Join us

नवीन चपला चावतात, फोड येतात-चालणं मुश्किल? ४ घरगुती उपाय- नव्या चपला घाला बिंधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2024 11:17 IST

Shoe Bite: Causes and How to Treat and Prevent : तुम्हालाही चावतात का नवीन चप्पल?

नवीन कपड्यांसोबत आपण नवीन शूजही खरेदी करतो (Shoe Bite). शूज आणि चप्पल आपल्या पर्सनॅलिटी नवीन लूक देतात. शिवाय पायाचे सौंदर्यही वाढवतात. पावसाळ्यात प्रत्येक जण नवीन शूज घेतात (Monsoon). पण अनेकवेळा नवीन शूज घातल्यानंतर पायात फोड येण्यासारख्या समस्या उद्भवतात. शू बाइटमुळे चालणे कठीण होऊन जाते.

ही समस्या चुकीच्या आकाराचे शूज परिधान केल्यामुळे देखील होऊ शकते. शु बाईटमुळे चालणे तर कठीण होतेच, शिवाय प्रभावित भागात असह्य वेदना होतात. जर आपल्यालाही नवीन शूजमुळे पायावर फोड उठले असतील तर, काही घरगुती उपाय करून पाहा. पायांना होणार नाही त्रास, शु बाईटची देखील समस्या होणार नाही(Shoe Bite: Causes and How to Treat and Prevent).

खोबरेल तेल

जर आपले लेदर शूज असतील तर, त्यावर तेल लावा. शूजवर ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल लावा. असे केल्याने लेदर शूज सॉफ्ट होतील. जेणेकरून ते घालणे अधिक सोपे होईल. जर आपल्याला तेलाचा वापर करायचा नसेल तर, कंडिशनरचा वापर करा.

पावसाळ्यात शिळं अन्न खाताय? किती तासांनी पदार्थ खाल्ले तर फूड पॉयझनिंगचा धोका, आजारांना आमंत्रण

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलचा वापर स्किनसाठी प्रभावी ठरते. जर आपल्याला सँडल किंवा चप्पल चावत असेल तर, एलोवेरा जेलचा वापर करा. यातील गुणधर्म जळजळ कमी करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. अशावेळी एलोवेरा जेल घ्या आणि ते थेट प्रभावित भागावर लावा. २० मिनिटानंतर थंड पाण्याने पाय धुवा.

पेट्रोलियम जेली

नवीन चप्पल घालून जर पायांवर फोड उठले असतील तर, पेट्रोलियम जेलीचा वापर करा. प्रभावित भागावर पेट्रोलियम जेली लावा. नंतर काही वेळ तसेच राहू द्या. १० मिनिटानंतर पाय धुवा. यामुळे दुखापत कमी होईल.

पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो? लवकर सुकतही नाहीत? ४ जबरदस्त ट्रिक्स, कपडे वाळतील लवकर

कडुलिंब आणि हळद

कडुलिंब आणि हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे पायांवर पुन्हा फोड येणार नाही. यासाठी एका बाऊलमध्ये कडूलिंबाच्या पानांची पेस्ट आणि हळद मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट पायांवर लावा. ३० मिनिटानंतर पाय स्वच्छ धुवा.  

टॅग्स :मोसमी पाऊसत्वचेची काळजी