Lokmat Sakhi >Beauty > Shahnaz husain tips for hair growth : केस गळून गळून खूप पातळ झालेत, वाढही होत नाहीये? दाट केसांसाठी शहनाझ हुसैननं सांगितले सोपे उपाय 

Shahnaz husain tips for hair growth : केस गळून गळून खूप पातळ झालेत, वाढही होत नाहीये? दाट केसांसाठी शहनाझ हुसैननं सांगितले सोपे उपाय 

Shahnaz husain tips for hair growth : सुंदर केसांमध्ये एक गुळगुळीत पोत आणि व्हॉल्यूम असतो.  त्यामुळे अशा प्रकारचे केस दाट दिसतात. सगळ्यांनाच असे केस मिळणं कठीण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 03:40 PM2022-03-01T15:40:33+5:302022-03-01T16:46:54+5:30

Shahnaz husain tips for hair growth : सुंदर केसांमध्ये एक गुळगुळीत पोत आणि व्हॉल्यूम असतो.  त्यामुळे अशा प्रकारचे केस दाट दिसतात. सगळ्यांनाच असे केस मिळणं कठीण आहे.

Shahnaz husain tips for hair growth : Shahnaz husain tips to add volume in hair | Shahnaz husain tips for hair growth : केस गळून गळून खूप पातळ झालेत, वाढही होत नाहीये? दाट केसांसाठी शहनाझ हुसैननं सांगितले सोपे उपाय 

Shahnaz husain tips for hair growth : केस गळून गळून खूप पातळ झालेत, वाढही होत नाहीये? दाट केसांसाठी शहनाझ हुसैननं सांगितले सोपे उपाय 

आपल्या केसांचे सौंदर्य वाढवावे असे कोणाला वाटत नाही? (Hair Care Tips) सुंदर केस मिळविण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. विशेषत: मुली केसांना चमक आणण्यासाठी आणि त्यांना निरोगी करण्यासाठी अनेक मार्ग वापरतात.  सुंदर केस  चमकदार   असतात, जास्त तेलकट किंवा जास्त कोरडे नसतात. (Shahnaz husain tips to add volume in hair)

सुंदर केसांमध्ये एक गुळगुळीत पोत आणि व्हॉल्यूम असतो.  त्यामुळे अशा प्रकारचे केस दाट दिसतात. सगळ्यांनाच असे केस मिळणं कठीण आहे. (How To Make Hair Grow ) पण केसांची योग्य काळजी घेऊन तुम्ही सुंदर, दाट केस मिळवू शकता. सौंदर्य तज्ज्ञ शहनाझ हुसैन (Shahnaz husain) यांनी केसांच्या चांगल्या वाढीसाठी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. त्या टिप्सचा वापर करून तुम्ही सुंदर केस मिळवू शकता. (How to grow hair faster)

डाएटची खास काळजी घ्या

जर तुम्हाला तुमचे केस घट्ट करायचे असतील तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. केसांना खरेतर रक्तप्रवाहातील पोषक तत्वांमुळे पोषण मिळते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आणि व्हॉल्यूम वाढवण्यासाठी पोषण आणि चांगले रक्त परिसंचरण दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमच्या आहारात दररोज एक लहान वाटी स्प्राउट्सचा समावेश करा, कारण त्यात अमीनो ऍसिड असतात, जे केसांसाठी सर्वात महत्वाचे पोषक असतात.

रिसर्च-निरोगी दीर्घायुष्यासाठी रोजच्या जेवणातून फक्त हे पदार्थ वगळा; वाढत्या वयातही आजारांपासून लांब राहाल

केसांना कंडिशनिंग करा

हेअर कंडिशनिंग हा केसांना व्हॉल्यूम वाढवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे ज्याद्वारे आपण केसांचे स्वरूप सुधारू शकतो. कंडिशनिंगमुळे केसांचे पोषण होण्यासही मदत होते, त्यामुळे ते दाट दिसतात. कंडिशनर प्रामुख्याने केसांना चमकदार बनवते. रसायनांच्या प्रभावामुळे केसांचे नुकसान होऊ शकते जे कंडिशनिंगद्वारे दुरुस्त केले जाऊ शकते. कंडिशनिंगमुळे केसांचा पोत आणि लुक सुधारण्यास मदत होते. केस धुतल्यानंतर कंडिशनर केसांना व्हॉल्यूम देते म्हणजेच केस दाट दिसतात.

केस दाट करण्यासाठी मेहेंदी एक शक्तिशाली नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. त्यामुळे केसांना जाडी, आकारमान आणि ताकद मिळते. पण केसांना मेंदी लावण्यापूर्वी तुम्ही चांगल्या दर्जाची मेहेंदी पावडर वापरत आहात याची खात्री करा. मेहंदी केसांमध्ये लालसर तपकिरी रंग सोडते, हे तुम्ही ऐकूनच असाल. मेहेंदी केस काळे करत नाही, परंतु त्यांना एक आकर्षक हायलाइट देते. पण रंगीत केसांना कधीही मेहेंदी लावू नका, कारण त्यामुळे केसांचा रंग खराब होऊ शकतो.

वाढलेली शुगर लेव्हल 120 मिनिटात घटवेल हा खास ज्यूस; डायबिटीस कंट्रोलचा उत्तम उपाय, तज्ज्ञांचा दावा 

मेहेंदी एक शक्तिशाली नैसर्गिक क्लींजर देखील आहे.   मेहंदी केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. केसांना मेहेंदी लावण्यासाठी मेहेंदी पावडरमध्ये पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि केसांना पॅक म्हणून लावा. कंडिशनिंगसाठी, ते अर्धा तास केसांवर लावून ठेवलं पाहिजे.

इतर उपाय

कोरड्या केसांना व्हॉल्यूम आणि चमक देण्यासाठी, दोन चमचे एरंडेल तेल, एक लिंबाचा रस आणि एक चमचे ग्लिसरीन घ्या, या सर्व घटकांसह एक अंड घाला. हे घटक चांगले मिसळा. या मिश्रणानं टाळूवर मसाज करा आणि केसांनाही लावा. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा.

कोरडे, तेलकट केस दाट करण्यासाठी एक कप मूग डाळ रात्रभर भिजत ठेवा. नंतर मिक्सरमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी घालून बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा. केसांचे वेगवेगळे भाग करा आणि मसूराची पेस्ट केसांमध्ये अशा प्रकारे लावा की संपूर्ण केस कव्हर होतील. ही पेस्ट केसांवर अर्धा तास राहू द्या आणि साध्या पाण्याने केस धुवा

Web Title: Shahnaz husain tips for hair growth : Shahnaz husain tips to add volume in hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.