बॉलीवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या कपड्यांबाबत आणि ॲक्सेसरीजबाबत अतिशय चूझी आहे, अशी चर्चा नेहमीच तिच्याबद्दल केली जाते. कदाचित ती खूपच निरखून- पारखून आणि अगदी बारकाईने कपड्यांची खरेदी करत असल्यानेच तिच्या कपड्यांची हटके स्टाईल तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच गाजते. आधीच तिचं गोड दिसणं आणि त्यात तिचे स्टायलिश कपडे यामुळे सारा अधिक छान दिसते. आता सध्या तिने घातलेल्या ज्या पिवळ्या चमचमत्या ड्रेसची (Shiny, shimmery dress of actress Sara Ali Khan) चर्चा सुरू आहे, तो देखील सारावर खूपच उठून दिसतो आहे.
कसा आहे साराचा ड्रेस? नुकत्याच झालेल्या ओटीटी प्ले ॲवॉर्ड्स- २०२२ मध्ये साराने हा पिवळा मिनीड्रेस घातला होता. तिच्या ड्रेसमुळे तिला अतिशय बोल्ड लूक मिळाला होता, यात वादच नाही. पुर्णपणे सिक्विन वर्क असणारा हा ड्रेस तिला एक कम्प्लिट पार्टी लूक देणारा ठरला. साराने तिच्या या लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्याला "Olive you so much." अशी कॅप्शन दिली आहे. साराचा हा ड्रेस न्युयॉर्क येथील AREA या ब्रॅण्ड हाऊसचा असून तो Piotrek Panszczyk आणि Beckett Fogg यांनी डिझाईन केला आहे. या ड्रेसची किंमत तब्बल ८०, ५०० रुपये आहे.
या ड्रेसच्या गळ्याचा जो आकार आहे तो स्वीटहार्ट नेकलाईन म्हणून ओळखला जातो. कंबरेच्या जवळ ड्रेसचा जो आकार आहे तो असिमेट्रिकल असून त्यामुळे साराची परफेक्ट शेपमध्ये असणारी फिगर आणखी उठून दिसते. या ड्रेसवर साराने कोणत्याही हेवी एक्सेसरीज घातलेल्या नाहीत. तिची ड्रेसला मॅचिंग होणारी परफेक्ट पिवळ्या रंगाची सॅण्डल आणि त्याच रंगाची नेलपेंट मात्र उठून दिसते आहे. या ड्रेसनुसार तिचा मेकअपही शिमरी, ग्लॉसी झाला आहे.