Lokmat Sakhi >Beauty > पिंपल्समुळे चेहऱ्यावरचे काळे डाग वाढले? ग्लोईंग, डागविरहीत त्वचेसाठी शहनाज हुसैनच्या ३ टिप्स

पिंपल्समुळे चेहऱ्यावरचे काळे डाग वाढले? ग्लोईंग, डागविरहीत त्वचेसाठी शहनाज हुसैनच्या ३ टिप्स

Shahnaz Husain Tips for Glowing Skin : गुलाब पाणी कोरड्या त्वचेसाठी खूप चांगले आहे कारण ते एक प्रकारचे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. याला शक्तिशाली नैसर्गिक त्वचा टोनर देखील म्हटले जाऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 03:41 PM2022-08-06T15:41:30+5:302022-08-06T18:03:03+5:30

Shahnaz Husain Tips for Glowing Skin : गुलाब पाणी कोरड्या त्वचेसाठी खूप चांगले आहे कारण ते एक प्रकारचे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. याला शक्तिशाली नैसर्गिक त्वचा टोनर देखील म्हटले जाऊ शकते.

Shahnaz Husain Tips for Glowing Skin : Natural ingredients that are great for your skin | पिंपल्समुळे चेहऱ्यावरचे काळे डाग वाढले? ग्लोईंग, डागविरहीत त्वचेसाठी शहनाज हुसैनच्या ३ टिप्स

पिंपल्समुळे चेहऱ्यावरचे काळे डाग वाढले? ग्लोईंग, डागविरहीत त्वचेसाठी शहनाज हुसैनच्या ३ टिप्स

(Image Credit- Pinterest)

भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाले वापरले जातात. मसाल्यांबरोबरच इतरही काही पदार्थ आहेत, जे चेहऱ्यावर तसेच खाण्यासाठी वापरता येतात.  (Shahnaz Husain Tips for Glowing Skin) आम्ही तुम्हाला यापैकी काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असतील आणि त्वचेची अतिरिक्त काळजी घेण्यासाठी तुम्ही त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे चेहऱ्यावर वापर करू शकता. ब्युटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांनी या घरगुती उपायांच्या वापराबाबत अधिक माहिती दिली आहे. (Natural ingredients that are great for your skin)

हळद

पुरातन काळापासून हळद हा त्याच्या जंतुनाशक गुणधर्मांमुळे औषधी आणि सौंदर्यप्रसाधनासाठी महत्त्वाचा घटक आहे. हळद त्वचेतील जळजळ कमी करते, तसेच त्वचा मुलायम बनवते. इतकेच नाही तर हळदीमध्ये ब्लीचिंग गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि चमक येतो.  तुम्ही त्वचेवर हळद वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता.

१) टॅन दूर करण्यासाठी दह्यात चिमूटभर हळद मिसळून रोज चेहऱ्याला लावा. 20 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा. असे केल्याने त्वचा चमकते.

२) बेसनाच्या पिठात दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट बनवा. आठवड्यातून तीनदा हात आणि पायांवर लावा. अर्ध्या तासानंतर ते धुवा. हा एक चांगला घरगुती बॉडी पॅक आहे.

३) चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठी हळद पावडर आणि दुधाची पेस्ट तयार करा आणि गोलाकार हालचालीत त्वचेवर घासून घ्या. कालांतराने चेहऱ्यावरील केस निघून जाण्यास मदत होईल. 

बेसन

बेसनाचा वापर पारंपारिकपणे सौंदर्य निगा राखण्यासाठी केला जातो, प्रामुख्याने त्वचेच्या खोल स्वच्छतेसाठी, बेसनापेक्षा चांगला नैसर्गिक स्क्रब नाही. वास्तविक, बेसनामध्ये खूप चांगले एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. बेसनपासून जितके चांगले उबटान बनवता येते तितके ते इतर कोणत्याही पदार्थापासून बनवता येत नाही. बेसनाचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता.

१) उटणे बनवण्यासाठी एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, बदाम, दही आणि हळद एकत्र करून घ्या. सर्वात आधी तिळाच्या तेलाने शरीराला मसाज करा. नंतर ही पेस्ट लावा. आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास ते धुवा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा चमकदार होते.

२) टॅन काढण्यासाठी, त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि घट्ट करण्यासाठी फेस पॅक म्हणून बेसन वापरा. बेसनाच्या पिठात दही, लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घाला. त्वचेवर लावा आणि अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुवा.

३) बेसन, दूध आणि लिंबाच्या रसात बदाम मिसळा. ते चेहऱ्यावर लावा आणि 20 ते 30 मिनिटांनी धुवा. हे टॅन काढून टाकण्यास आणि त्वचेचा रंग हलका करण्यास मदत करते.

४) बेसनाचा पॅक त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतो. बेसन दूध किंवा दह्यामध्ये मिसळा आणि 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने धुवा.

गुलाबपाणी

गुलाब पाण्यात जीवनसत्त्वे ए, सी, डी, ई आणि बी3 असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते संवेदनशील त्वचेसाठी आणि मुरुमांच्या त्वचेसाठी देखील योग्य आहे. गुलाब पाणी कोरड्या त्वचेसाठी खूप चांगले आहे कारण ते एक प्रकारचे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. याला शक्तिशाली नैसर्गिक त्वचा टोनर देखील म्हटले जाऊ शकते.
 

Web Title: Shahnaz Husain Tips for Glowing Skin : Natural ingredients that are great for your skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.