बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा लवकरच छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमात परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमासाठी परिणितीने जी साडी (Parineeti Chopra's six yard saree cosr Rs. 1,35,000) नेसली होती, तिची जबरदस्त चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे. सेलिब्रिटीफॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra collection) यांनी ही साडी डिझाईन केली असून या साडीतला परिणितीचा शिमरी शाईनी लूक जबरदस्त कॅची ठरला आहे...
सध्या बॉलीवूडमध्ये अशा प्रकारच्या शिमरी, शाईनी, सिक्विन साड्यांचा भलताच ट्रेण्ड (trending sequin saree) आहे. अशा प्रकारच्या साड्या सध्या पार्टीवेअर लूकसाठी खूपच परफेक्ट मानल्या जात आहेत. परिणितीने जी साडी नेसली आहे त्या पुर्ण साडीवर सिक्वीन वर्क (sequin art) करण्यात आले आहेत. साडीवरचे जे सगळे सिक्विन्स आहेत ते निळ्या रंगातल्या वेगवेगळ्या छटांचे आहेत. त्यामुळे साडीचा रंग थोडाचा फिरता रंग जरी वाटत असला तरी रॉयल ब्लू या रंगात ही साडी जाते. परिणितीने या साडीवर डार्क जांभळ्या रंगाचं वेलव्हेट ब्लाऊज घातलं आहे. ही साडीच एवढी चमचमती आहे की साडी नेसल्यानंतर परिणितीला खूप जास्त ॲक्सेसरीज घालण्याची किंवा मेकअप करण्याची गरज पडलेली नाही. परिणितीने केवळ कानातले घातले असून साडीवर सूट होणारा ग्लॉसी मेकअप केला आहे.
मनिष मल्होत्रा यांचं शिमरी, शाईनी सिक्विन साडी कलेक्शन सध्या खूपच चर्चेचा विषय ठरतो आहे. मनिष मल्होत्रा आणि सब्यासाची मुखर्जी (sequin shimmer six yard trend by Manish Malhotra) यांनी शिमर साड्यांवर सिक्वीन वर्क करण्याचा ट्रेण्ड आणला आणि तो प्रचंड हिट ठरला. महिन्यातून एक- दोनदा तरी त्यांच्या या कलेक्शनपैकी एखादी साडी एखाद्या मॉडेलने किंवा अभिनेत्रीने घातलेली दिसते.
photo credit- google
मालविका मोहनन, मलायका अरोरा (Malaika Aroa in sequin saree), रकुल प्रित सिंग, नुसरत भारूचा यांचेही काही दिवसांपुर्वीच मनिष मल्होत्रा यांच्या सिक्विन साडी कलेक्शनमधील फोटो दिसून आले आणि सोशल मिडियावरही ते चांगलेच व्हायरल झाले होते. या सगळ्याजणींनी परिणितीप्रमाणेच या साड्यांवर स्ट्रेपी स्टाईल ब्लाऊज आणि ग्लॉसी मेकअप केला हाेता. गळ्यात काहीही न घालता केवळ कानातले आणि काही वेळा अंगठी घातली तरी सिक्विन साडीतला तुमचा लूक परफेक्ट दिसू शकतो, असेच या सगळ्यांचे फोटो पाहून लक्षात येते.
photo credit- google
सिक्वीन साडीची एक खासियत म्हणजे ही साडी भरजरी असली तरी अतिशय लाईटवेट असते. या साडीवर इतके वर्क केलेले असते की, त्यामुळे दागिने आणि मेकअप यांच्यावर एक्स्ट्रा काम करण्याची गरज पडत नाही. पार्टीवेअर असणारी ही साडी हमखास भाव खाऊन जाणारी ठरते आहे. परिणितीने नेसलेली साडी सव्वा लाखाची (cost of sequin saree) असली तरी शिमरी सिक्विन साडी सर्वसामान्यांच्या आवाक्यातही नक्कीच मिळते. अगदी २ हजारांपासून ते लाखभर किमतीपर्यंत सिक्वीन साडीचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.