Join us  

ब्लॅकहेड्स,चामखीळ वाढत आहेत? शहनाज हुसैन सांगतात ५ टिप्स, त्वचाविकारांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 11:27 AM

Shahnaz Husain Tips for Glowing Skin : ब्लॅकहेड्सची समस्या तेलकट त्वचा असलेल्या असलेल्यांना उद्भवते. यामुळे त्वचेचे पोर्स बंद होतात. त्वचेवर ब्लॅकहेड्स दिसू लागतात. वेळीच ब्लॅकहेड्स काढले नाही तर त्वचेवर एक्ने येतात.

बदलत्या वातावरणात त्वचेतही बरेच बदल होतात. अनेकदा महागड्या पार्लर ट्रिट्मेंट्स करूनही हवातसा बदल दिसत नाही. ब्लॅकहेड्स, चामखीळ त्वचेवर येणं खूपच कॉमन आहे.  (Skin Care Tips) काही नैसर्गिक उपायांनी तुम्ही चामखिळ  येण्याची समस्या रोखू शकता. ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांच्या स्किन केअर टिप्स फॉलो केल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. (Best Shahnaz Hussain Tips for Glowing Skin)

अनेकदा असं होतं की शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेवरही परिणाम होतो. चामखीळ त्यापैकीच एक आहे. त्वचेच्या एका भागावर चामखीळ झाल्यास हळूहळू संपूर्ण शरीरावर पसरते.  सहजासहजी दूर  न होणारा हा त्वचेतील बदल आहे. डॉक्टरांच्या किंवा स्किन एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानं ही समस्या दूर करता येऊ शकते. (Shahnaz Husain Tips for Glowing Skin)

चामखीळ घालवण्याचे उपाय

तुम्ही औषध किंवा कोणत्याही ट्रिटमेंटशिवाय चामखीळ घालवण्यासाठी व्हिनेगरचा वापर करू शकता. सगळ्यात आधी एका वाटीत एपल सायडर व्हिनेगर घ्या. कापसाच्या बोळ्याच्या मदतीनं चेहऱ्याला लावा. नंतर एका कॉटनच्या कापडानं झाका १० ते १५ मिनिटांनी हे कापड काढून टाका. दिवसभरातून २ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.

ब्लॅकहेड्स

ब्लॅकहेड्सची समस्या तेलकट त्वचा असलेल्या असलेल्यांना उद्भवते. यामुळे त्वचेचे पोर्स बंद होतात. त्वचेवर ब्लॅकहेड्स दिसू लागतात. वेळीच ब्लॅकहेड्स काढले नाही तर त्वचेवर एक्ने येतात. एक्ने एकदा वाढले की त्यांना कमी करणं कठीण होतं.नैसर्गिकरित्या ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी बेकींग सोड्याचा वापर करा.  सगळ्यात आधी एका वाटीत  बेकिंग सोडा आणि पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर ५ मिनिटांसाठी लावा आणि चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.

१) जर तुम्हाला बेकींग सोड्याचा वापर चेहऱ्यावर करायचा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ, दही, गुलाब पाण्याचा वापर करू शकता.

२) बदाम आणि हळदीने ब्लॅकहेट्स दूर होऊ शकतात.

३) ओट्स स्क्रब दही वापरूनही तुम्ही ब्लॅकहेड्स काढू शकता.

४) त्वचा एक्सफोलिएट करा

५)  नियमित फेसपॅक लावल्यानं त्वचेचा पोत सुधारतो. त्वचा चमकते वय वाढीच्या खुणाही कमी होतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी