Join us

केस वाढावेत म्हणून केसांना कांद्याचा रस चोपडताय? - ते धोक्याचं!कांद्याचा रस कुणी लावावा आणि कुणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2023 13:15 IST

Shocking Side Effects Of Onion Juice On Hair केसांना कांद्याचा रस चुकीच्या पद्धतीने लावला तर केसांचे नुकसान अटळ

केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. परंतु, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांची वेळोवेळी काळजी घ्यायला जमेलच असे नाही. बाजारात खास केसांची समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारच्या प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मात्र, त्यातील केमिकल रसायनांमुळे केस खराब होऊ शकतात. त्यामुळे काही महिला केसांसाठी घरगुती उपायांना फॉलो करतात. ज्यात कांद्याचा रसाचा देखील समावेश आहे. कांद्याच्या रसामुळे केसांच्या समस्या सुटतात असे म्हणतात. पण खरंच केसांची समस्या सोडवण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरतो का?(Shocking Side Effects Of Onion Juice On Hair).

कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. केस हे केराटिनपासून बनलेले असतात, ज्यात सल्फर असते. कांद्याच्या रसातही सल्फर मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे महिला केसांवर कांद्याचा रस लावतात. पण याच्या चुकीच्या वापरामुळे केसांचे नुकसान देखील होऊ शकते. केसांवर कांद्याच्या रसाचा वापर कसा करावा? यामुळे केसांना फायदा होतो का? हे पाहूयात.

रात्री झोपण्यापूर्वी लावा गुलाब पाणी, चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक - सकाळी चेहरा बघून म्हणाल..

केसांवर कांद्याचा रस लावण्याचे दुष्परिणाम

काहींना कांदा आवडतो, तर काही लोकं कांदा खाणं टाळतात. काहींना कांद्याच्या वासाची अॅलर्जी असते. जर आपल्याला कांदा आवडत नसेल तर, केसांवर देखील लावणे टाळा. जर आपण केसांना कांद्याचा रस लावत असाल तर, अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. केसांवर कांद्याचा रस लावल्याने स्काल्पवर खाज सुटू शकते. ज्यामुळे पुरळ उठू शकतात. अशा वेळी केसांवर थेट कांद्याचा रस लावणे टाळा. त्याऐवजी कांद्याच्या रसात एलोवेरा जेल किंवा खोबरेल तेल मिक्स करून लावा. यामुळे कांद्याचा प्रभाव कमी होईल.

चेहऱ्यावर जाडजाड पिंपल्स-पुळ्या-मुरुमांचं जंगल? पुळ्या फोडल्या तर ते जास्त वाढतात का? कसा कमी होईल त्रास

केसांच्या समस्यांमागे अनेक कारणे असू शकतात. केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करणे, मासिक पाळीमध्ये अनियमितता, वजन वाढणे, शरीरात पौष्टीक गोष्टींची कमतरता, अशक्तपणा या कारणांमुळे केसांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे केसांवर कांद्याचा रस लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

टॅग्स :केसांची काळजीकांदाब्यूटी टिप्स