू द्या. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हे घरगुती उपाय टॅनिंग घालवण्यात मदत करतील.