आपली त्वचा अभिनेत्रींप्रमाणे ग्लोईंग असावी असं आपल्याला अनेकदा वाटतं. पण रोजच्या धावपळीत आपण स्वत:कडे म्हणावं तितकं लक्ष देत नाही. घरातली कामं, ऑफीस, इतर जबाबदाऱ्या या सगळ्यापुढे आपला आहार, व्यायाम, पाणी, झोप या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. त्याचा फक्त आपल्या आरोग्यावरच परिणाम होतो असे नाही तर या गोष्टी नीट नसतील तर त्याचा आपल्या सौंदर्यावरही परीणाम होतो. चेहऱ्यावर फोड, पिंपल्स, डाग, खड्डे आले की आपण वैतागून जातो. कधी त्वचा कोरडी पडली म्हणून तर कधी चेहऱ्यावर खूप सुरकुत्या आल्या म्हणून आपल्याला काय करावे ते कळत नाही. (Skin Care Routine for glowing skin) पण शहनाज गिलसारखी अभिनेत्री मात्र तिच्या त्वचेची इतकी परफेक्ट काळजी घेते की तिची त्वचा इतकी नितळ आणि ग्लोईंग असण्यामागे काय कारणे असावीत असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो (Shehnaaz Gill Beauty Secret).
१. भरपूर पाणी पिणे
शहनाज कितीही बिझी असली तरी ती दर काही वेळाने पाणी पिणे अजिबात विसरत नाही. तिची त्वचा नितळ असण्यामागे भरपूर पाणी पिणे हे मुख्य कारण आहे. पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहते आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात. त्यामुळे नकळत शरीर स्वच्छ होऊन त्याचा ग्लो त्वचेवर येतो.
२. व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी हे आपले शरीर डीटॉक्स होण्यासाठी अतिशय उत्तम व्हिटॅमिन असते. आहारातून व्हिटॅमिन सी घेण्याबरोबरच शहनाज रात्री झोपताना सी व्हिटॅमिन असलेले सीरम वापरते. न विसरता ती रोज रात्री हे सीरम लावून मगच झोपते त्यामुळे सकाळी उठल्यावर तिची त्वचा ग्लो करते. आपणही एखाद्या चांगल्या कंपनीचे सीरम घेऊन ते रोज लावल्यास आपली त्वचा चांगली होण्यास मदत होईल.
३. फॅट फ्री डाएट
आपला आहार हा आपल्या संपूर्ण शरीराचा आरसा असतो. आपण जसे खातो ते सगळे आपल्या शरीरावर विविध मार्गाने दिसत असते. आपण हेल्दी आहार घेतला तर नकळत आपली त्वचा, केस, फिगर हे चांगले राहण्यास मदत होते. शरीरात फॅटस वाढले की त्याचा परिणाम नकळत आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे शहनाज आपल्या डाएटकडे विशेष लक्ष देते. लोणी, तूप, तेल यांसारख्या गोष्टी खाणे ती टाळत असल्याने तिची त्वचा ग्लो करते.
४. मॉइश्चरायजर
मॉइश्चरायजर हे थंडीच्या दिवसांत किंवा त्वचा कोरडी पडली तरच वापरायचे असते असे आपल्याला वाटते. त्यामुळे आपण एरवी ते लावत नाही. मात्र रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना मॉइश्चरायजर लावायला हवे. मेकअप करतानाही मॉइश्चरायजरचा वापर आवर्जून करायला हवा. त्यामुळे केमिकल असलेल्या उत्पादनांचा चेहऱ्यावर वाईट परिणाम होत नाही आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते.