Join us  

केस गळून केसांची शेपटी झाली? शहनाज हुसैन सांगतात १ सोपा उपाय; स्ट्रेट-दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 12:24 PM

Shahnaz Husain On How To get Straight Hair At Home : केसांच्या क्युटिकल्सची काळजी घेण्याबरोबरच केसांना स्मूथ आणि शाईन होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त केस मजबूत होतात.

केसांना स्ट्रेट करण्यासाठी तुम्हाला बाजारात वेगवेगळ्या टेक्नोनॉजीज पाहायला मिळतील. (Hair Care Tips) पण या केमिकल्सयुक्त पदार्थांमुळे  हेअर डॅमेजचा धोका असतो.  (Shahnaz Husain Tips For Long Thick And Shiny Hair) हेअर स्ट्रेट करण्यासाठी तुम्हाला हिटिंग टुल्स नाही तर काही घरगुती उपायांची मदत घ्यावी लागेल. हेअर एक्सपर्ट शहनाज हुसैन (Shahnaz husain Hair Care Tips) यांनी हेअर स्ट्रेट करण्यासाठी काही सोप्या टिप्स शेअर  केल्या आहेत. (Shahnaz Husain On How To get Straight Hair At Home)

केस धुण्यासाठी कोणत्या प्रकारच्या पाण्याची निवड करावी?

केस धुण्यासाठी तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता.  चुकूनही गरम पाण्याचा वापर करू नका. थंड किंवा नॉर्मल पाण्याचा वापर करा. केसांच्या क्युटिकल्सची काळजी घेण्याबरोबरच केसांना स्मूथ आणि शाईन होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त केस मजबूत होतात.

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

मार्केटमध्ये अनेक प्रकारचे हेअर स्टायलिंग टुल्स उपलब्ध आहेत. पण केसांना स्ट्रेट करण्यासाठी तुम्ही ब्रश किंवा हिटिंग टुल्सऐवजी कंगव्याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला लांब दातांच्या कंगव्याची निवड करावी लागेल.  यामुळे केसांचा फ्रिजिनेस कमी होईल आणि हेअर डॅमेज होणार नाही. 

केसांवर हेअर सिरमचा वापर कसा करावा?

हेअर स्ट्रेट करण्यासाठी बाजारात अनेक हेअर सिरम  उपलब्ध आहेत. यातून फक्त पोषण मिळत नाही तर केस स्ट्रेट होण्यासही मदत होते. यासाठी तुम्ही स्मूथनिंग हेअर सिरमचा वापर करू शकता.  याचा वापर केसांच्या लेंथवर करा आणि स्काल्पपासून दूर ठेवा.  यावर तुम्ही आर्गन ऑईल, नारळाचे तेल यांसारख्या वस्तूंचा वापर करू शकता. 

हाडांना भरपूर फॉस्फोरस देणारे 5 पदार्थ खा; कॅल्शियमही मिळेल-पोलादी शरीर, हाडं मजबूत होतील

केस सुकवण्यासाठी काय करावे? 

केस सुकवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या हिटींग टुल्सचा वापर करतो. पण यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे केसांचे टेक्स्चर डॅमेज होऊ शकते. तुम्ही हलक्या हाताने केसांवर कमी प्रेशरने केस विंचरू शकता. केस धुतल्यानंतर लगेचच विंचरण्यापेक्षा आधी केस पुसून नंतर सुकवून घ्या. या प्रक्रियेने  केस लवकर सुकतील आणि डॅमेजही होणार नाहीत.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी