Lokmat Sakhi >Beauty > 6 वर्ष झालेत तिने केसांना शाम्पूच लावला नाही! ती विचारतेय, शाम्पूची गरजच काय?

6 वर्ष झालेत तिने केसांना शाम्पूच लावला नाही! ती विचारतेय, शाम्पूची गरजच काय?

शाम्पूनं केस स्वच्छ होतात, चांगले होतात, केस सुंदर दिसतात हे खरं नाही.. 6 वर्षांपासून केसांना शाम्पू लावणं सोडून दिलेली लाॅरा ॲश्ले असं का म्हणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 07:38 PM2022-02-18T19:38:40+5:302022-02-18T19:43:40+5:30

शाम्पूनं केस स्वच्छ होतात, चांगले होतात, केस सुंदर दिसतात हे खरं नाही.. 6 वर्षांपासून केसांना शाम्पू लावणं सोडून दिलेली लाॅरा ॲश्ले असं का म्हणते?

She hasn't shampooed her hair in 6 years! She asks, do you need shampoo? | 6 वर्ष झालेत तिने केसांना शाम्पूच लावला नाही! ती विचारतेय, शाम्पूची गरजच काय?

6 वर्ष झालेत तिने केसांना शाम्पूच लावला नाही! ती विचारतेय, शाम्पूची गरजच काय?

Highlightsसहा वर्षांपूर्वी 'नो पू'च्या आंदोलनात लाॅरा ॲश्ले सहभागी झाली.केसांना सुंदर ठेवण्यासाठी शाम्पूची गरज असते हे चूक आहे असं लाॅरा म्हणते. शाम्पू न वापरता आपले केस पहिल्यापेक्षा जास्त सुंदर झाल्याचे लाॅरा सांगते. 

बाजारात शाम्पूचे कितीतरी प्रकार उपलब्ध आहेत. केसांचे प्रश्नही तितकेच आहेत. त्यानुसार कोणता शाम्पू निवडावा असा प्रश्न पडून गोंधळ उडतो. पण असा प्रश्न 'ती'ला पडत नाही. सहा वर्षांपूर्वी पडायचा, पण  गेल्या सहा वर्षात तिला हा प्रश्नच पडला नाही. ती कोणत्यातरी एकाच ब्रॅण्डला चिकटून राहिली म्हणून तिला हा प्रश्न पडला नसेल असं  वाटण्याची शक्यता फार, पण वास्तव मात्र हे नाही. ती शाम्पूच वापरत नसल्यानं कोणता शाम्पू वापरावा असा प्रश्न तिला पडत नाही. गेल्या सहा वर्षांपासून तिने केसांना शाम्पू लावणं सोडून दिलं आहे. न शाम्पू लावताही आपले केस जास्त सुंदर आहेत असं ती म्हणते. 
कॅलिफोर्निया येथील लाॅरा ॲश्ले ही वीगन असून प्राणिजन्य अशा कोणत्याही उत्पादनाचा ती वापर करत नाही. सहा वर्षांपूर्वी 'नो पू'च्या आंदोलनात ती सहभागी झाली आणि तिने केसांना शाम्पू लावणं सोडून दिलं. नो पू म्हणजे नो शाम्पू.  केसांना केमिकलयुक्त महागाचे शाम्पू लावण्याची गरज नाही असं हे नो पू शाम्पू आंदोलन म्हणतं. या आंदोलनाचा हेतू लाॅराला पटला आणि तिने शाम्पू वापरणं सोडून दिलं.

Image: Google

शाम्पू सोडल्यानंतर लाॅरानं घरगुती गोष्टींचा उपयोग केस स्वच्छ करण्यासाठी केला. आधी ती बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांच्या मिश्रणानं केस धुवायची. पण नंतर तिने ते मिश्रण वापरणंही सोडून दिलं. ती आपले केस केवळ पाण्यानं धुते. पाण्यानं केस धुवून देखीला आपल्या केसांना दुर्गंधी येत नाही. पहिल्यापेक्षा आपले केस् जास्त लांब आणि दाट झाल्याचं कुरळे केस असलेली लाॅरा सांगते. 

Image: Google

लाॅरानं शाम्पू का सोडला?

लाॅरानं वीगन पध्दतीची जीवनशैली निवडली. यात प्राणिजन्य कोणत्याची वस्तूंचं सेवन करणं, वापर करणं अयोग्य मानलं जातं. शाम्पू वापरणं म्हणजे केसांची गरज नसतांना त्यांच्यावर रासायनिक गोष्टींचा वापर करणं. रासायनिक गोष्टींमध्ये दोन गोष्टी एकत्र येत कृत्रिम प्रक्रिया घडते. त्यामुळे रासायनिक घटक असलेला शाम्पू केसांना नैसर्गिक सौंदर्य कसा प्रात्प करुन देईल असा प्रश्न नो पू आंदोलनात् सहभागी झालेल्या लाॅरालाही पडला. हा नाही तर तो, तो नाहीतर दुसरा शाम्पू वापरणं म्हणजे बाजाराच्या अनावश्यक दबावाखाली येणं होय. शाम्पू वापरल्यानं केसांमध्ये जे नैसर्गिक तेल निर्माण होतं त्याला अडथळा निर्माण होतो. केस कोरडे होवून गळतात. केस खराब होतात. हे सर्व टाळण्ं शाम्पू वापरणं सोडलं तर शक्य आहे असं लाॅरालाही वाटलं आणि तिने शाम्पू वापरणं सोडला.

Image: Google

शाम्पू सोडल्या नंतर..

काही काळ लाॅरानं बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करत केस धुतले . पण नंतर तिला त्याचीही गरज वाटली नाही. पाण्यानं केस व्यवस्थित स्वच्छ होतात हे तिला लक्षात आल्यावर तिने सोडा आणि व्हिनेगर वापरणंही सोडून दिलं. केस गळणं, खराब होणं याचा संबंध हा चुकीच्या खाणपाणाशी आहे असं लाॅरा म्हणते. शाम्पू सोडल्यानंतर 1-2 महिने तिला थोडा केसांच्या बाबतीत त्रास झाल्याचं आढळलं. पण तरीही ती आपल्या शाम्पू न वापरण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. तिने केसांच्या दृष्टीकोनातून आहारात बदल केलेत. आहारात कच्चं सॅलेड, फळं यांचा समावेश केला. फळं आणि भाज्या कमी खाल्ल्यास केसांच्या समस्या उद्भभवतात हे लाॅराच्या लक्षात आल्यानं तिनं आपल्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवून केसांचं आरोग्य सुधारलं. लाॅराची ही नो शाम्पूची गोष्ट वाचून तुमच्या मनात काय आलं ते नक्की सांगा!
 

Web Title: She hasn't shampooed her hair in 6 years! She asks, do you need shampoo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.