वयाची तीशी ओलांडल्यानंतर शरीरात अनेक बदल येत असतात. या बदलांमुळे त्वचेवर परिणाम होतो. अनेकांची त्वचा कमी वयातच सैल व्हायरल सुरूवात होते. अनेकदा महिला याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दिवसेंदिवस त्या अधिक वयस्कर दिसू लागतात. सौंदर्य तज्ञ शहनाज हुसेन म्हणतात, ''30 वर्षानंतर महिलांनी त्यांच्या त्वचेची अधिक काळजी घेतली पाहिजे. जर त्यांनी हे केले नाही तर त्वचा ओघळू शकते आणि लोक लवकर म्हातारे दिसू लागतात. त्वचेवरील सैलपणा नको असल्यास रोजच्या जगण्यात काही बदल करायला हवा. त्वचेची काळजी घेताना काही चुका टाळल्यास वाढत्या वयात वय वाढीच्या खुणांपासून लांब राहता येऊ शकतं.
1) संतुलित आहार न घेणं
शहनाज म्हणतात की, "जर तुमची तब्येत चांगली असेल तरच तुम्ही सुंदर दिसाल. परंतु जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा तुमच्या सौंदर्यावरही परिणाम होतो. म्हणूनच तुम्ही चांगले अन्न खाणे खूप महत्वाचे आहे, जे तुमच्या त्वचेच्या आरोग्याला देखील लाभदायक ठरू शकते. खरं तर, अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना असे वाटते की चेहऱ्यावरील सर्व दोष मेकअपने लपवता येतात. पण तसे नाही. महिलांनी चांगले खावे आणि तणावाला कसे सामोरे जावे हे माहित असले पाहिजे. कारण या दोन्ही गोष्टींचा त्वचेवर परिणाम होतो. ''
2) स्किन टाईपनुसार काळजी न घेणं
सहसा स्त्रियांना त्यांचा स्किन टाईप काय आहे हे देखील माहित नसते. एवढेच नाही, ते वापरत असलेली सौंदर्य उत्पादने देखील त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार नसतात. शहनाज म्हणतात की, ''हे देखील त्वचा सैल होण्याचे एक मोठे कारण आहे. जर तुम्ही तेलकट त्वचेवर क्रीम ब्रेस्ड उत्पादने लावली तर त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होईल. दुसरीकडे, जर तुम्ही कोरड्या त्वचेवर वॉटर बेस्ड उत्पादने वापरत असाल तर ते तुमच्या त्वचेलाही हानी पोहोचेल. कोरड्या त्वचेच्या स्त्रियांनी चांगल्या क्रीमने मालिश करणे आवश्यक आहे, यामुळे त्वचा घट्ट होईल.
३) रात्री चेहरा स्वच्छ न करणं
अनेक स्त्रिया फक्त सकाळी त्वचा स्वच्छ करतात, तर रात्रीच्या वेळी त्वचा स्वच्छ करणं त्यांना तेवढं महत्त्वाचं वाटत नाही. यामुळे तुमच्या खराब झालेल्या त्वचेच्या पेशी दुरुस्त होत नाहीत. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढून टाकणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्या त्वचेला योग्य ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे त्वचेवर सैलपणा येतो.
४) चेहरा सतत धुवत राहणं
जर तुम्ही दिवसातून अनेक वेळा चेहरा स्वच्छ केलात, तर हे त्वचेच्या सॅगिंगचे कारण देखील असू शकते. हे आपल्या त्वचेची पीएच लेव्हल खराब करते. यामुळे तुम्हाला मुरुमे येऊ शकतात. शहनाज सांगतात की, 'चेहरा दिवसातून फक्त 2 ते 3 वेळा स्वच्छ केला पाहिजे.'
५) फेस मास्क चुकीच्या पद्धतीनं लावणं
अनेक महिलांना फेस मास्क लावण्याची योग्य पद्धत माहित नाही. त्या संपूर्ण चेहरा फेस मास्कने झाकतात. अगदी डोळ्यांखाली आणि ओठांच्या आसपासही त्या फेस मास्क लावतात. चेहऱ्यावरील या दोन्ही ठिकाणांची त्वचा नाजूक असते. येथे फेस मास्क लावल्याने स्ट्रेचिंग होते, ज्यामुळे त्वचा सैल होऊ लागते.
६) पुरेसं पाणी न पिणं
रोज नियमितपणे पाणी पिणे हे केवळ शरीर निरोगी ठेवण्यासाठीच नव्हे तर त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे. आपण पुरेसे पाणी न पिल्यास, त्वचा डिहायड्रेट होते. यामुळे स्किन सॅगिंगची समस्याही होऊ शकते. म्हणून दिवसभरातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं.