Lokmat Sakhi >Beauty > विंचरताना केस तुटतात, भरपूर कोंडा झालाय? शहनाज हुसैनचे ३ उपाय, लांब-दाट होतील केस

विंचरताना केस तुटतात, भरपूर कोंडा झालाय? शहनाज हुसैनचे ३ उपाय, लांब-दाट होतील केस

Shahnaz husain hair care tips : केस कधीही रबर बॅण्डनं घट्ट बांधू नये. केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 08:37 AM2023-06-04T08:37:00+5:302023-06-04T08:40:01+5:30

Shahnaz husain hair care tips : केस कधीही रबर बॅण्डनं घट्ट बांधू नये. केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा.

Shahnaz husain hair care tips : 3 Best Shahnaz Hussain Hair Care Tips for Hair Fall | विंचरताना केस तुटतात, भरपूर कोंडा झालाय? शहनाज हुसैनचे ३ उपाय, लांब-दाट होतील केस

विंचरताना केस तुटतात, भरपूर कोंडा झालाय? शहनाज हुसैनचे ३ उपाय, लांब-दाट होतील केस

केसांची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी सुरूवातीपासूनच योग्य काळजी घेणं गरजेचं असतं जेणेकरून भविष्यात केसांच्या समस्या उद्भवणार नाहीत. केसांच्या संबंधित समस्यांमध्ये केस गळणं, पांढरे केस,  केसांना फाटे फुटणं असे बदल होतात. (Beauty Tips) आपले केस नेहमीच काळेभोर, लांबसडक दिसावेत असं प्रत्येकालाच वाटते. (How to stop Hair fall) सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन (Shahnaz hussain) यांनी केसांच्या संबंधित समस्या टाळण्यासाठी काही खास उपाय सुचवले आहेत. जेणेकरून केसांच्या प्रोब्लेमुळे नैराश्य येणार नाहीत. (Hair Care  Tips)

हेअर फॉलची अनेक कारणं असू शकतात

हेअर फॉलच्या कारणांमध्ये कोंडा होणं,  तेलकट स्काल्प, ताण-तणाव, थायरॉईड इम्बेलेंस, आजारपण, पोषणसंबंधित  समस्यांचा समावेश आहे. सतत केसांना रंग देणं, स्ट्रेटनिंग, स्मूथनिंगमुळे केस जास्त तुटतात. जर तुमचे केस खूपच गळत असतील आणि मालिश केल्यानंतरही ही समस्या वाढत असेल हलक्या हातानं केसांची मालिश करा. यावेळी केसांना नारळाचं तेल कोमट करून लावा. आठवड्यातून दोन वेळा केस स्वच्छ धुवा. तेलकट केसांना आठवड्यातून ३ ते ४ वेळा धुवावे लागते. शॅम्पू पाण्यात मिक्स करून मग केसांना लावा.

केसांना फाटे फुटण्याची समस्या कशी टाळायची

जेव्हा जास्त  कोरडे पडतात तेव्हा केस खूपच गळतात. स्काल्पवरचे पोर्स घाणेरडे असतात आणि तेलामुळे ब्लॉक होतात. यामुळे कोरडेपणा उद्भवतात.  केसांना फाटे फुटल्यास लगेचच ट्रिम करायला हवे. केसांची नियमित काळजी घ्यायला हवी. केस कधीही रबर बॅण्डनं घट्ट बांधू नये. केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा.

आठवड्यातून २ वेळा  शुद्ध नारळाचं तेल गरम करून केसांना लावा आणि टॉवेल गरम पाण्यात बुडवा. यातील पाणी पिळून घ्या नंतर गरम टॉवेल डोक्यावर लपेटून ठेवा. टॉवेल केसांवर 5 मिनिटे सोडा. हे 3-4 वेळा हा प्रयोग करा. केस धुण्यासाठी सौम्य हर्बल शॅम्पू वापरा. केसांना एलोवेरा जेल लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा. स्प्लिट एंड्ससाठी, शॅम्पू करण्यापूर्वी अंड्यातील पिवळ बलक किंवा दही टोकांवर लावणे देखील फायदेशीर ठरेल.

कोंडा आणि खाजेच्या समस्येवर उपाय

स्काल्पवर खाज आणि कोंडा सोसायसिसमुळे उद्भवतो. म्हणून खाज येत असेल तर आठवड्यातून तीन किंवा चार वेळा केसांना कोंडा दूर करण्यासाठी सौम्य हर्बल शॅम्पूने धुवा. खाज येत असल्यास एपल सायडर व्हिनेगर  पाण्यात मिसळा. या पेस्टमध्ये कापूस भिजवून टाळूला लावा. आठवड्यातून एकदा ऑलिव्ह ऑईल किंवा तिळाचे तेल गरम करून रात्री डोक्याला लावावे. रात्रभर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने केस धुण्याच्या १५ मिनिटं आधी लिंबाचा रस लावा.

Web Title: Shahnaz husain hair care tips : 3 Best Shahnaz Hussain Hair Care Tips for Hair Fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.