Lokmat Sakhi >Beauty > शिल्पा शेट्टीची १९ हजारांची लिनन साडी, पाहा लिनन साडीची नेमकी खासियत

शिल्पा शेट्टीची १९ हजारांची लिनन साडी, पाहा लिनन साडीची नेमकी खासियत

Shilpa Shetty's Linen saree Look: कपडे असो वा दागदागिने... फॅशन सेन्सच्या बाबतीत शिल्पा शेट्टीच्या चॉईसची नेहमीच चर्चा केली जाते. सध्या असाच तिचा एक लिनन साडी लूक गाजतो आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 12:18 PM2022-11-08T12:18:03+5:302022-11-08T12:18:41+5:30

Shilpa Shetty's Linen saree Look: कपडे असो वा दागदागिने... फॅशन सेन्सच्या बाबतीत शिल्पा शेट्टीच्या चॉईसची नेहमीच चर्चा केली जाते. सध्या असाच तिचा एक लिनन साडी लूक गाजतो आहे.

Shilpa Shetty's Linen saree worth Rs. 19K, Look at the speciality of her beautiful cotton saree | शिल्पा शेट्टीची १९ हजारांची लिनन साडी, पाहा लिनन साडीची नेमकी खासियत

शिल्पा शेट्टीची १९ हजारांची लिनन साडी, पाहा लिनन साडीची नेमकी खासियत

Highlightsएखाद्या समारंभासाठी तयार होताना नेहमीच झकपक कपड्यांची गरज नसते, असं शिल्पा शेट्टीचा हा एक व्हायरल लूक सांगतो आहे

लग्न- समारंभ, पार्टी यासाठी आपण नेहमीच ब्राईट कपड्यांची निवड करतो. ज्या कपड्यांवर थोडंफार वर्क असतं किंवा जे कपडे थोडे चमचमते असतात, असे कपडे घालण्यास आपण प्राधान्य देतो. बऱ्याचदा एखाद्या पार्टीसाठी किंवा लग्नासाठी तयार झालेल्या अभिनेत्रींचा लूक व्हायरल (Shilpa Shetty's viral look) होतो, तेव्हा त्यांनीही अशाच पद्धतीचे कपडे घातलेले असतात. पण एखाद्या समारंभासाठी तयार होताना नेहमीच अशा झकपक कपड्यांची गरज नसते, असं शिल्पा शेट्टीचा हा एक व्हायरल लूक सांगतो आहे (Shilpa Shetty's Linen saree worth Rs. 19K).

 

शिल्पाने तिचे काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यामध्ये ती पांढऱ्या शुभ्र रंगाच्या साडीत दिसते आहे. चमकदार पांढऱ्या रंगाची तिची ही साडी लिनन प्रकारातली असून या साडीवर गुलाबी रंगाची फुलं आहेत.

थंडीच्या मौसमात घरी करायलाच हवे खास सिताफळ मिल्कशेक.. रेसिपी सोपी, द्या स्वत:ला सिझनल ट्रीट

तसं पाहिलं तर दिसायला ही साडी अगदीच साधी वाटते. पण ती शिल्पाने ज्या पद्धतीने कॅरी केली आहे किंवा त्यावर ज्या पद्धतीचे दागदागिने घातले आहेत, त्यामुळे साडीचा लूक पुर्णपणे बदलला आहे. त्यामुळे येत्या लग्नसराईत कॉटन किंवा लिननची साडी नेसूनही असा लूक करता येईल. सगळ्यांपेक्षा नक्कीच स्टायलिश आणि वेगळ्या दिसाल यात वाद नाही.

 

शिल्पा शेट्टीने जी साडी नेसली आहे, ती Anavila या ब्रॅण्डची आहे. या ब्रॅण्डच्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर साडीची किंमत १८, ५०० रुपये एवढी दाखविण्यात आली आहे.

हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी आयुर्वेदिक उपाय, त्वचा होईल मऊ- मुलायम

लिननची साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचं सिल्कचं ब्लाउज असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन तिने या साडीसाठी निवडलं आहे. साडी साधीच असली तरी तिने ॲक्सेसरीज, हेअरस्टाईल आणि मेकअप या माध्यमातून तिचा लूक कॅची केला आहे. सोनेरी रंगाचे मोठे झुमके, पफ काढून घातलेला हेअर बन, हातभर बांगड्या आणि ग्लॉसी मेकअप यामुळे शिल्पाचा लूक अधिक आकर्षक झाला आहे. 

 

Web Title: Shilpa Shetty's Linen saree worth Rs. 19K, Look at the speciality of her beautiful cotton saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.