Lokmat Sakhi >Beauty > तरुण त्वचेसाठी शहनाज हुसेन सांगतात 7 स्टेप्सचं ॲण्टि रिंकल फेशिअल; सुरकुत्या घालवणारा इफेक्टिव्ह उपाय!

तरुण त्वचेसाठी शहनाज हुसेन सांगतात 7 स्टेप्सचं ॲण्टि रिंकल फेशिअल; सुरकुत्या घालवणारा इफेक्टिव्ह उपाय!

रिंकल फ्री चेहऱ्यासाठी शहनाज हुसेन सांगतात 7 स्टेप्सचं ॲण्टि एजिंग फेशियल.. तरुण दिसण्याचा सोपा मार्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 04:03 PM2022-06-13T16:03:41+5:302022-06-13T16:05:23+5:30

रिंकल फ्री चेहऱ्यासाठी शहनाज हुसेन सांगतात 7 स्टेप्सचं ॲण्टि एजिंग फेशियल.. तरुण दिसण्याचा सोपा मार्ग 

Shahnaz Hussain 's 7 Steps Anti Wrinkle Facial For Younger Skin; Effective Wrinkle Remedy! | तरुण त्वचेसाठी शहनाज हुसेन सांगतात 7 स्टेप्सचं ॲण्टि रिंकल फेशिअल; सुरकुत्या घालवणारा इफेक्टिव्ह उपाय!

तरुण त्वचेसाठी शहनाज हुसेन सांगतात 7 स्टेप्सचं ॲण्टि रिंकल फेशिअल; सुरकुत्या घालवणारा इफेक्टिव्ह उपाय!

Highlightsप्रोफेशनल क्लीन्जर, प्रोफेशनल पाॅवर नरिशिंग क्रीम, प्रोफेशनल पाॅवर स्कीन टाॅनिक, ॲण्टी रिंकल मास्क, ॲण्टि रिंकल जेल आणि कव्हरिंग क्रीम या प्रोडक्टसच्या मदतीनं 7 स्टेप्सचं ॲण्टि एजिंग फेशियल केलं जातं. 

वय रोजच वाढत जाणार हे सत्य आहे, पण ते चेहऱ्यावर दिसू नये अशी इच्छा असतेच. त्यासाठी केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रोडक्टसचा आधार घेतला जातो. पण ब्यूटी प्रोडक्टसचा परिणाम सुरकुत्या कमी होण्यासाठी कमी आणि चेहरा खराब होण्यात जास्त होतो. हे टाळून चेहेरा रिंकलफ्री दिसण्यासाठी शहनाज हुसेन क्वाॅलिटी प्रोडक्ट वापरुन 7 स्टेप्सचं ॲण्टि रिंकल फेशियल करण्याचा सल्ला देतात. हे फेशियल प्रत्यक्षात कसं करायचं ह देखील त्या सविस्तर समजावून सांगतात.

Image: Google

स्टेप 1

चेहऱ्यावर फेशियल करण्याची सुरुवात क्लीन्जरने होते. क्लीन्जरच्या मदतीनंं त्वचेवरील सर्व घण साफ होते. क्लीन्जरमुळे त्वचेत ओलसरपणा निर्माण होतो. क्लीन्जरचे चांगले फायदे मिळण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचा क्लीन्जर वापरावा. यासाठी शहनाझ हुसेन प्रोफेशनल बायो हायड्रेटिंग क्लीन्जरचा वापर करण्याचा सल्ला देतात. हे क्लीन्जर हातावर घ्यावं. या क्लीन्जरनं चेहेऱ्याचा 2मिनिटं मसाज करावा. नंतर कापसाच्या बोळ्यानं किंवा मऊ सूती कापडानं चेहेरा पुसून घ्यावा.

Image: Google

स्टेप 2

फेशिअलचा दुसरा टप्पा हा स्क्रब करण्याचा असतो. चेहेऱ्यावर स्क्रब केल्यानं चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. चेहऱ्यावरील ब्लॅक हेडस निघून जातात . स्क्रब करताना एक्सफ्लोएटिंग स्क्रब हातात घेऊन तो चेहेऱ्यावर हात गोल गोल फिरवत लावावं. हलक्या हातानं स्क्रबनं 5 मिनिटं चेहेऱ्यावर मसाज करावा. नंतर चेहेरा साध्या पाण्यानं धुवून स्वच्छ करावा. 

Image: Google

स्टेप 3 

चेहेऱ्याची त्वचा घट्ट करणे हा या फेशियलचा मुख्य हेतू असतो  म्हणूनच स्क्रबिंग नंतर चेहेऱ्यावर प्रोफेशलनल पाॅवर नरिशिंग क्रीमनं मसाज करणं आवश्यक असतं. या मसाजमुळे त्वचा तरुण होते. मसाज करण्यासाठी हातावर पाॅवर नरिशिंग क्रीम घ्यावं आणि त्या क्रीमनं चेहेऱ्याचा मसाज करावा. हा मसाज घाईघाईत नाही तर वेळ देऊन करावा लागतो. यासाठी 15 मिनिटं मसाज करावा. मसाज करताना क्रीम सुकल्यास पाण्याचा हात लावून मसाज करणं चालू ठेवावं. शहनाझ हुसेन यांच्या मते या क्रीममधील पोषक तत्त्वं त्वचेमध्ये मिसळून त्वचेचं पोषण करतात. या क्रीमनं 15 मिनिटं मसाज केल्यानंतर चेहरा 5 ते 10 मिनिटं तसाच ठेवावा.

Image: Google

स्टेप 4 

 प्रोफेशनल पाॅॅवर नरिशिंग क्रीमनं मसाज केल्यानंतर  चेहेऱ्याला थेट प्रोफेशनल पाॅवर स्कीन टाॅनिक चेहऱ्याला लावू शकता किंवा चेहेरा पाण्यानं धुवून रुमालानं टिपून घ्यावा आणि नंतर स्किन टाॅनिक स्प्रे चेहरा आणि मानेवर लावावा. हे टोनर चेहऱ्यावर लावल्यानंतर ते आपोआप सुकतं. टोनर चेहेऱ्यावर लावल्यावर चेहरा हलक्या हातनं पाण्यानं धुवावा. 5 मिनिटांच्या आत चेहेरा वाळतो.

Image: Google

स्टेप 5 

चेहऱ्यावर ॲंटी रिंकल मास्क लावताना डोळे आणि ओठांचा भाग सोडूनज पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावावं. ते पूर्ण वाळलं की चेहरा पाण्यानं स्व्च्छ धुवावा.ॲण्टि रिंकल मास्कमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. 

Image: Google

स्टेप 6   

ॲण्टि रिंकल मास्कनंतर चेहऱ्यावर् ॲण्टि रिंकल जेल लावणं गरजेचं असतं. यासाठी  रिंकल जेलनं हलल्या हातानं 1 मिनिट मसाज कराव. मसाज केल्यानंतर 2 मिनिटं चेहेरा तसाच ठेवावा. ॲण्टि रिंकल जेलमुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो. चेहरा फ्रेश होतो. हे जेल लावून 2 मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा पाण्यानं धुवू नये. 

Image: Google

स्टेप 7 

चेहऱ्यावर अण्टि रिंकल जेल लावल्यानंतर ते सुकलं की चेहऱ्याला कव्हरींग क्रीम लावणं गरजेचं असतं.  कवरिंग क्रीम चेहऱ्याला लावल्यानंतर ते काही वेळ तसंच ठेवावं.  ही क्रीम थोडी हेवी असल्यानं कोणाला ती क्रीम चेहऱ्याला लावून बाहेर पडायला आवडत नाही. ही कवरिंग क्रीम लावल्यानंतर 15 मिनिटांनी चेहेरा साध्या पाण्यानं धुतला तरी चालतो.

Web Title: Shahnaz Hussain 's 7 Steps Anti Wrinkle Facial For Younger Skin; Effective Wrinkle Remedy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.