Join us  

सतत गळून केसांची शेपटी झाली? शहनाज शहनाज हुसैन सांगतात घरातल्या ५ गोष्टी लावा, लांब होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 11:23 AM

Shahnaz Husain Hair Care Tips : दाट, लांब केस मिळवण्यासाठी महिला नेहमीच चांगल्या प्रोडक्ट्सच्या शोधात असतात. 

केस जाड व्हावेत, केसांना वाढ असेल तर आपण अजून सुंदर दिसू असं प्रत्येक महिलेला वाटतं. कारण सुंदर, लांब केस सौंदर्यात भर घालतात. (Hair Care Tips) दाट, लांब केस मिळवण्यासाठी महिला नेहमीच चांगल्या प्रोडक्ट्सच्या शोधात असतात. धूळ, माती, प्रदूषण  आणि वातावरणातील बदलांमुळे अनेकांचे केस  कोरडे, निर्जिव होतात आणि गळू लागतात. (Shahnaz Husain Hair Fall Tips Shahnaz Husain for Hair Growth)

काही हेअर केअर टिप्सचा वापर करून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता. हेअर एंड ब्युटी स्टायलिश शहनाज हुसैन (Shahnaz Husain)  यांनी केसांची काळजी घेण्यासाठी काही सोप्या, उपयोगी अशा टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे तुमचे केस लांब होतील केसांसाठी हा रामबाण  ठरेल. (How To Grow Hair Faster)

1) लसूण

एच. के वायटल च्या रिपोर्टनुसार लसणात इसेंशियल न्युट्रिएंट्स असतात.  यात सल्फर, सेलेनियम, फॉस्फरस, व्हिटामीन सी, व्हिटामीन बी-६ असते. ज्यामुळे केसांना पोषण  मिळते. यात एंटी बॅक्टेरिअल, एंटी फंगल प्रॉपर्टीज असतात.  लसणात एलिसिन नावाचे कम्पाऊंड असते ज्यामुळे मेंदूत ब्लड सर्क्युलेशन चांगले होण्यास मदत होते (Ref). ज्यामुळे हेअर फॉल रोखण्यासही मदत होते.

भाज्यांमध्ये वापरला जाणारा लसूण केसांसाठी गुणकारी ठरतो. लसणाच्या वापराने केस गळणं थांबवता येतं. नेहमी वापरत असलेल्या तेलात लसूण घालून गरम करून घ्या आणि या तेलाचा वापर केसांवर करा ज्यामुळे केस लांबसडक दाट होतील. 

2) केसांना कोमट तेल लावा

केसांना साधं  तेल लावण्याऐवजी तुम्ही  हलकं कोमट केलेलं तेल केसांच्या मुळांना लावू शकता. ही हॉट ऑईल थेरेपी स्काल्पचे पोर्स उघडण्याचे काम करते. 

3) कडुलिंब

कडुलिंब औषधी गुणांसाठी ओळखला जातो. यात असे काही गुण असतात ज्यामुळे केसांची गळणं थांबत. तुम्ही पाण्यात कडुलिंबाची पानं उकळवून या पाण्याने आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुवू शका. ज्यामुळे पोत सुधारेल आणि केस दाट दिसतील.

4) नारळाचे दूध

नारळाचे दूध केसांना लावल्यास केस शायनी आणि दाट होतात. यासाठी नारळाच्या तुकडे चिरून मिक्सरच्या भांड्यात घालून ब्लेंड करून घ्या. त्यात पाणी घाला आणि दूध गाळून घ्या.  हे दूध आपल्या केसांवर लावल्याने  केस  लांबसडक, दाट दिसतील.

सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमीच होत नाही? ‘या’ बिया १ ग्लास पाण्यात घालून प्या!

5) प्रोबायोटीक्स

प्रोटीन आपल्या केसांसाठी खूप महत्वाचे असते. पण बाजारातील प्रोटीन आणि कॅरोटीन ट्रिटमेंट घेण्यापेक्षा आठवड्यातून एकदा केसांना दही लावा. ज्यामुळे केसांना प्रोटीन मिळेल आणि केस लांबसडक दाट सुद्धा होतील आणि नवीन केस येतील.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स