खरं सौंदर्य हे आतून बहरुन येतं आणि मग ते चेहेर्यावर खुलून दिसतं. याचाच अर्थ मन शांत असलं, तणावरहित असलं, मेंदू शांत असला की चेहेरा सुंदर दिसतो, असं अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणते. नुसती म्हणत नाही तर त्यासाठी तसे उपायही करते. शिल्पा शेट्टी मन आणि शरीरास रिलॅक्स करण्यासाठी वरचेवर सॉल्ट स्क्रब करते.
Image: Google
या सॉल्स्ट स्क्रबमुळे शरीरावरची मृत त्वचा निघून जाते. शरीरासोबतच मन शांत करण्याची जादूही या स्क्रबमधे आहे. शिल्पा शेट्टी करत असलेला हा सॉल्ट स्क्रब मोजितो स्क्रबमधे मोडतो. ज्यात रॉक सॉल्ट, नैसर्गिक तेल आणि औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. हे स्क्रब शरीरावरील मृत त्वचा काढून टाकतं. यामुळे त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचा मऊ मुलायम होते. सॉल्ट स्क्रबमुळे शरीरासोबत्च मनालाही आराम मिळतो.
शिल्पा शेट्टी हे सॉल्ट स्क्रब कसं करावं, ते केल्यानंतर काय काळजी घ्यावी याबद्दलही माहिती देते.
Image: Google
कसं करतात सॉल्ट स्क्रब?
सॉल्ट स्क्रब करण्यासाठी 1 कप पावडर स्वरुपातील रॉक सॉल्ट, पाव कप खोबरं / बदाम किंवा ऑलिव्ह तेल घ्यावं.थोडी पुदिन्याची पानं बारीक वाटून घ्यावीत. अर्ध्या लिंबाचं साल किसून घ्यावं. एक चमचा लिंबाचा रस घ्यावा. हे सर्व एका खोलगट भांड्यात एकत्र करुन घ्यावं.
हे स्क्रब लगेच वापरण्यासोबतच ते मिश्रण हवाबंद डब्यात घालून फ्रिजमधेही ठेवता येतं. ते टिकतं. सॉल्ट स्क्रब शरीराला लावायचं असेल तर बाथरुम ही उत्तम जागा आहे. आधी अंगावर पाणी घेऊन अंग ओलं करुन घ्यावं. मग थोडं स्क्रबर हातावर घेऊन ते अंगाला गोल गोल हात फिरवत लावावं. एका भागावर लावून झालं की दुसर्या भागावर अशाच पध्दतीनं लावावं. हे स्क्रबर संपूर्ण शरीराला लावून झालं की थोडा वेळ तसंच राहू द्यावं. हलक्या हातानं शरीरावर मसाज करावा. थोड्या वेळानं कोमट पाण्यानं अंगं धुवावं. रुमालानं हळूवार टिपून घ्यावं.
Image: Google
स्क्रब केल्यानंतर..
सॉल्ट स्क्रब केल्यानंतर त्वचेवरची मृत त्वचा निघून जाते. त्वचेची रंध्रं उघडतात. त्यामुळे स्क्रब केल्यानंतर नेहेमी शरीराला आधी मॉश्चरायझर लावावं. त्यानंतर सनस्क्रीन लावावं. हे स्क्रब केल्यानं त्वचेची रंध्रं उघडतात, अशा परिस्थितीत बाहेर पडल्यास त्वचेत वातावरणातील धूळ, घाण जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या दिवशी सॉल्ट स्क्रब केलं त्याच्या दुसर्या दिवशी शक्यतो बाहेर पडू नये. शिवाय हा स्क्रब चेहेरा सोडून संपूर्ण शरीरावर लावावं. चेहेऱ्यासाठी शुगर स्क्रब उपयोगी पडतो.